Post Office मध्ये 1300 पेक्षा जास्त जागांसाठी भरती ! कसा कराल अर्ज ? || Marathi news
कोरोना सारख्या महामारी (Corona) आणि लॉकडाऊन (Lockdown) च्या काळात ज्या लोकांनी आपला रोजगार गमावला आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे , भारतीय डाक (Indian post) विभागाने मोठी भरती उपलब्ध करुन दिली आहे. महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती २०२० (Maharashtra Post Office Recruitment 2020) , महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती २०२० (Maharashtra Postal Circle Bharti, Maharashtra Post Office Bharti 2020) साठी 1371 पोस्टमन (Postman), मेल गार्ड (Mail Guard), मल्टी टास्किंग स्टाफ पोस्ट्स (Multi Tasking Staff Posts) भरती सुरु करण्यात आली आहे . #khasmarathi_jobs #Majhi_naukri.
Post Office मध्ये 1300 पेक्षा जास्त जागांसाठी भरती ! कसा कराल अर्ज ? || Marathi news |
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या पण आता स्तिथी पूर्ववत होत असून यातच लोकांसाठी आता रोजगाराची वेगवेगळी क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. खासगी कंपन्या व सरकारी कंपन्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करुन देत आहेत. या महामारीच्या कोरोना (Corona) आणि लॉकडाऊन (Lockdown)च्या काळात ज्यांनी रोजगार गमावले आहेत त्यांच्यासाठी भारतीय डाक विभागाने मोठी रोजगार संधी उपलब्ध करुन दिली आहे. भारतीय डाक (Indian post) विभागाच्या महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये पोस्टमन (Postman) आणि मल्टिटास्किंगच्या 1371 जागांवर भरती करण्यात येणार आहे त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
महाराष्ट्र पोस्टल सर्कल रिक्रूटमेंट (Maharashtra Postal Circle Recruitment) ऑफिस, पोस्ट ऑफिस, इंडिया पोस्ट म्हणून व्यापार करणारी, ही भारतातील एक सरकारी संचालित टपाल प्रणाली आहे जी वाणिज्य मंत्रालयाची उपकंपनी आहे. सामान्यत: भारतात “पोस्ट ऑफिस” म्हणून ओळखले जाते, ही जगातील सर्वाधिक प्रमाणात वितरित केलेली पोस्टल सिस्टम आहे.
🔅 अर्ज कसा करायचा ?
➤ majhi naukri विभागातील पहिल्याच पोस्ट वर क्लिक करा व अर्ज करा.
➤ पोस्टाच्या नोकरीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
➤ परीक्षा शुल्क 400 रुपये आणि अर्जासाठी 100 रुपये असे एकूण 500 रुपये उमेदवारांना भरायचे आहेत.
➤ महिलासांठी आणि जो आरक्षित प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.
➤ अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबरपर्यंत आहे तरी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.
हे वाचा - SSB सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती
🔅 जागांसाठी पगार किती असेल ?
➤ पोस्टमन - मेल गार्ड या पदांसाठी 21,700 ते 69100 रुपये पगार
➤ मल्टि टास्किंग स्टाफ - या पदांसाठी 18,000 ते 56,900 रुपये पगार देण्यात येईल.
🔅 शैक्षणिक अटी कोणत्या?
➤ मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण
➤ मराठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक, दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात होणं आवश्यक
➤ संगणक वापरता येणं आवश्यक
➤ पोस्टमन पदांसाठी टूव्हिलरचं लायसन्स गरजेचं
➤ लायसन्स नसल्यास 2 वर्षाच्या आत लायसन्स काढणं आवश्यक
पोस्ट खात्यात राज्यभरातून 1029 पदे पोस्टमनपदासाठी उपलब्ध असतील तर मेल गार्ड पदासाठी 15 पदांची भरती आहे. 32 पदे ऐडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर या पदासाठी उपलब्ध आहेत. तसंच सबऑर्डिनेट ऑफिसर या पदासाठी 295 पदे उपलब्ध आहेत. पोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी 18 ते 27 वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 18 ते 25 वर्षाची मर्यादा मल्टिटास्किंग स्टाफच्या पदांसाठी आहे. SC, ST, PWD प्रवर्गांसाठी वयाच्या मर्यादेमध्येखास सवलत देण्यात आली आहे. तुम्ही सरकारी नोकरीसाठी उत्सुक असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची मुदत सुरू झाली आहे.
➤ WhatsApp Updates साठी * 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.
🔅 हे तुम्ही वाचायला हवं :
१) या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )
२) ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ
3) फेवीक्वीक ( Fevi kwik ) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ?
१) या देशात पडतो चक्क Fish Rain..! ( आकाशातून पडतात मासे )
२) ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ
3) फेवीक्वीक ( Fevi kwik ) बाटलीच्या आतील भागास का चिटकत नाही ?
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा