म्युकोर मायकोसिस काय आहे त्याचे धोके व उपाय। what is mucormycosis
कोव्हिड19 च्या आजारातून बरे झालेल्या काही रुग्णांना नंतर काळी बुरशी किंवा म्युकोर मायकोसिसचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. आणि त्यामुळे नाक, कान, डोळा किंवा अगदी मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचून अर्धांग वायूचा झटका किंवा डोळे काढण्यापर्यंत वेळ आली आहे. काळी बुरशीचा संसर्ग असलेल्या या आजाराला शास्त्रीय नाव आहे म्युकोर मायकोसिस.
म्युकोर मायकोसिस.(mucormycosis)म्हणजे काळी बुरशी ज्या रोगामुळे कोरोना रोगातून बरे होत असलेल्या लोकांना धोका आहे .हि काळी बुरशी नाकाजवळील सायनस या भागाजवळ असतात तेथून ते नाक कान डोळा आणि मेंदूपर्यंतसुद्धा जात आहेत त्यामुळे अवयवाला धोका आहे ,तसेच मेंदूपर्यंत गेल्यास रुग्ण दगावू शकतो ,
जे रुग्ण व्हेंटिलेटर होते अश्या लोकांना जास्त धोका आहे ट्रीटमेंट मध्ये वापरण्यात आलेली औषध तसेच स्टिरॉइड यामुळे हा रोग बळावतोय यामुळे डेकस्मेथेझोन मुळे रोगप्रततिकारक क्षमता दाबली जाते,याचा धोका उच्चरक्तदाब व मधुमेह असणाऱ्या लोकांना जास्त आहे अनेक ठिकाणी यामुळे डोळे गमावल्याबरोबर मृत्यूच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत .
या 6 लोकांमध्ये म्युकोर मायकोसिस रोगाचा धोका जास्त आहे -
1 मधुमेहांच्या रूग्णांमध्ये
2 जे रुग्ण स्टिरॉइड्स जास्त प्रमाणात घेत आहे.
3 आयसीयूमध्ये राहणाऱ्या रूग्णांमध्ये.
4 गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्ये.
5 पोस्ट ट्रान्सप्लांट आणि मैलिग्नेन्सी असलेल्या लोकांमध्ये
6 व्होरिकोनाझोल थेरपी घेत असलेल्या लोकांमध्ये.
म्युकोर माइकोसिसची लक्षणे -
1 सायनसचा त्रास होणं, नाक चोंदणे, नाकाच्या हाडात वेदना होणं.
2 नाकातून काळा द्रव्य किंवा रक्तस्त्राव होणं.
3 डोळ्यात सूज येणं,अंधुक दिसणे.
4 छातीत दुखणे,
5 श्वास घ्यायला त्रास होणं.
6 ताप येणं.
ब्लॅक फंगस संसर्ग टाळण्यासाठी काय करावे-
1 कोविड मधून बरे झाल्यावर आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासा.
2 डॉ.च्या सल्ल्यानुसारच स्टिरॉइडचा वापर करा.त्यांच्या सल्ल्यानुसारच डोस कमी-जास्त करा.
3 डॉ.च्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक्स आणि अँटीफंगल औषधे वापरा
4 ह्युमिडिफायरमध्ये स्वच्छ पाणी वापरा.
5. हायपरग्लाइसीमिया नियंत्रित ठेवा.
आयसीएमआरने ब्लॅक फंगस चे संक्रमण रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. चला काय ते जाणून घेऊया -
1 मधुमेह रूग्णांनी आपली साखर नियंत्रित केली पाहिजे.
2 डॉक्टरांच्या सल्ल्याने स्टिरॉइडचा वापर कमी करा.
3 रोग प्रतिकारशक्ती बूस्टर औषधे बंद करा.
4 अँटीफंगल प्रोफिलॅक्सिसची आवश्यकता नसल्यास घेऊ नका.
ब्लॅक फंगस संसर्गाचा कसा उपचार केला जाऊ शकतो-
1 शरीराला हायड्रेट होऊ देऊ नका, म्हणजेच पाण्याची कमतरता होऊ देऊ नका .
2 4 ते 6 आठवडे अँटीफंगल थेरपी घेऊ शकतात.
3 सेंट्रल कॅथेटरची मदत घ्या.
4 रेडिओ इमेजिंग तंत्राने निरीक्षण करा.
टिप्पणी पोस्ट करा