टोकियो ऑलिम्पिकला आज पासून सुरवात १२० भारतीय खेळाडू घेणार भाग
टोकियो ऑलिम्पिक |
● भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना महामारीमुळे उद्घाटन सोहळ्यातील उपस्थितीला कात्री लावण्यात आली आहे. आठ खेळांतील खेळाडूंची हजेरी
● टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकात एक हॉकीपटू, 8 बॉक्सर, 4 टेबल टेनिसपटू, 2 रोविंगपटू, 1 जिमनास्ट, एक जलतरणपटू, 4 नौकायनपटू आणि तलवारबाजीतील एकमेव खेळाडू यांचा समावेश असणार आहे.
● 6 अधिकारी या खेळाडूंसोबत ध्वजसंचलनात सहभागी होणार आहेत. म्हणजेच एकूण 28 जणांचे भारतीय पथक असणार आहे.
टोकियो ऑलिम्पिक मधील कुठले खेळ असणार ?
● तिरंदाजी, ज्युडो, बॅडमिंटन, भालाफेक, टेनिस, हॉकी व नेमबाजी या खेळांतील खेळाडू उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत. कारण या खेळातील स्पर्धा 23 व 24 जुलैला होणार असल्याने खेळाडूंना तयारी किंवा विश्रांतीची गरज आहे.
● ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता, तर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4ः30 वाजता सुरू होईल.
टिप्पणी पोस्ट करा