पक्षी, पशू आणि डाकू-Pakshi, Pashu Ani Daku by Krupakar । book review 


पक्षी, पशू आणि डाकू-Pakshi, Pashu Ani Daku by Krupakar । book review
पक्षी, पशू आणि डाकू-Pakshi, Pashu Ani Daku by Krupakar । book review 




अनेक दिवसांपूर्वी मागे मी गुड रिड्स वर Birds,Beasts and Bandits या पुस्तकाबद्दल वाचलं होतं.हे पुस्तक Wild Film Makers Krupakar आणि Senani यांच्या अपहरणाच्या अनुभवांवर होतं..एका डाकूने यांचा अपहरण करून यांना 14 दिवस आपल्या ताब्यात ठेवलं होतं.तर हा डाकू काही छोटा मोठा नव्हता तर चंदन तस्कर वीरप्पन हा खतरनाक क्रूरकर्मा होता.वीरप्पनच्या ताब्यात असताना या दोन लेखकांना तेथे आलेल्या अनुभवाचा वर्णन त्यांनी या पुस्तकात केला आहे.
आता हा विषयचं किती इंटरेस्टिंग आहे.मला याचा इंग्रजी Review वाचताना हे पुस्तक कधीही वाचावं आणि कधी नाही असं झालं होतं.पण पुस्तक इंग्रजीत असल्याने मी हे पुस्तक बोलावलं नाही.पुढे वाचूया म्हटलं.
मग मी तेव्हा वीरप्पन विरुद्ध विजय कुमार हे पुस्तक वाचून काढलं आणि या विषयावर अधिक वाचायची माझी इच्छा अजूनच प्रबळ झाली.
जंगल,पक्षी,प्राणी,डाकू,भूत/प्रेत सारख्या गोष्टींत माझा जाम इंटरेस्ट आहे.चंबलच्या डाकूच्या गोष्टी मला फार आवडतात. राम गोपाल वर्माचा वीरप्पन चित्रपट बघून मला वीरप्पन बद्दल सर्वांत आधी माहिती झाली होती.तेव्हापासून मला हा विषय फार इंटरेस्टिंग वाटतो.विजय कुमार यांनी त्यांच्या पुस्तकांत ज्या प्रकारे वीरप्पनचा आणि त्याच्या खातम्याचा थरारक वर्णन केलं होतं ते वाचून तर मी फारच उत्सुक झालो होतो.
अशातच काहीच दिवसांपूर्वी मनोविकासच्या वेबसाईटवर काही पुस्तके सर्च करत असताना माझी नजर पडली पक्षी,पशू आणि डाकू या पुस्तकांवर.. नाव वाचून आणि वीरप्पनच्या लांबलचक मिशीचा फोटो असलेला मुखपृष्ठ बघून मला हे फारच इंटरेस्टिंग वाटलं.म्हणून लगेच मुखपृष्ठावर लिहलेलं मजकूर वाचलं.
Birds Beasts And Bandits या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद.
पक्षी,पशु आणि डाकू (Pakshi, Pashu Ani Daku by Krupakar । book review )
डाकू वीरप्पनसोबतची 14 दिवसांची रोमहर्षक कहाणी
मुळ लेखक -कृपाकर आणि सेनानी.
हे वाचल्यावर मला खूपच भारी वाटलं.
मागे जे पुस्तक इंग्रजी भाषेत असल्याने मी वाचायचं टाळलं होतं त्या पुस्तकाचाच हा मराठी अनुवाद होता.माझ्यासोबत हे असं अनेक वेळा झालेलं आहे की मी कधी कधी एखाद्या पुस्तकाला शोधत नाही तर माझ्या आवडीच्या विषयाचा पुस्तकच मला शोधत शोधत माझ्याजवळ येऊन मला वाच म्हणतो. मग काय मला हे पुस्तक दिसलं आणि मी लगेच मागावून घेतलं.तीन दिवसांपूर्वी मला हे पुस्तक मिळालं पण इतर वाचन सुरू होतं.म्हणून म्हटलं सध्या चाळून ठेऊन देऊया आणि पुढे लवकरच वाचूया.
फक्त चाळण्यासाठी पुस्तक घेतलं आणि चाळता चाळता एवढं या पुस्तकात हरवून गेलो की मला हे पुस्तक कधी संपलं हे कळालचं नाही.कारण होतं पुस्तकाचा इंटरेस्टिंग विषय आणि अफलातून झालेलं असा अनुवाद जो वाचकाला गुंतवून ठेवतो.कोठेही जरा सुद्धा बोअर न करता लेखकांनी केलेल्या घटनांचा वर्णन वाचून वाचक एका वेगळ्याच प्रवासाला जाऊन येतो..चौदा दिवसाच्या या अपहरणनाट्यात भय,आशा,हास्य/विनोद,उत्कटता सर्वकाही आहे.
८ ओक्टो १९९७ रोजी बंदीपूर येथील घरातून कृपाकर आणि सेनानी या दोघांचे अपहरण होते आणि १४ दिवसांनी त्यांची सुटका होते.या १४ दिवसात नेमकं काय काय घडते ?आणि घडलं या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात लेखकांनी दिलेली आहे..दोन्ही लेखक सरकारी अधिकारी आहेत.या गैरसमजुतीतुन वीरप्पन या दोघांचे अपहरण करतो.
यांना ओलिस धरून खंडणी आणि माफी या दोन्ही गोष्टी वसूल करण्याचा त्याचा डाव होता.यांच्या सोबतच अजून ४ जणांना ओलिस तो ठेवतो.वीरप्पन आणि त्याची टोळी या ओलिसांना घेऊन जंगल तुडवत राहिली .
बाह्य जगाशी त्यांचा संपर्क होता तो एका जुन्या रेडिओद्वारा .या १४ दिवसांच्या प्रवासात या दोघांना वीररप्पनचे एक वेगळेच रूप बघायला आणि अनुभवायला मिळाले.टीव्ही,वृत्तपत्रात दाखवण्यात आलेला क्रूरकर्मा वीरप्पन वेगळा तर प्रत्यक्षात असलेला वीरप्पन वेगळा होता.
वीरप्पनचे वेगवेगळे रूप लेखकांनी त्या 14 दिवसांत बघितले आणि वाचकांसमोर ते या पुस्तकांतून मांडले आहे.
उदाहरण -
कमालीचा पुस्तकप्रेमी व नियमित वाचन करणारा वीरप्पन.
जंगल,प्राणी,पक्षी,वनस्पतीचे सखोल ज्ञान असलेला वप्राण्यांचे वर्तन, त्यांची चाल, त्यांची भाषा यांची हुबेहूब नक्कल करणारा वीरप्पन.
वन्य पशू पक्षांचा दांडगा अभ्यास असलेला वीरप्पन तर एक कुशल शिकारी असलेला वीरप्पन.
अपहरण केलेल्या लेखकांना शेवटी निरोप देऊन रडणारा वीरप्पन.
जंगलात असून सुद्धा विविध घडामोडींची माहिती ठेवणारा वीरप्पन.
इत्यादी इत्यादी..
एकंदरीत असंख्य अनुभव कथांचा मोठा साठा वीरप्पनकडे होता आणि त्यातल्या अनेक मंत्रमुग्ध करणाऱ्या कथा लेखकांनी त्याच्या मुखाने ऐकल्या होत्या.जंगलातील अनेक आश्चर्यकारी गोष्टी, जंगलात होत असणारी तस्करी, चकमकी यांचे वर्णन या पुस्तकात दिलेले आहेत.ज्या वीरप्पननं जवळजवळ अडीचशे माणसांना,अनेक हत्तींना मारलं होतं , तो सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्या म्हणून वेगवेगळे डाव रचत असताना हे दोन्ही लेखक मात्र कर्नाटक आणि तामिळनाडूच्या जंगलातील जैववैविध्याचा अनुभव घेत होते.
आपल्या प्राणावर बेतलेले असतानाही लेखकांनी सतत विरप्पनशी स्नेहभाव ठेवला, त्याच्याशी विविध विषयांवर गप्पा मारल्या त्याला बोलता केलं, त्याचे पूर्वायुष्य जाणून घेतले,सरकारला शरण जाण्याचा सल्ला सुद्धा दिला.आणि शेवटी स्वता:बरोबरच इतर ४ जणांचीही सुटका करून घेतली.. कृपाकर आणि सेनानी यांचं जग वीरप्पन आणि त्याच्या टोळीपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं . पण तरीही या अपहरणनाट्यात अपह ृत आणि अपहरणकर्ते यांच्यात एक अनामिक स्नेहबंध निर्माण झाला होता.
' पक्षी , पशू आणि डाकू ' हे पुस्तक म्हणजे कुप्रसिद्ध डाकू आणि त्याच्या टोळीबरोबर आलेल्या नर्म आणि हृदयस्पर्शी अनुभवांचं चित्रण करणारी साहसगाथा आहे..गंभीरपणे लिखाण न करता एकदम हलक्या फुलक्या पद्धतीने लिखाण केलं आहे जो वाचताना प्रचंड मजा येते..❤️
नक्की नक्की वाचा....
©Moin Humanist✍️

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने