जर कोरोना " कोविड 19 " विषाणू जीवंत नसेल तर त्याचे पुनरुत्पादन कसे होते ? । Marathi Special ।। खास मराठी
जर कोरोना " कोविड 19 " विषाणू जीवंत नसेल तर त्याचे पुनरुत्पादन कसे होते ? खासमराठी स्पेशल ।। खासमराठी |
कोरोना विषाणूने तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला असून आता परिस्तिथी फारच गंभीर स्वरूपाची बनत चालली आहे. भारताची सध्याची स्तिथी पाहायची झाली तर २५४७ लोकांना कोरोना व्हायरस चे संक्रमण झाले आहे. तसेच १६३ जण ठीक झाले असून ६२ जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. खर तर हि स्तिथी आटोक्यात येत चालली असतानाच दिल्ली मध्ये निजामुद्दीन मरकझ मध्ये धर्माचा प्रसार करणारे मोठ्या संख्येने जमले त्या लोकांमध्ये भारतातीलच नाही तर जगभरातून लोक आली . भारत सरकारच्या निमयांचे उल्लंघन त्यांनी केलं. ( जमावबंदी , संचारबंदी ) .
मरकझ ची बातमी पुढे अली तेव्हा काही मरकझ मधील लोकांनी भारताच्या इतर प्रदेशात पलायन केले. आता देशाला त्यांच्या मुळे धोका उत्पन्न झाला आहे . पोलीस त्या तब्लिघीना शोधून पकडण्याच्या मार्गावर लागलेले आहेत. त्यांच्यामुळेच आज कोरोना संक्रमचा धोका उत्पन्न होऊन कोरोनाग्रस्ताचा आकडा वाढतच चालला आहे. लोकांनी भारत सरकारच्या नियमाचे पालन करणे गरजेचे झाले आहे. पण काही महाभाग नियमांचे उल्लंघन करून गर्दी करत आहेत, आणि यातूनच कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे .
आपल्या मनात खुप सारे प्रश्न पडले असनार कि करोना व्हायरस म्हनजे काय ? करोना व्हायरस कोठुन आला व त्याचा प्रसार कसा पद्धतीने होतो ? कोरोना व्हायरसची लक्षणे व उपाय योजना. यांसारख्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आमच्या वेबसाइटवर पहायला मिळतीलच पण जसे कि , या आर्टिकल मध्ये आपन पहानार आहोत : कोरोना व्हायरस जर सजीव नाही तर त्याचे पुनरुत्पादन कसे होते.
सर्व प्रथम सांगायचे झाले तर कोरोना हा विषाणु आहे . विषाणू हे सजीवांच्या शरीरात शिरतात जसे कि श्वसनक्रियेद्वारे , हात न धुता अन्न ग्रहण केल्यामुळे , तसेच संक्रमनाने विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात. विषाणू स्वतासारखा दुसरा जीव निर्माण करु शकत नाही म्हनजेच त्याला पुनरुत्पादन क्षमता नसते. ते दुसर्या सजीवांच्या शरीरावर अवलंबुन असतात आणि तेथेच त्यांची वाढ होते थोडक्यात ते परपोषी असतात. विषाणू आपल्या शारीरासाठी खुप घातक असतात आणि त्यांच्यामुळेच आपल्या शरीरात रोग निर्माण होतात. तर विषाणू हे निर्जीव कसे ? विषाणू हे सजीव व निर्जीव यांच्या काठावर येतात. एखादे शरीर मिळाल्या शिवाय त्यांचे कोणतेच कार्य होवु शकत नाही. जस कि वर सांगितल्याप्रमाणे कोरोना हा एक विषाणू आहे, आणि त्याचे कार्य कसे चालते व पुनरुत्पादन कसे होते हे खालील चित्रातुन समजुन घेवू.
जर कोरोना " कोविड 19 " विषाणू जिवंत नसेल तर त्याचे पुनरुत्पादन कसे होते ? खासमराठी स्पेशल ।। खासमराठी |
1) चित्रामध्ये एक पेशी दाखवली गेली आहे ती होस्ट म्हनजेच मानवी शरीरातील आहे. खिळे ठोकलेला लाल चेंडु प्रमाने दिसनारा हा कोरोना (कोविड १९) चा व्हायरस आहे तर निळ्या रंगाचे पेशीच्या मधोमध असनारे वर्तुळ हे आपल्या पेशीचे केंद्रक आहे.
2) कोरोना व्हायरसचा विषाणू आपल्या शरिरात प्रवेश केल्यानंतर होस्ट पेशीला चिटकतो , जसे हा विषाणू संक्रमणाने फैलावत असल्याने तो आपल्या हाताचे तळवे, नाक ,कान येथे राहु शकतो , आपण जेव्हा हात डोळ्याला , तोंडाला , नाक ,कानाला स्पर्श करतो तेव्हा हा विषाणू आपल्या शरीत प्रवेश करतो.
३) होस्ट पेशीला चिटकुन तो होस्ट पेशीमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर त्याचे बाह्य आवरण फुटुन बाजुला होते.
४) केंद्रकात ट्रान्सक्रिप्शन व ट्रान्सलेशन ची क्रिया सुरु होते. विषाणू आरएनए आहे कि डिएनए आहे यांवरुनच पुढील प्रक्रिया घडते. आपल्या शरीरातील क्रिया प्रक्रिया वापरुनच विषाणूची प्रथिने तयार होतात.
५) पुढे विषाणू विभिन्न भागात विभागला जातो म्हनजेच त्याचे सुटे भाग बनतात.
६) छोटे पिल्ले तयार होतात आणि त्यालाच विरीओन म्हनतात. हेच छोटे पिल्ले ( विरीओन ) पेशी फाडुन बाहेर येतात.
७) तसेच काही विषाणू होस्ट पेशीला मारतात तर काही मारत नाहीत. ते त्यांच्या डीएनए मध्ये कायमस्वरुपी घर करतात.
आता प्रश्न उद्भवतो कि, हे सर्व घडत असताना आपल्या शरीरातील पांढर्या (सैनिक) पेशी काय करत असतात. तर आपल्या शरीरातील सैनिक पेशी कोरोनाच्या विषाणू वर हल्ला चढवतात पन काही विषाणू हे होस्ट पेशीच्या अंतर्भागात प्रवेश केल्याने त्यांना मारने कठीन बनून जाते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता. तुम्हाला कोणत्याही विषयावर माहिती हवी असल्यास सांगायला विसरू नका . धन्यवाद ... !!
टिप्पणी पोस्ट करा