मोठी बातमी! आरोग्य विभागात 16 हजार पदांच्या भरतीला मान्यता


आरोग्य विभागात 16 हजार पदांच्या भरतीला मान्यता




 राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. विविध संवर्गातील 16 हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.


आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, 'राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेबाबत वर्तविलेल्या अंदाजामुळे रुग्णसेवेसाठी अधिक मनुष्यबळाची गरज आहे. 


सध्या रुग्णसेवेशी निगडीत 50 टक्के पदभरतीला मान्यता होती. मात्र वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण पाहता 100 टक्के पदभरतीला मान्यता देण्याबाबत आग्रहपूर्वक मागणी काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. 


त्याला मान्यता देतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या स्तरावर पदभरतीचा निर्णय घेण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

याबाबद्दल अधिकृत जाहिरात लवकरच  येईल त्यात कुठल्या पदासाठी किती जागा आहेत हे कळेल आम्ही याबद्दल लवकरच पुढील माहिती देऊ .  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने