Amazon वरून Order केला दीड लाखांचा Camera , काय आलं पाहा हा Viral Video || Marathi news


4 सप्टेंबर :     देशातील अनेक भागात लॉकडाऊन अद्याप सुरू आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे वैश्विक महामारी कोरोना (Covid १९) . कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती खिळखिळी आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लोक या दिवसात घरातून बाहेर पडणे टाळत आहेत तसेच मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॉपिंग (Amazon Online shopping) करीत आहेत. काही वेळा तुम्ही काही अशा बातम्या पाहिल्या असतील जश्या कि , मागवला मोबाईल फोन आणि आला साबण...(Viral Video) या बातम्यांमधून किती तथ्य आहे हे समजणे अवघड होत.
Amazon वरून Order केला दीड लाखांचा Camera , काय आलं पाहा हा Viral Video || Marathi news
Amazon वरून Order केला दीड लाखांचा Camera , काय आलं पाहा हा Viral Video || Marathi news

          काही जणांना विडिओ करून आपण मागविलेल्या वस्तूंचे अनबॉक्सईंग (Unboxing) करण्याची आवड असते , आता ऑनलाइन शॉपिंगमध्येही हैराण करणारी एक बातमी (Marathi news) समोर आली आहे. सुमित चौहान यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट अमेझॉन (Amazon) वरून (Panasonic Lumix GH5) नावाचा कॅमेरा मागविला होता. ज्या कॅमेऱ्याची किंमत लाखांच्या घरात होती. सुमित यांनी त्यांनी मागवलेल्या कॅमेऱ्याचे अनबॉक्सइंग (Camera unboxing) करत विडिओ बनवला आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच भेटला.

Sumit Chauhan यांनी केलेले Tweet :


          27 ऑगस्ट रोजी अमेझॉनवरून सुमितने आपल्या क्रेडिट कार्डावरुन 1.40 लाखांचा कॅमेरा बुक केला होता. कॅमेरा जेव्हा घरी आला तेव्हा त्याने तोंडात बोटंच घातली. अमेझॉनहून डिलीव्हरी (Amazon Delivery) झालेले बॉक्समध्ये जुने शूट आणि दगड होते. यामध्ये चांगली बाब म्हणजे सुमितने अमेझॉनच्या पॅकेटची अनबॉक्सींगचा व्हिडीओ (Unboxing video) रेकॉर्ड केला होता. ज्यामध्ये बॉक्स उघडला तेव्हा त्यात कॅमेरा नव्हता तर फाटलेले जुने शूज आणि दगड एका पॅकेट मध्ये गुंडाळलेले होते .


Viral Video :



          सुमितने पॅकेटमध्ये फाटलेले शूट आणि दगड मिळाल्यानंतर पॅकेटवर दिलेल्या डीलरच्या नंबरवर फोन केला. ज्यावर डिलरने सुमितला उत्तर दिले की त्यांच्याकडून तर खरा कॅमेरा पाठविण्यात आला होता. डीलरचं उत्तर मिळाल्यानंतर त्यांनी अमेझॉनशी संपर्क (Amazon customer care) केला. अनेकदा इमेल केल्यानंतर अमेझॉनने उत्तर दिलं की ते या प्रकरणाचा तपास करीत आहे. ग्राहकांच्या या अनुभवासाठी त्यांनी माफी मागितली आहे. असेच अनेक प्रकार खूप वेळा पाहायला व अनुभवायला मिळतात त्यामळे ऑनलाईन शॉपिंग करत असताना विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते.



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi



➤ WhatsApp Updates साठी * 9284678927 या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.





          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने