सरासरी (AVARAGE) म्हणजे काय सरासरी कशी काढतात ।Spardha pariksha
सोप्या भाषेत सरासरी म्हणजे एकूण संख्या व त्या संख्याची बेरीज व येणाऱ्या बेरजेला एकूण संख्येने भागणे याला आपण सरासरी म्हणजे सरासरी होय .
सरासरी =एकूण संख्याची बेरीज /एकूण संख्या
आपण काही उदाहरण बघू
सरासरी म्हणजे काय सरासरी कशी काढतात । AVERAGE |
उदा .१ )समजा अमर चे वय १० आहे ,विजय चे वय १५ वर्ष आहे व राहुल चे वय २० वर्ष आहे तर या तिघांचे सरासरी वय किती आहे ?
या मध्ये एकूण संख्या म्हणजे किती लोकांची सरासरी काढयाची आहे =३(अमर विजय राहुल )
त्यालाच आपण N म्हणून नाव देऊ
सरासरी =एकूण संख्याची बेरीज /एकूण असणाऱ्या संख्या
सरासरी =१० +१५+२०/३=४५/३=१५
म्हणजे सरासरी १५ आहे
१५ * ३=४५ म्हणजे सगळ्याच्या वयाची सरासरी हि १५ आहे .
उदा २) ७ दिवसाच्या तापमानाची सरासरी हि २५ आहे .पहिल्या २६ ,दुसऱ्या दिवशी २५ ,तिसऱ्या दिवशी तापमान २४ आहे चौथ्या दिवशी २३.५ आहे पाचव्या दिवशी २५ आहे ,सहाव्या दिवशी २५.५ आहे ,तर सातव्या दिवशीचे तापमान किती ?
आता सरासरी दिलेली आहे आपल्याला पण एक संख्या दिली नाही ती शोधायची आहे .
तर आपण प्रथम सूत्रात ते मांडून घेऊ
सरासरी =एकूण संख्याची बेरीज /एकूण संख्या
२५ =२६+२५+२४+२३.५+२५+२५.५+X /७
आता आपल्याला माहित आहे कि एकूण संख्याची बेरीज १७५ आहे कारण भागाकारामधील ७ बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यास त्याचा गुणाकार होतो आता बाकीच्या ६ संख्याची बेरीज १४९ आहे ७ वि संख्या आपल्याला माहित नाही तर १७५ =१४९+X तर X ची किंमत =१७५-१४९ =२६ म्हणजे सातव्या दिवशीचे तापमान हे २६ आहे .
३) पाच संख्याची बेरीज ३५० आहेत तर त्याची सरासरी किती ?
सरासरी =एकूण संख्याची बेरीज /एकूण संख्या
सरासरी =३५०/५
सरासरी =७०
अश्या ३ प्रकारात तुम्हाला प्रश्न विचारतात त्यामुळे सूत्र लक्षात ठेवले तर तुम्हाला काही अडचण येणार
नाही .
ल.सा.वि ( LCM ) आणि म.सा.वि ( HCM ) कसा काढावा ?
📌🚩 खासमराठीचे असेच दर्जेदार लेख, दैनंदिन घडामोडी तसेच इतर अनेक नवनवीन गोष्टी थेट आपल्या WhatsApp वर मिळवण्यासाठी आजच 📱 ९२८४६७८९२७ या क्रमांकावर आपले व आपल्या जिल्ह्याचे संपूर्ण नाव पाठवून " JOIN ME " असा WHATSAPP MESSAGE पाठवा. !
टिप्पणी पोस्ट करा