ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ स्मृतिदिवस । sindhutai sapkal death anniversary
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ स्मृतिदिवस ।sindhutai sapkal death annivesary |
संपूर्ण आयुष्य अनाथांच्या सेवेत झिजवणाऱ्या 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं गतवर्षी याच दिवशी निधन झालं. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांना 2021 सालचा पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता. समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
सिंधुताईंना मिळालेले महत्वाचे पुरस्कार :
▪️ पद्मश्री पुरस्कार (2021)
▪️ डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (2017)
▪️ प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2015)
▪️ मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (2013)
▪️ महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (2012)
▪️ सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (2012)
▪️ पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (2012)
▪️ महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (2010)
▪️ दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार' (2008)
▪️ पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार'
▪️ आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (1996)
▪️ सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
▪️ राजाई पुरस्कार
▪️ शिवलीला महिला गौरव पुरस्कार
▪️ 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (1992)
📌 दरम्यान, सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला 'मी सिंधुताई सपकाळ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा