Emiway Bantai -सध्याच्या काळातील आघाडीचा रॅपर
Emiway Bantai -सध्याच्या काळातील आघाडीचा रॅपर |
- ©ऋषिकेश तेलंगे
ज्याला रँप ऐकण्याची वा करण्याची आवड आहे त्यांना एमिवे बंटाय नक्कीच आवडत असेल.मला एमिवे बंटायमधल्या बऱ्याच गोष्टी आवडतात.एका मुंबईच्या झोपडपट्टीतला शाहरूख शेख नावाचा मुलगा स्वतःच्या जिद्द आणि मेहनतीने अख्ख्या इंडस्ट्रीत आपलं नाव गाजवतो.फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही त्याचा फँनवर्ग किती मोठा होत आहे हे युट्युबवर त्याच्या गाण्याला फॉरेनर लोकांचे रिअँक्शन व्हिडीओ पाहिल्यास समजून येईल.एमिवे बंटायच्या गाण्यावर रणवीर सिंगसारखा सध्याचा आघाडीचा बॉलिवूड नट अवॉर्ड्समध्ये नाचतो त्यावरुन त्याचे स्थान लक्षात येईल.
Emiway Bantai (एमिवे बंटाय) इंग्लिशमध्येही उत्तम रँप करतो हे त्याच्या 'Freeverse feast' गाण्याकडे पाहिलं की लक्षात येतं.हिंदी रँप सॉंगमध्ये त्याच्या मुंबईतील गल्लीतील भाषा ऐकायला मिळते.शब्दांमध्ये अतिशय साधे परंतु महत्त्वपूर्ण वाटणारे शब्द ,अतिशय जबरदस्त आवाज ,त्याचा जोशमध्ये असणारा संपूर्ण गाण्यातला वावर ,फ्लो यामुळे एमिवे बंटाय नावाची ही हस्ती इतरांपेक्षा वेगळी का आहे व किती ठोकरा खाऊन तो इथपर्यंत पोहोचलाय हे समजतं. त्याचा ईथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.युट्युबवर आज एका दिवसातही त्याचे गाणे मिलियनपर्यंत पळतात.हे सर्व त्यानं कमावलं आहे.
चाहत्यांच्या प्रेमामुळे तो आज ईथे आहे हे तो स्वतः मान्य करतो.फक्त पोरी ,दारू ,पार्टी ईथपर्यंतच त्याचा रँप राहत नाही. तर समाजातील अनेक बऱ्या वाईट गोष्टींचा ते आजची तरूणाई, मोटिवेशन, दर्जा -वर्गसंघर्ष ईथपर्यंत शब्दरचना करणारा एमिवे बराच वेगळा माणूस आहे.
Eminem मधलं Emi व Lil Wayne मधलं Way काढून त्याचं नाव बनलंय असं तो एका इंटरव्ह्यूमध्ये सांगतो.या दोघांनाही तो प्रेरणा मानतो.
मागे रफ्तारसोबतही त्याचा वाद झाला होता त्यामुळे डिस व्हिडीओ टाकणं त्यानं सुरू केलं होतं.नंतर त्यात कृष्णा ,मुफाड व अनेक अंडरग्राउंड रँपर सहभागी झाले.परंतु एमिवेचे फँन्स अजिबात कमी झाले नाही.
' तेरा स्माईल बोहोत हार्ड बाकी सब की प्लास्टिक है'म्हणणारा एमिवे 'खुद पे भरोसा रख आगे बढेगा कल्लू' असंही म्हणतो.एकूणच एमिवेचं शब्दांचं एक विश्व आहे.त्यात तुम्ही जितकं खोल जाल तितकं तुम्हाला काही ना काही सापडणार.पाकिस्तानमध्ये एमिवेचे जास्त फँन्स आहेत.यावरून त्याच्या टँलेंटचा अंदाज तुम्ही लावू शकता.
अलीकडेच त्याचं 'बटिस्टा बाँब'हे गाणं आलंय त्यातही त्याचा रँप जबरदस्त आहे.हार्ड कोअर रँप ऐकणाऱ्यांना एमिवेची स्टाईल खूप आवडते.त्याची स्टाईल हटके व कूल आहे.लिहिण्यासारखं बरंच आहे पण सध्या तरी एवढंच......बाकीचं पुढील भागात !
टिप्पणी पोस्ट करा