राज्यात पुन्हा येणार अवकाळी पाऊस? Non Seasonal Rain | Weather in Maharashtra



      गेल्याच आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यांनंतर हळूहळू पुन्हा उन्हाळा जाणवू लागला होता. उन्हाचे चांगले चटके बसायला पण सुरुवात झाली होती.

Non Seasonal Rain



      राज्यात येत्या ४ ते ५ दिवसात काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह  पावसाची शक्यता असून २५ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील काही भागात तर २७ ते २८ एप्रिलदरम्यान कोकणासह गोव्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. दक्षिण तमिळनाडू आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिणेकडील बहुतांशी राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर आणि पूर्वेकडील काही राज्यातही पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे.



   राज्याच्या हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात रविवार पासून गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.


      सोबतच महाराष्ट्र राज्यासह नागपूर शहर आणि परिसरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. 


      मराठवाडा ते दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात बहुतेक ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. 


      मराठवाड्यावरील चक्रीय चक्रवात आता विरून गेला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.


      शनिवारी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचितशी वाढ पाहायला मिळाली, तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमानात वाढ पाहायला मिळाली.



    अशात  राज्यातील किमान तापमान पुणे येथे १७.४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४२.८ अंश सेल्सियस नोंदविले गेले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने