राष्ट्रवादीला विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा : रामदास आठवले || Marathi news
मुंबई : रामदास आठवले रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष (Republican Party of India) आणि केंद्रीय मंत्री हे आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहत असतात. काँग्रेसच्या पक्षाच्या अध्यक्षते बाबात सध्या चर्चा सुरू असतांना आपण पाहिले त्यातच रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एक सूचना केली आहे. राष्ट्रवादी पक्षाला (Nationalist Congress Party) काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवारांना (Sharad Pawar) काँग्रेसचे अध्यक्ष करा अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यांच्या या सूचनेची राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा होत आहे.
राष्ट्रवादीला विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा : रामदास आठवले || Marathi news |
सध्या राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नाहीत तसेच सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत.काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही. त्यामुळे माझी काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
रामदास आठवलेंनी केलेले ट्विट :
काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेस चे अध्यक्ष करावे.याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनीघ्यावा.@PawarSpeaks@RahulGandhi— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 5, 2020
काँग्रेस हा या देशातील मोठा आणि जुना पक्ष आहे. मात्र या पक्षाला सध्या सक्षम द्रष्टे नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसचे पानिपत झाले आहे. कधी काळी ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष आता १०० खासदार ही निवडून आणू शकत नाही. त्यामुळे काँग्रेस चे अध्यक्ष पद सांभाळण्यास कुणी पुढे येत नाही. अशा परिस्थितीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस मध्ये विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार यांना बहाल करावे. माझ्या या सूचनेबाबतचा निर्णय सर्वस्वी काँग्रेस आणि शरद पवार यांनी घ्यावा,असेही आठवले म्हणाले.
काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र गांधी घराण्याशिवाय एखादी व्यक्ती अध्यक्षपदी यावी असंही त्यांनी म्हटलं होतं.
कुणीही मात्र त्यासाठी तयार नाही. तर काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती. मात्र ती त्यांनी मान्य केली नाही.तर गुलाम नबी आझाद यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांनी सोनियांना पत्र पाठवून काही सूचना केल्या होत्या. या पत्राने काँग्रेसमध्ये खळबळ माजली होती .आता पुढचे सहा महिने सोनिया गांधी याच अध्यक्ष राहणार असून त्यानंतर निवडणुका होणार आहेत असे चित्र दिसत आहे. काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असल्याचे पाहायला मिळते.
➤ WhatsApp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
🔅 हे तुम्ही वाचायला हवं :
१) या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )
२) ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ
3) फेवीक्वीक ( Fevi kwik ) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ?
१) या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )
२) ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ
3) फेवीक्वीक ( Fevi kwik ) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ?
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा