" ती " आणि " तो " || भाग १ || प्यारवाली Love story

        
          नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो.... !! मनोरंजन ( Entertainment ) Khasmarathi Special या भागात आम्ही तुमच्यासाठी नवनवीन उत्सुकता आणि मनाला कुतूहल लावणाऱ्या जीवन कथा ( Life story ) तसेच प्रेमकथा ( Love story ) घेऊन येत आहोत , या लेखात तुम्ही एक अनोखी प्रेमकथा पाहणार आहात . जिचं नाव आहे " ती " आणि " तो " एक प्यारवाली Love story  जी वाचताना नक्कीच तुमच्यातील उत्सुकता वाढेल .
" ती " आणि " तो " || भाग १ || प्यारवाली Love story
" ती " आणि " तो " || भाग १ || प्यारवाली Love story


🔅 भाग - १ 🔅

          असं म्हटलं जातं social media म्हणजे ,मनातलं व्यक्त करण्यासाठीच एक अतिशय उपयुक्त स्थान.आता याच social media वर अनेकजण स्पष्टपणे आणि निसंकोच पणे आपापली मन व्यक्त करताना दिसत आहेत.


          एखाद्या वेळेस आयुष्यात आपल्याला खूप एकटं एकटं वाटायला लागतं, खूप विचार सतत मनाला ग्रासत असंतात, आयुष्यातील अडी अडचणी आणि येणाऱ्या प्रश्नांनी आपली खूप दमछाक होते.अशावेळेस वाटत कोणीतरी असावं,मन मोकळे पणाने संवाद साधता येणारं. आपल्या मनातील विचार आणि प्रश्नांची उकल करून देणारं .आणि अचानक कोणीतरी मिळतं तेव्हा मन something something होतं.


          अशीच हि कथा social media वर झालेल्या  अनोळखी प्रेमाची . आयुष्यात घडलेल्या अंधारमय भूतकाळा मुळे लग्न आणि प्रेम विषयापासून पळणारी " ती" ,आणि निखळ आणि अनंत प्रेम करण्याची ग्वाही दिलेला "तो" !


कथेत पुढे काय होतं ,एकमेकांना प्रेम मिळतं का ?

की प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन जीवाना भोगावा लागतो तो 'वनवास' ?

............... ए वैभव काय करतोयस ? जेवला का ? 

तिने fb ला msg केला, ( ती म्हणजे ' कोमल' ) दोघांची ओळख नुकतीच काही दिवसांपूर्वी झाली होती .


कोमलचा Dp त्याला मनापासून आवडला होता त्यामुळे पहिल्या पाहण्यातच त्याने तिला Request पाठवली होती .


अनोळखी असल्यामुळे कोमलने त्याला 2 वेळा स्विकारलीही नाही पण ,तिने Request नाकारूनही वैभव Request पाठवणं काही थांबवत नव्हता. म्हणून तिनेही नाईलाजाने Request ला स्वीकृती दिली.
" ती " आणि " तो " || भाग १ || प्यारवाली Love story
" ती " आणि " तो " || भाग १ || प्यारवाली Love story

ती ( कोमल ) :-
  ए ss, काय रे ! तुझी Request स्वीकारत नाही तरीही तू सारखं सारखं का पाठवत आहे ? (कोमलने प्रेमळ हलका राग दाखवत विचारले ).



तो ( वैभव ) :-  अगं, काय आहे नं,परीसारखी सुंदर ,निखळ पाण्यासारखी शांत ,आणि तुझ्यासारखी प्रेमळ मुलगी आतापर्यंत कधीही पाहिली नाही नं ! पण पहिल्यांदाच तुझा फोटो बघितला अन हृदय धड धडायला लागलं गं . " पहिलं प्रेम म्हणतात नं अगदी तसेच काही झालयं .


कोमल :-  ए ..वेडा बिडा झालास की काय ? मी तर तुला कधी बघितलं पण नाही ! ओळखत पण नाही,नं तुझ्याबद्दल मला काही माहिती .मग प्रेम वगैरे हा विषय तर लांबच राहिला .आणि तसही माझा तर प्रेमावर काडीमात्र विश्वास नाहीए .


वैभव :-  अगं वेडे,तू नकोस की करू माझ्यावर प्रेम ! पण...


कोमल :-  " पण " काय ?


वैभव :-  पण...मी मात्र या चेहऱ्यावर आणि अशा प्रेमळ व्यक्तीवर निस्वार्थ आणि निरंतर प्रेम करणार आहे.अगदी जीव असेपर्यंत .


       ( खरं तर त्याच असं हे निडर बोलणं तिला अगदी मनापासून आवडलं होतं,पण तिने मुद्दामहून तसं काही दाखवलं नाही.आणि फक्त त्याची मैत्री स्वीकारली नाही म्हणता म्हणता दिवस कसे निघून गेले त्यांना कळलं सुद्धा नाही. त्यातच मन तर जुळली होती,प्रेमही झालं होतं,पण भावना मात्र अजून व्यक्त झाल्या नव्हत्या ).

       सकाळी उठल्यानंतर आधी "chat" करणे दिवसभरातून फोनवर बोलणे, काही मिनिट चालणारे फोन तासांमध्ये परावर्तित झाले.


  क्रमश:



लेखन : ✍  गोविंद हिरडकार . 
             ◾    7709575552


FB :  गोविंद हिरडकार . Or 
➤  https://www.facebook.com/govind.hiralkar


सुचना :-  ह्या पोस्टमधील शब्दांकन ( खासमराठी © ) कॉपीराईट आहे. 
या लेखाचे सर्व अधिकार लेखकाकडे आहेत .



➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Khasmarathi 


➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


       ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने