फुटबॉल बद्दलची काही माहित नसलेली रोचक तथ्ये ।।Sports news
आपल्यापैकी बरेच जण असतील ज्यांना फुटबॉल खेळायला आवडत असेल पण त्या मागची कथा माहित नसेल आज आपण या खेळाची ओळख आणि त्यामागचा इतिहास पाहणार आहोत तर चला माहिती घेऊ .
◆ खेळाची ओळख ● फुटबॉल किंवा सॉकर- एक जोशपूर्ण आणि चित्तथरारक खेळ ! सध्या त्याची सगळीकडे चर्चा चालू आहे. मार्च 2019 मध्ये " रियल माद्रीदला " "अजाक्सच्या " संघाने त्यांच्या मैदानावर हरवले आणि ९ वर्षानी " रियल माद्रीद" कवार्टर फायनलच्या बाहेर फेकले गेले. केव्हढा जल्लोष केला "अजाक्सच्या" संघाने !
● असा जगातील ८० करोड लोक अतिशय उत्कंठेने पाहात असलेला हा ' फुटबॉल ' खेळ क्रिकेटपेक्षाही प्रचंड लोकप्रिय आहे .
● युरोप आणि दक्षिण अमेरिकेत हा सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ आहे .आजकालचे तरुण पोर्तुगालच्या ' रोनाल्डो' आणि अर्जेन्टिनाच्या 'मेस्सी'साठी वेडे झालेले असतात.ह्या वेगवान खेळात जोशपण आहे . कौशल्यपण आहे व थोडीफार हिंसा आहे !

◆ खेळाचा इतिहास
● इंग्लडमध्ये पब्लिक स्कूल मध्ये १८६३ मध्ये रस्त्यावर हा खेळ खेळला जायचा.कारण विध्यार्थ्यांच्या क्षमता वाढविणे हा हेतू होता.तसेच सैनिकांना फिटनेससाठी हा खेळ खेळला जायचा.
● तथापि ह्याहीआधी चीन मध्ये इसवी सन दुसऱ्या किंवा तिसऱ्यापूर्वी ' हान' वंशाच्या दरम्यान हा खेळ 'सुजू ' ह्या नावाने खेळला जायचा.ह्याचेच जपानी रूप म्हणजे 'केमारी' जो असुका ह्या काळात खेळला जात होता ह्या खेळामध्ये बरेच लोक गोलाकार उभे राहून एकमेकांकडे बॉल फेकत असत. तसेच ग्रीक आणि रोमन लोकपणा बॉलच्या खेल खेळत होते .
● १५८३ मध्ये जॉन डेविस ह्या ब्रिटिश खलाशाने एक एस्कीमोबरोबर बर्फात फुटबॉल खेळल्याचे लिहले आहे. वसाहतवादी ब्रिटिशांनी जुन्या अमेरिकेत आणि लोक मुंंगुस सारख्या प्राण्यांच्या कातड्यापासून केलेल्या बॉलशी खेळत असल्याचे लिहिले आहे. अशा रीतीने पुरातन काळापासून मानवाला ह्या खेळाचे आकर्षण आहे.
● ब्रिटनमध्ये ९ व्या शतकापासून ह्याच्या मॉचेस होऊ लागल्या. तसेच फ्रांस मध्ये १२ व्या शतकात
"ला सौल " हा खेळ खेळत होते.
● सुरवातीला खूप लोक मिळून खेळत होते त्याला "मॉब फुटबॉल " म्हणत, हा दोन गावांमध्ये सामना होत असे त्यात जनावरांचे मूत्राशय फुगवून बॉल तयार केला जात होता .
● इंग्लडमध्ये उच्च वर्गाच्या लोकांमध्ये हा खेळ खेळला जायचा. १३ व्या शतकात किंग एडवर्ड ने ह्या खेळावर
बंदी घातली आणि १४ व्या शतकात किंग हेन्रीने फुटबॉलसाठी पैसे मागण्यास बंदी घातली. १५व्या शतकात नॉटीगहॉमशायर येथे फुटबॉलला "किकिंग गेम" म्हणून खेळला.
बंदी घातली आणि १४ व्या शतकात किंग हेन्रीने फुटबॉलसाठी पैसे मागण्यास बंदी घातली. १५व्या शतकात नॉटीगहॉमशायर येथे फुटबॉलला "किकिंग गेम" म्हणून खेळला.
● अशा प्रकारे खेळाचे रूप बदलत बदलत २१ व्याशतकात जवळपास १८० देशात २०० मिलियन खेळाडु हा खेळ खेळतात !
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा