ध्यानाचा (Meditation) प्राथमिक आयाम : निश्चल मन अवस्था (The State of Still Mind)|| Psychology


          मनुष्यमात्राची निर्मिती झाली तेव्हापासून त्याला जिज्ञासा  मिळालेली आहे. ती जिज्ञासापूर्ती करण्यासाठी तो नवनवीन युक्त्या लढवून कायम काही ना काही शोध घेण्याचा प्रयत्न करतोच आहे. त्याला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून अनेक अद्भुत असे शोध मानवाने आजपर्यंत लावलेत, पण ते शोध घेतानाच त्याला आपल्या अंतरंगातील एका विशाल आणि अद्भुत अशा दुनियेची ओळख व्हायला लागली आणि ती ओळख त्याला आणखी एक नवीन जिज्ञासा देऊन गेली.


          या नवीन जिज्ञासेमुळे त्याला आपल्या अंतरंगातील नवनवीन गोष्टींचा उलगडा होऊ लागला, त्यातूनच ध्यान, योग, आणि यासारख्या असंख्य गोष्टी निर्माण होऊ लागल्या. या निर्माण झालेल्या गोष्टी आज आपल्यात रुजलेल्या आपल्याला दिसून येतात. याविषयी आज अधिकाधिक संशोधन होऊ लागले. 


          जेव्हा एखाद्या गोष्टीवर संशोधन होतं तेव्हा त्यातील समस्यां सुद्धा लक्षात यायला लागतात. अशाच एका छोट्या समस्येबाबत आजच्या लेखातून आपण The primary dimension of meditation : the state of still mind बद्दल जाणून घेणार आहोत.

ध्यानाचा (Meditation) प्राथमिक आयाम : निश्चल मन अवस्था (The State of Still Mind)|| Psychology
ध्यानाचा (Meditation) प्राथमिक आयाम : निश्चल मन अवस्था (The State of Still Mind)|| Psychology


🔅 ध्यान आणि विचार ( Meditation and thoughts ) 🔅


          जेव्हा कधी आपण ध्यान करायला लागतो, तेव्हा खूप प्रयत्न करुनही कधी कधी आपल्या डोक्यात असंख्य विचार यायला लागतात. आपण प्रयत्न करतो त्या प्रयत्नांत श्वासावर नियंत्रण, banurial beats, किंवा ओंकार याद्वारे विचार थांबवण्याचा प्रयत्न केला जातो, पण जेवढा जास्त आपण प्रयत्न करू तेवढेच जास्त विचार यायला लागतात आणि मग कालांतराने कंटाळून आपण ध्यान बंद करतो.याबाबद्दल थोडं आणखी जाणून घेऊया... 


          उदाहरणार्थ तुम्ही ध्यान करतांना ठरवलं की आज आपण स्थिर अवस्थेकडे जायचं, पण जेव्हा तुम्ही ध्यान करणं सुरू करता तेव्हा थोडावेळ तुमचं मन एका ठिकाणी केंद्रित होतं, पण नकळत तुमचं मन एकतर भूतकाळात जातं किंवा मग भविष्यकाळात...अनेकदा तर असंही होतं की तुम्ही येणाऱ्या विचारांसोबत वाहवत जाता आणि कितीतरी वेळ त्याच विचारांसोबत एखाद्या स्वप्नवत स्थितीमध्ये राहता.


          खरं तर हीच समस्यां आहे कारण तसं नेहमीच होत असेल तर तुम्हाला ध्यानाचे योग्य ते फायदे मिळणार नाहीत आणि तुम्ही कालांतराने यात काही होत च नाही असा पूर्वग्रह करून बसाल.


◾ निश्चल मन अवस्था


          खरं तर बऱ्याचदा हा प्रश्न उदभवतो की ध्यान वगैरे तर ठीक आहे पण मन कसं शांत करता येईल आणि ही जी निश्चल मन अवस्था आहे ती कशी मिळवता येईल? तर या प्रश्नाचं उत्तर खरं तर एका कथेद्वारे सांगता येईल..


          एका गावात एक जादूगार आला आणि त्याने लोकांसमोर दावा केला की त्याने एक असा भूत पकडलाय जो कायम काम करू शकतो. योगायोगाने एका श्रीमंत शेठजी ची आणि त्याची ओळख झाली.


          त्याने शेठजी ला तो भूत दाखवला, त्यावर शेठजी म्हणाले, की "हा भूत काय काम करतो?" त्यावर तो जादूगार उतरला "यात अशी शक्ती आहे की , हा कोणतेही काम एका क्षणात पूर्ण करून टाकतो" शेठजी ते ऐकून विचार करू लागले की जर आपण हा भूत घेतला तर आपले बरेच व्यवसाय आहेत ते सगळे व्यवसाय आणि त्याची सगळी कामे याच्याकडून करवून घेऊ.

ध्यानाचा (Meditation) प्राथमिक आयाम : निश्चल मन अवस्था (The State of Still Mind)|| Psychology
ध्यानाचा (Meditation) प्राथमिक आयाम : निश्चल मन अवस्था (The State of Still Mind)|| Psychology


          व्यवहार झाला आणि त्याची किंमत ठरली ती फक्त पाचशे रुपये, त्यावर शेठजी चकित झाले आणि त्याला विचारलं की "याची किंमत एवढी कमी का?" त्यावर तो उत्तरला, "याचे असंख्य गुण आहेत, पण एक दोषही आहे याला जर काम मिळालं नाही तर हा मालकाला खाऊन टाकतो..!"


          पण शेठजी ने विचार केला की आपले तर इतके कामं आहेत याला प्रत्येक क्षणाला काही ना काम राहील आणि हा भूत मरेल पण काम संपणार नाही, आणि त्यांनी तो भूत खरेदी केला.भूत खरेदी केल्यावर तो भूत लगेच कामाची मागणी करू लागला..शेठजी तयारच होते, त्यांनी लगेच त्याला कामं देऊन टाकले, पण ती कामं लगेच काही क्षणातच पूर्ण होऊ लागली आता मात्र शेठजी घाबरले आणि त्यांना त्या भुताला काय काम द्यावं हे सुचेनासं झालं.


          योगायोगाने त्यांच्याकडे एक संत आले आणि शेठजी नी त्यांना ही गोष्ट सांगितली.संत म्हणाले , "त्या भुताला सांग की एक मोठा बांबू आपल्या अंगणात आणून गाड आणि जेव्हा मग जेव्हा काम असेल तेव्हा त्याच्याकडून काम करवून घे आणि काम नसेल तेव्हा त्याला त्या बांबू वर चढायला आणि उतरायला सांग..!" शेठजी ने तसंच केलं आणि ते सुखात राहू लागले.


          खरं तर या कथेतला भूत म्हणजे आपलं मन. सर्वांत जास्त जटिल असणारी संरचना...नेहमीच काही ना काही करत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागतं..त्याला शांत बसवणं हे शक्य नाही म्हणून तुम्हाला तुमचा श्वासरूपी बांबू गाडून ठेवावा लागतो जेव्हा जेव्हा आपलं मन हे विचलित व्हायला लागेल तेव्हा तेव्हा तुम्हाला आपल्या श्वासावर नियंत्रण करून आपलं मन तिकडे वळवावं लागेल. 


◾ अवस्थेत जाण्याची तयारी :


          जेव्हा तुम्ही निश्चल मन अवस्थेत जाण्याची तयारी कराल तेव्हा मनाला काहीतरी काम देणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ जर तुम्हाला Deep Meditative State मध्ये जायचं असेल तर, सर्वात आधी श्वासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं राहील..हळूहळू तुम्ही याचा सराव सुरू केला की तुमच्या लक्षात येईल की तुमचं मन हे स्थिरावत आहे. याबाबत आणखीही बरेच असे उपाय करता येतील ज्यामुळे तुमचं मन स्थिर होऊन निश्चल मन अवस्था प्राप्त होईल त्याबाबत काही Points बघूया..

1. Mind Diversion Technique

          यात तुम्हाला तुमचे विचार आणि त्यावर होणारी तुमची प्रतिक्रिया यावर लक्ष ठेवावं लागेल हळूहळू येणाऱ्या विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वारंवार Mind एका विचारवरून दुसऱ्या विचारावर न्यावा लागेल.

2. Breathing

          श्वासावर लक्ष केंद्रित करून जेव्हा जेव्हा मन अस्थिर होईल तेव्हा तेव्हा आपल्याला श्वास नियंत्रित करायचा आहे असा विचार करून श्वासावर लक्ष केंद्रित करा हळूहळू विचार कमी होऊन मन स्थिर झालेलं तुमच्या लक्षात येईल.

3. Active Meditation

           मन शांत करण्यासाठी सक्रिय ध्यान खूप महत्त्वाचं ठरतं. जसं की चालताना चालण्यावर ध्यान केंद्रित करणं किंवा एखादं काम करताना फक्त त्या कामावर च लक्ष केंद्रित करणं याला सक्रिय ध्यान म्हणतात. (यावर एक विस्तृत लेख लवकरच आपल्यासमोर येईल.)
 

          थोडक्यात सांगायचं झालं तर, निश्चलमन अवस्था ही ध्यानाच्या आयामातील एक प्राथमिक गोष्ट असून ध्यान साधनेचे सर्व फायदे घ्यायचे असतील तर ही अवस्था यशस्वीरीत्या आत्मसात करणं गरजेचं आहे. एकदा का ही अवस्था प्राप्त झाली की ध्यान सोयीस्कर झालंच म्हणून समजा..!




लेखन : ✍ Prof. Tushar Gopnarayan   
             ◾   MA Psychology +Net


FB : Tushar Gopnarayan  Or 
➤ https://www.facebook.com/tushar.gopnarayan.98



Instagram :
@gtushar111 



सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 

या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi




➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !! 




4 टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. Always welcome sir. वेळ काढून तुम्ही दिलेल्या अभिप्राय (feedback) बद्दल मनापासून आभार 🙏

      हटवा
  2. मला मन एकाग्रते विषयी आणखी माहिती हवी आहे कृपा करून सांगा माझा नंबर आहे 99 23 450 513 विकास जोशी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने