भारतात भयंकर कोरोना, तरीही आयपीएल सुरू, तुम्हाला काहीच नाही का वाटत? गिलख्रिस्ट गरजला
देशभरात कोरोनाने इतके भयंकर थैमान घातलं असताना, दररोज शेकडो नव्हे हजारो नव्हे तर लाखांमध्ये जाणारी इतकी प्रचंड कोरोना बाधितांची संख्या वाढलेली असताना न जाणो कित्येक रुग्णांचा मृत्यू होतच आहे. इतकं सगळ सुरु असताना देखील दुसरीकडे आयपीएल सुरूच आहे.
ॲडम गिलख्रिस्ट |
अनेकजण यावर प्रश्न उपस्थित करीत असले तरी युवा पिढी मात्र आयपीएल चा आनंद घेण्यातच गुंतून गेलेली आहे. बेरोजगारी, आरोग्य सुविधांचा अभाव यांसारख्या मुलभूत प्रश्नांचा तर अनेकांना विसरच पडून गेलेला असताना मात्र एका मोठ्या क्रिकेटपटूने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. हा गरजणारा क्रिकेटपटू म्हणजे कोणी भारतीय खेळाडू नसून ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्ट आहे.
सर्वत्र भारताच्या आयपीएल सुरु असलेल्या चर्चेवरुन ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्टने ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहे. भीतीदायक कोरोना असतानाही भारतात आयपीएल सुरु आहे, असे गिलख्रिस्टने ट्विट करत म्हटले आहे.
भारतीयांना माझ्या शुभेच्छा. कोरोनाची भितीदायक संख्या असताही आयपीएल सुरु आहे. हे योग्य आहे का? प्रत्येक रात्री तुम्ही हे पाहून विचलित होतात का? याबाबत आपले विचार काय आहे. माझ्या प्रार्थना आपल्या बरोबर आहे, असे ट्विट गिलख्रिस्टने केले आहे. त्यामुळे आता सगळीकडे त्याच्याच ट्विटची चर्चा सुरु आहे.
दरम्यान, संपूर्ण भारतात झपाट्याने रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. शनिवारीच कोरोनाचे ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. तर २६२४ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड मोठी वाढ होत चालली आहे. काल ६७ हजार १६० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ६७६ कोरोना रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहे. अत्यावश्यक असे सर्व निर्णय राज्य सरकार वेळोवेळी घेत असून देखील रुग्णसंख्या मात्र झपाट्याने वाढतच आहे.
महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या नवीन निर्देशानुसार आता, १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना कोरोनावरील लस देण्यात येणार आहे. याबाबत अधिक सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून वाचा :-
टिप्पणी पोस्ट करा