नीरज चोप्रा ने मिळवून दिले भारताला सुवर्ण ।niraj chopra bring gold for india ।Sports news




niraj chopra
 niraj chopra 



niraj chopra नीरज चोप्रा हे भारतीय भालाफेकपटू आहेत.जन्म 24 डिसेंबर 1997 (वय 23)खंडरा, पानीपत, हरियाणा, भारत


त्यांनी फ्रान्स मध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत ८५.१७ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्यांनी 'दोहा डायमंड लीग'मध्ये भालाफेकीत ८७.४३ मीटरचा राष्ट्रीय उच्चांक स्थापित केला.पण टोकियो ऑलिम्पिक मध्ये 88.07m मीटर फेकून स्वतःचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे .
कारकीर्द


2021 tokiyo olympic
नीरज चोप्रा याने इतिहासात पहिल्यांदा भालाफेक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिला आहे .टोकियो ऑलम्पिक च्या शेवटच्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळवून भारताची मान जगात उंचावली आहे

२०१८ राष्ट्रकुल खेळ

२०१८ साली गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८६.४७ मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले.

२०१८ आशियाई खेळ

२०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ८८.०६ मीटर अंतरावर भाला फेकून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले.आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी भारतीय पथकाचे ध्वजधारक होण्याचा मान त्यांना मिळाला.आपले सुवर्णपदक त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले
.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने