SSR Suicide Case: मला संजय राऊतांनी धमकी दिली ; कंगना राणौत || Marathi news


मुंबई:     कंगना राणौत (Kangana Ranaut)ने ठाकरे सरकारसह मुंबई पोलिसांवर सातत्यानं निशाणा साधला असून बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणावरून (SSR Suicide Case) अभिनेत्री कंगना राणौत आणि राज्य सरकारमध्ये टीकास्त्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
SSR Suicide Case: मला संजय राऊतांनी धमकी दिली ; कंगना राणौत || Marathi news
SSR Suicide Case: मला संजय राऊतांनी धमकी दिली ; कंगना राणौत || Marathi news

          कंगना राणौत ने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आरोप केला होता कि , "आपल्याला मुंबईत परतू नये यासाठी धमकी दिली होती " याला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना म्हंटल आहे. "ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा आणि तुमच्याकडे असलेले पुरावे त्यांना द्या"

कंगना राणौत यांचे ट्विट :



          मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं काही दिवसांपूर्वीच कंगनाने ट्विट (Tweet) केलं होतं. संजय राऊत यांनी आपल्याला धमकी असल्याचा दावा देखील तिनं केला. ' मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,' असा सवाल कंगनानं ट्विटर (Twitter) च्या माध्यमातून उपस्थित केला.


         मुंबई पोलिसांवर कंगनानं याआधी हि अविश्वास व्यक्त केला होता. ' गेल्या 100 तासांहून अधिक काळापासून कंगना राणौत ड्रग माफियांची पोलखोल करण्यास तयार आहे. तिला पोलीस सुरक्षेची गरज आहे.महाराष्ट्र सरकार ते पुरवत नाही,' असं ट्विट भाजप आमदार राम कदम यांनी केलं होतं. यावर कंगनाने  माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत आहे. मुंबईमध्ये मला हिमाचल प्रदेश सरकार किंवा केंद्र सरकारची सुरक्षा हवी, मुंबई पोलिसांची नको, असं उत्तर दिलं. राम कदम यांनी कंगनाच्या वक्तव्याला दुजोरा दिला.


➤ आणखी वाचा : सैन्यदलात (SSB Recruitment) 1522 जागांची मोठी भरती, 70 हजार रुपयांपर्यंत वेतन


          मुंबई पोलिसांबद्दल कंगनाने केलेल्या ट्विटचा नेटकऱ्यांनी प्रत्युत्तर देत समाचार घेतला. फुकटच्या प्रसिद्धीसाठी काहीही बोलू नकोस, मुंबई पोलिसांवर विश्वास नसेल तर मुंबईत महाराष्ट्रात राहू नकोस, येथून निघून जा, असा सल्ला देत तिचा निषेध व्यक्त केला.


         कंगनाने एका मुलाखतीत रिया चक्रवर्ती ही एक प्यादे आहे. तिला सुशांतला पैशांसाठी वापरले असेल. फिल्म मिळविण्यासाठी किंवा त्याला ड्रग देण्यासाठी. पण रियाच्या मागे कोण मास्टरमाईंड आहे, आपल्याला जाणून घ्यायला हवं, असे म्हंटले आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे कारण या प्रकणात अनेक नेते मंडळी व सिने अभिनेते उडी घेताना दिसत आहेत.


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi



➤ WhatsApp Updates साठी * 9284678927 या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.





          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने