Amazon वरून Order केला दीड लाखांचा Camera , काय आलं पाहा हा Viral Video || Marathi news
Amazon वरून Order केला दीड लाखांचा Camera , काय आलं पाहा हा Viral Video || Marathi news |
काही जणांना विडिओ करून आपण मागविलेल्या वस्तूंचे अनबॉक्सईंग (Unboxing) करण्याची आवड असते , आता ऑनलाइन शॉपिंगमध्येही हैराण करणारी एक बातमी (Marathi news) समोर आली आहे. सुमित चौहान यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट अमेझॉन (Amazon) वरून (Panasonic Lumix GH5) नावाचा कॅमेरा मागविला होता. ज्या कॅमेऱ्याची किंमत लाखांच्या घरात होती. सुमित यांनी त्यांनी मागवलेल्या कॅमेऱ्याचे अनबॉक्सइंग (Camera unboxing) करत विडिओ बनवला आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच भेटला.
Sumit Chauhan यांनी केलेले Tweet :
#Fraud_by_Amazon मैंने @amazonIN को Panasonic Lumix GH5 कैमरे के लिए 1.40 लाख रुपये दिए और बदले में @amazon मुझे फटे-पुराने जूते और पत्थर से भरा बॉक्स पकड़ा गया। अमेज़न इंडिया हेड @AmitAgarwal ने शायद तरक्की का नया रास्ता निकाला है। pic.twitter.com/iTunT6uwbc— Sumit Chauhan (@Sumitchauhaan) September 3, 2020
27 ऑगस्ट रोजी अमेझॉनवरून सुमितने आपल्या क्रेडिट कार्डावरुन 1.40 लाखांचा कॅमेरा बुक केला होता. कॅमेरा जेव्हा घरी आला तेव्हा त्याने तोंडात बोटंच घातली. अमेझॉनहून डिलीव्हरी (Amazon Delivery) झालेले बॉक्समध्ये जुने शूट आणि दगड होते. यामध्ये चांगली बाब म्हणजे सुमितने अमेझॉनच्या पॅकेटची अनबॉक्सींगचा व्हिडीओ (Unboxing video) रेकॉर्ड केला होता. ज्यामध्ये बॉक्स उघडला तेव्हा त्यात कॅमेरा नव्हता तर फाटलेले जुने शूज आणि दगड एका पॅकेट मध्ये गुंडाळलेले होते .
Viral Video :
सुमितने पॅकेटमध्ये फाटलेले शूट आणि दगड मिळाल्यानंतर पॅकेटवर दिलेल्या डीलरच्या नंबरवर फोन केला. ज्यावर डिलरने सुमितला उत्तर दिले की त्यांच्याकडून तर खरा कॅमेरा पाठविण्यात आला होता. डीलरचं उत्तर मिळाल्यानंतर त्यांनी अमेझॉनशी संपर्क (Amazon customer care) केला. अनेकदा इमेल केल्यानंतर अमेझॉनने उत्तर दिलं की ते या प्रकरणाचा तपास करीत आहे. ग्राहकांच्या या अनुभवासाठी त्यांनी माफी मागितली आहे. असेच अनेक प्रकार खूप वेळा पाहायला व अनुभवायला मिळतात त्यामळे ऑनलाईन शॉपिंग करत असताना विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते.
➤ WhatsApp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
🔅 हे तुम्ही वाचायला हवं :
१) या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )
२) ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ
3) फेवीक्वीक ( Fevi kwik ) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ?
१) या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )
२) ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ
3) फेवीक्वीक ( Fevi kwik ) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ?
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा