बिडी उत्पादनासाठी महापुरुषांच्या नावाचा गैरवापर थांबवावा : रोहित पवार || Marathi news


          छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chatrapati Sambhaji Maharaj)  नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी (Bidi Production) उत्पादन करते. महाराजांच्या नावाचा गैरवापर थांबवावा यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. आता याप्रकरणी शिवप्रेमींच्या भावना तीव्र झाल्या असून महाराजांचे नाव बिडी वरून हाटवले जावे अशी तीव्र मागणी केली जात आहे. आता याच प्रकरणी (National Congress Party) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटर वर वक्तव्य स्पष्ट केले आहे.
बिडी उत्पादनासाठी महापुरुषांच्या नावाचा गैरवापर थांबवावा : रोहित पवार || Marathi news
बिडी उत्पादनासाठी महापुरुषांच्या नावाचा गैरवापर थांबवावा : रोहित पवार || Marathi news

          रोहित पवार आपल्या ट्विटर च्या ट्विट मध्ये म्हणतात, ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करत आहे. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे.लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा’ अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.संभाजी महाराजांच्या नावाची बदनामी थांबवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आमरण उपोषण सुरु झाले असल्याचे पाहायला मिळते.


◾ काय आहे प्रकरण : 


          संभाजी बिडी नावाने पुण्यातील एक कंपनी बिडीचे उत्पादन करत असून ते बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसही आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडीचे उत्पादन करणे योग्य नसून हा छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान असल्याच्या संतत्प भावना शिव-शंभूप्रेमींकडून व्यक्त होत आहेत. संभाजी ब्रिगेडनेही या नावावर आक्षेप घेतला होता. आता, आमदार रोहित पवार यांनीही या कंपनीला सूचना केल्या आहेत. संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करु नका, असे पवार यांनी सुनावले आहे.


हे वाचा - Government Job ची संधी ! Indian Railway च्या 35 हजार जागांसाठी भरती 


          संभाजी ब्रिगेडच्या वतीने 2011 ते 2013 या कालवधीत राज्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने सुरू असलेल्या बिडीची विक्री थांबवावी, या मागणीकरिता आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर कंपनी व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेत मान्य केलेल्या मागणीनुसार बिडी बंडलवरुन संभाजी महाराजांचे चित्र हटवण्यात आले आहे . नावात हळूहळू बदल करण्याचे लेखी आश्‍वासन कंपनी व्यवस्थापनाने दिले होते मात्र, बिडीचे अचानकपणे नाव बदलणे व्यावसायिक अडचणीमुळे शक्‍य नसल्याचे सांगितले होते , पण कंपनीने हे आश्‍वासन पाळले नाही. त्यामुळे जनतेत असंतोष पाहायला मिळत आहे. एकंदरीत हे प्रकरण वाढण्याची शक्यता आहे.


◾ कोल्हापुरातील आंदोलनाला प्रतिसाद : 


          महापुरुषांच्या नावाचा दुरुपयोग करुन आर्थिक कमाई करणाऱ्या साबळे वाघिरे आणि कंपनीच्या व्यवसायाला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. संभाजी बिडीचे नाव बदलावे, या मागणीसाठी आग्रही असलेल्या संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहे. बिडीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आपल्या स्टाईलने कारवाई करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.


हे वाचा - Amazon वरून Order केला दीड लाखांचा Camera , काय आलं पाहा हा Viral Video


          संभाजी ब्रिगेडच्या संभाजी बिडी विरोधातील आंदोलनाला कोल्हापुरातील व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त सकारात्मक प्रतिसाद देत आपल्याकडील शिल्लक सर्व मालसुद्धा कंपनीला परत पाठवण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे १० लाखांचा माल ट्रान्सपोर्टने पुण्याला परत पाठवला. संभाजी विडीची खरेदी-विक्री करणार नसल्याचे जिल्हा पानपट्टी असोसिएशन यांनी जाहीर केले आहे. इथून पुढे भविष्यात महापुरुषाच्या नावाने असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि खरेदी करणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi



➤ WhatsApp Updates साठी * 9284678927 या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.





          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !! 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने