१०६ आंदोलकांचे हुतात्म्य तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना। १ मे महाराष्ट्र दिन
१ मे महाराष्ट्र दिन |
महाराष्ट्र हे देशातील महत्वाचे राज्य आहे .भारतातील मोठ्या आर्थिक घडामोडी येथूनच होतात ,केंद्राला सगळ्यात जास्त कर याच राज्यातून जातो .मोठमोठे उद्योगधंदे ,तसेच आयटी हब ,कारखाने महाराष्ट्रात आहेत आज मोठ्या प्रमाणावर रोजगार पण यातूनच भेटतो,संतांची भूमी ,छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी म्हणून ओळख असणाऱ्या राज्याची जडणघडणी मध्ये महाराष्ट्र ची उभारणी कशी झाली महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली हे आज आपण महाराष्ट्र दिनाचे(MAHARASHTRA DIN १ MAY ) औचित्य साधून पाहणार आहोत .
महाराष्ट्र दिन (MAHARASHTRA DIN १ MAY ) हा १ मे साजरा केला जातो .महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली .निर्मितीच्यावेळी अनेक संकटाना समोर जावे लागले कारण संयुक्त महाराष्ट्र्र मध्ये मुंबईचा समावेश होत नव्हता कारण राज्य पुनर्र्चना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले .मराठी माणसांना याचा राग आला व त्याचे पडसाद २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ सशक्त आंदोलकांनी एक मोठा मोर्चा फ्लोरा फाउंटन (सध्याचा हुतात्मा चौक )या परिसराच्या दिशेने निघाला त्यांना सरकारचा जाहीर निषेध करायचा होता .
खूप मोठ्या प्रमाणात आंदोलक जमले होते ,मोर्चा उधळून लावण्यासाठी पोलिसांकडून अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु त्यांना अपयश आले .सत्याग्रही मागे हातात नसल्या कारणाने मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिंसाना गोळीबाराचे आदेश दिले ज्यात १०६ आंदोलकांचा मृत्यू झाला .या आंदोलनामुळे सरकारला शरणागती पत्करावी लागली आणि शेवटी १ मे १९६० रोजी सयुंक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली .
इस १९६५ रोजी ज्या ठिकाणी १०६ आंदोलकाला जीव द्यावा लागला त्याठिकाणी स्मारकाची उभारणी करण्यात अली ते म्हणजे सध्याचे हुतात्मा स्मारक .
या सर्व हुताम्यांना श्रद्धांजली त्यांच्या बलिदानामुळे आज सयुंक्त महाराष्ट्र राज्य संपूर्ण जगात ओळख निर्माण करत आहेत .
तुम्हा सर्वाना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा जय महाराष्ट्र
जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
🚩🙏 जय महाराष्ट्र 🙏🚩
टिप्पणी पोस्ट करा