घरच्या घरी कोल्ड कॉफी कशी बनवाल ।।Infotainment
घरच्या घरी कोल्ड कॉफी कशी बनवाल ।।Infotainment |
नमस्कार खास कोल्ड कॉफी (cold coffee)शौकीनसाठी आज आम्ही कोल्ड कॉफी कशी बनवतात याची रेसिपी घेऊन आलो आहोत तर खालील कृती बघा आणि घरच्या घरी कोल्ड कॉफी (cold coffee)बनवा .
साहित्य
● 1/2 लीटर थंड दूध
● 3 कॉफी छोटे पाकिटस
● 1 टेबलस्पुन चॉकलेट सिरप
● 1/ 2 कप चुर्ण साखर
● डार्क कम्प्पाउंंड चॉकलेेेट
कृती :-
● प्रथम मिक्सरच्या भांड्यात अर्ध्या लिटर थंड दूध घेऊन त्यात कॉफी पावडर , साखर टाकून, मिक्सरवर फिरवून घ्यावे. मग त्यात चॉकलेट सिरप आपल्या आवडीप्रमाणे मिक्स करावे. आणि परत 1 मिनिट मिक्सरला फिरवून घ्यावे.
● मग एका काचेच्या ग्लास मध्ये चॉकलेट सिरप घालवून घ्यावे व त्यात वरील मिश्रण ओतून घ्यावे. ग्लासवर वरून थोडीशी कॉफी भुरभुरावी. मस्त फेसाळ कोल्ड कॉफी तयार आहे. ही एक पद्धत आहे करायची.
● किंवा काचेच्या ग्लास मध्ये कोल्ड कॉफी घेऊन त्यावर डार्क कम्प्पाउंंड चॉकलेट टाकून त्यामध्ये आवडत असेल तर ice cube टाकून मस्त कोल्ड कॉफी चा आस्वाद घ्यावा.
टिप्पणी पोस्ट करा