COVID-19 : 'आता मास्क लावण्याची गरज नाही!' इस्त्रायल नंतर 'या' मोठ्या देशाने नागरिकांना दिली साद! Marathi News
कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात कोरोना संकटाने अतिशय त्रस्त झालेल्या अमेरिकन नागरिकांना दिलासा देणारी एक नवी बातमी आली आहे.
पूर्णपणे कोरोना लसीकरण करून घेतलेल्या अमेरिकन नागरिकांना आता गर्दीची ठिकाणे सोडून इतर ठिकाणी मास्क लावण्याची आवश्यकता नसल्याचं तेथील आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.भारताप्रमाणेच अमेरिकेत सुद्धा कोरोनामुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. मात्र आता अमेरिकेतील परिस्थिती पुनःश्च एकदा सामान्य होत आहे.
अमेरिकेची प्रमुख आरोग्य संस्था सीडीसी ने स्पष्टपणे अमेरिकन नागरिकांना मास्क न घालण्याची सूचना केली आहे. जाहीर केली आहे. ज्या अमेरिकन नागरिकांनी कोरोना लसीकरण पूर्णपणे केलं आहे अशांनी अनोळखी लोकांची गर्दी सोडून इतरत्र मास्क घालण्याची गरज नाही असे म्हटले आहे.
यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सुद्धा खालीलप्रमाणे ट्विट करत यावर शिक्का मोर्तब केलेलं आहे.
When the CDC says you don’t have to wear a mask outside if you’re fully vaccinated and not in a crowd. pic.twitter.com/4XqtkZGjsI
— President Biden (@POTUS) April 27, 2021
कोरोना विरोधातील लढाईत आम्ही जी असामान्य प्रगती केली आहे त्यामुळेच सीडीसी ने आज ही मोठी घोषणा केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत सध्या निम्म्यापेक्षा जास्ती लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोबतच एक तृतीयांश लोकांनी तर दुसरा डोस सुद्धा घेतला आहे.
इस्त्रायल मध्ये सुमारे 81% लोकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर तेथील प्रशासनाने अशी घोषणा सर्वप्रथम केली होती.
त्यामुळेच 'मास्क मुक्ती' ची अशी घोषणा करणारा इस्त्रायल हा पहिलाच देश ठरला.
दरम्यान भारतात मात्र परिस्थिती अजून देखील अतिशय गंभीरच आहे. केंद्र तसेच राज्य शासन जरी कठोर निर्णय घेत असेल तरी देखील रुग्ण संख्येत अद्याप तरी घट नाहीये. त्यामुळे भारतीय नागरिकांनी मास्क लावणे, वेळोवेळी हात धुवावेत, गर्दीची ठिकाणी टाळावीत आणि जिथे लॉकडाऊन असेल तिथे नियमांचं काटेकोरपणे पालन करायलाच हवे.
सोबतच खालील बातमी पूर्णपणे वाचा :-
टिप्पणी पोस्ट करा