अज्ञाताचे विज्ञान : परामानसशास्त्र (Parapsychology) || Psychology


          आपण अस्तित्वांत कसे आलो आपली बुद्धी कशी कार्य करते आपला मेंदू, त्यातील असंख्य जटिल असणारे तंतू कसे कार्य करतात याचे उत्तर आज आपल्याला विज्ञान देत आहेच, पण त्याही व्यतिरिक्त आजही अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचं उत्तर शोधण्यासाठी मानवाला एका विशिष्ट पद्धतीची गरज भासू लागली.


          एका अकल्पनिय आणि अद्भुत शास्त्राची निर्मिती झाली, ज्यामुळे मानवी अस्तित्वा पलीकडच्या गोष्टी जाणण्यासाठी एक विशिष्ट पद्धत तयार करण्यात आली आणि त्यातून अज्ञात असणाऱ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी मानवतेचे प्रयत्न सुरू झालेत, त्यालाच अज्ञाताचे विज्ञान असेही म्हटले जाऊ लागले. काय आहे ते विज्ञान आणि त्यातून काय काय अज्ञात गोष्टींचा सुगावा लागलाय याबद्दल जाणून घेऊया आजच्या लेखातून...अज्ञाताचे विज्ञान : परामानसशास्त्र (Parapsychology)

अज्ञाताचे विज्ञान : परामानसशास्त्र (Parapsychology) || Psychology
 अज्ञाताचे विज्ञान : परामानसशास्त्र (Parapsychology) || Psychology


अज्ञाताचे विज्ञान : परामानसशास्त्र 


          प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात कधीतरी आपल्या अस्तित्वाविषयी प्रश्न पडला असेलच, आणि कधी तर असंही वाटलं असेल की, "मी खरंच करतोय तरी काय? आणि कशासाठी?" या प्रश्नाची उत्तरं अध्यात्मात आहेतच, पण तरीही , कधी कधी आपण आपल्या अस्तित्वावरच प्रश्न करतो आणि ते प्रश्न पडणं गरजेचं ही असतं.


          आपल्यासारखेच या पृथ्वीतलावर अनेक असेही लोकं आहेत ज्यांना हेच अगदी हेच प्रश्न पडत होते आणि कदाचित त्यांची जिज्ञासा इतकी वाढली की त्यांना या जगात असणाऱ्या अज्ञात गोष्टींचा शोध घ्यावासा वाटला आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी अशा एका शास्त्राचा शोध लावला ज्याला अज्ञाताचे विज्ञान किंवा Parapsychology (परामानसशास्त्र) असे म्हटले जाऊ लागले.


 Parapsychology काय आहे ? 


         खरं तर Psychology सारखंच Para Psychology म्हणता येईल, पण ठळक पणे बघितल्यास लक्षात येतं की, psychology हे फक्त मानवी असितत्वाचा (अर्थात मानवी प्रवृत्तीचा) अभ्यास करते, तर Parapsychology थोडं वेगळ्या बाबीचा अभ्यास करते. त्या बाबी नेमक्या काय आहेत हे पुढे बघूच..पण त्या आधी याची सुरुवात कशी झाली हे बघूया..


 Parapsychology चा उगम 


          खरं तर मानवी मन असित्वात आलं तसंच या शास्त्राची निर्मिती झाली असावी असं वाटतं कारण जसं जसं मानवाला समजायला लागलं तसं तसं प्रत्येक गोष्टीचं कुतूहल त्याच्या मनात निर्माण व्हायला लागलं आणि स्वतःचा, स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न देखील तेव्हापासूनच निर्माण झाला असेलच..म्हणजे हा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, या शास्त्राची मुळं ऐतिहासिक आहेत.

पण प्रथमतः ज्यांनी याला एक पूर्ण रूप दिलं त्यांना याचा जनक म्हणावं लागेल आणि ते आहेत डॉ. जोसेफ बॅंक्स.

डॉ. जोसेफ यांनी 1930 मध्ये extrasensory perception चा वापर करून काही तथ्ये एकत्र केलीत ज्यातून parapsychology म्हणजे काय आणि यात काय काय संशोधन करता येईल हे स्पष्ट झालं.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात कुठल्या बाबींवर संशोधन केलं जातं? तर यात अभ्यासल्या जाणाऱ्या काही बाबी पुढीलप्रमाणे:


1. Precognition

याला intuition किंवा भविष्यवाणी असंही म्हणता येईल. थोडक्यात काय तर भविष्यात होणाऱ्या घटना यात अभ्यासल्या जातात.


2. Clairvoyance : 

याला आपल्याकडे दूरदृष्टी असं म्हटल्या जातं. आपल्या संस्कृती मध्ये आपल्याला अनेक अशा कथा ऐकायला मिळतात ज्यात या गोष्टीचा उल्लेख आढळतो.


3. Telepathy : 

याला मानसिक संकेत प्रक्षेपण तंत्र असंही म्हटल्या जातं. (याबाबत अधिक माहिती साठी आमचं telepathy वरचं article वाचा)


4. Extrasensory perception (ESP) : 

असं म्हणतात की आपल्याला असेही काही इंद्रीय आहेत ज्याद्वारे आपण अज्ञात गोष्टींचा शोध घेऊ शकतो, त्याच इंद्रियांद्वारे शोध घेण्याची प्रक्रिया म्हणजे ESP. (याबाबत लवकरच एक लेख प्रस्तुत करणार आहोत.)


5. Telekenesis : 

वस्तुंना control करण्याची शक्ती. असं म्हणतात की sixth sense जागृत झाला की ही शक्ती आपल्याला मिळते. ( याबाबत आमचं telekensis article वाचा म्हणजे ही बाब लक्षात येईल)


6. Outer Body experience (OBE) :  

ही एक अशी पध्दत आहे ज्यात आपला consciousness आपल्या शरीरातून वेगळा करता येऊ शकतो. (याबद्दलही आमचं article आलेलं आहे आपण blogs वर हे सर्व वाचू शकता)


तर थोडक्यात सांगायचं झालं तर, parapsychology हे असं एक शास्त्र आहे जे आपलं मन आपलं अस्तित्व याच्याही पलीकडे जाऊन मानवी बुद्धीला अज्ञात असणाऱ्या गोष्टींचा शोध घेतं आणि त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतं. 

कदाचित भविष्यात आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील आणि कदाचित तो काळ मानवी अस्तित्वासाठी विकसनशील काळ म्हणून ओळखल्या जाईल.




लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98



Instagram :
@gtushar111 



सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 

या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi




➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !! 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने