Hanuman Jayanti 2021: हनुमान जयंती इतिहास, महत्त्व, शुभ मुहूर्त, विधी आणि मंत्र

Hanuman Jayanti 2021: हनुमान जयंती इतिहास, महत्त्व, शुभ मुहूर्त, विधी आणि मंत्र



           हनुमान जयंती निमित्त तुम्हाला अनेकांनी आणि तुम्ही शुभेच्छा दिल्या असतीलच मात्र या दिवसाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? चला तर मग जाणून घेऊया खासमराठी च्या आजच्या या खास हनुमान जयंतीनिमित्त लिहिलेल्या विशेष लेखात HANUMAN JAYANTI 2021.


श्री पवनपुत्र हनुमंताला अनेक भक्त वानर देव, वानर देवता किंवा श्रीराम भक्त हनुमान या नावाने ओळखतात. 


     मैत्री आणि भक्ती कशी असावी यांचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हनुमान !! प्रभू श्रीराम आणि हनुमान यांचं नातं इतकं विशेष आहे की जिथे जिथे श्रीराम असतात तिथे तिथे हनुमानांच नाव आल्याशिवाय राहत नाही!!

यावर्षी ( Hanuman Jayanti 2021 ) हनुमान जयंती 27 एप्रिल रोजी येते. श्री हनुमानांचा जन्मदिवस म्हणून दरवर्षी हनुमान जयंती साजरी केली जाते. 


      दरवर्षी हिंदू कालगणनेनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 15 व्या दिवशी पौर्णिमेला हनुमान जयंती असते. या पौर्णिमेला महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं.

     हनुमान जयंती फक्त महाराष्ट्र अथवा भारतातच नव्हे तर नेपाळमध्ये सुद्धा विशेषकरून साजरी केली जाते. 


 HANUMAN JAYANTI 2021 तिथी :- 


      26 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12:44 पासून 27 एप्रिल 2021 सकाळी 09:01 पर्यंत चैत्र पौर्णिमेची तिथी आहे.


सुमारे 2.59 दशलक्ष वर्षे पूर्वी पासून सहाव्या मन्वंतराच्या वैवस्वत मनुच्या त्रेतायुगाच्या आरंभापासून श्री हनुमानाचे वास्तव्य असल्याचं वाल्मिकी रामायणाच्या उत्तराकांडात सांगितलं आहे.

वानर राजा केसरी हे हनुमानाचे वडील तर अंजना ही हनुमानाची माता आहे. 


     मुनी विश्वामित्रांना त्रास दिल्याच्या कारणामुळे त्यांनी अंजनामातेला श्राप दिला होता. तेव्हा अंजनामातेने भगवान शिवांची आराधना केली आणि तिला त्यांनी  श्रापमुक्त करून तिच्या पोटी जन्म घ्यावा अशी प्रार्थना केली.

     यामुळेच श्री हनुमान हे भगवान शंकराचेच अवतार असल्याचं मानलं जातं.

सोबतच वायूदेवता पवनदेव यांचे देखील ते पुत्र समजले जातात.


       श्री हनुमान भक्तांची अशी श्रद्धा असते की त्यांच्या आयुष्यात आलेलं मोठ्यात मोठं संकट देखील हनुमानाच्या भक्ती मुळे चुटकीसरशी दूर होऊन जातं. 


      श्री हनुमानाचे संपूर्ण आयुष्य  मोठं मोठ्या संकटाशी लढण्यात गेलं आहे. अगदी लहानपणापासूनच त्यांचा जीवनपट आजकालच्या सुपर हिरोंना लाजवेल असाच आहे.


शक्ति, ज्ञान, भक्ति आणि विजयश्री देणारी देवता, वाईटांचे सर्वात मोठे विध्वंसक आणि भक्तांचे रक्षणकर्ते म्हणजे श्री हनुमान!! 



    जेव्हा लंकाधिपती रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून त्याच्यासमोर उभे केले आणि त्यांच्या शेपटीला कापड्याच्या चिंध्या बांधून आग लावली.


    तेव्हा मारुतीरायाने घरांघरांवर उड्या मारत आपल्या जळत्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावूनच लंका सोडली. 


     रामायणाच्या युद्धात देखील हनुमानाने श्रीरामांना मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्वतावर त्याला हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले.


      हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. 



    जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात. या माहितीच्या आधाराने कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले.


मारुतीचा उल्लेख महाभारतातदेखील येतो. ते महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होते.


Hanuman Jayanti 2021 (हनुमान जयंती) पूजा अर्चना व विधी :


     या दिवशी भक्तगण  पूर्ण दिवस विशेष उपवास धरतात आणि श्री हनुमान चालीसा तसेच स्त्रोत स्तुती इ. चे पठण करतात. 


      खास करून ज्यांना शनीच्या प्रकोप आणि साडेसाती अशी धारणा आहे अशा लोकांनी या दिवशी उपवास धरल्याने आणि हनुमान भक्ती केल्याने त्यांचे सर्व दोष दूर होतात अशी अनेकांची धारणा आहे.

मंत्र-


।। ॐ हं हनुमते नम: ।।


।। ॐ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट ।।


।। ॐ महाबलाय वीराय चिरंजिवीन उद्दते ।

हारिणे वज्र देहाय चोलंग्घितमहाव्यये ।।


।। ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा ।।

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने