vachnaryachi rojnishi वाचणाऱ्याची रोजनिशी " BOOK सतीश काळसेकर
vachnaryachi rojnishi वाचणाऱ्याची रोजनिशी " BOOK सतीश काळसेकर |
किंमत :- 300₹ घरपोच
पृष्ठसंख्या :- 292
हार्डकव्हर
सतिश काळसेकर सर लिखित वाचणाऱ्याची रोजनिशी हे पुस्तकावरील पुस्तके (Books on Books) या प्रकारात मोडणारं पुस्तक आज दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केलं.काही पुस्तके अशी असतात जी एकदा वाचून मन भरत नाही तर ती परत परत वाचावी लागतात.त्या पुस्तकाच्या यादीत हे पुस्तक मला आवर्जून ऍड करावं वाटतं.सतीश काळसेकर हा उमदा व्यक्तिमत्त्व, कमालीचा लेखक आणि तेवढ्याच ताकदीचा वाचक मागच्या वर्षी आपल्याला सोडून गेला .या माणसाच्या जाण्यानं साहित्य क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.जी कधीही भरून येणारी नाही.सतीश सर जरी आपल्याला सोडून गेले असतील पण तरी त्यांच्या साहित्यरूपी ते आपल्या हृदयात कायम राहतील एवढं नक्की.मला या पुस्तकाबद्दल त्यांना अभिप्राय द्यायची फार इच्छा होती.माझा अनुभव शेअर करायला खूप आवडलं असतं पण नियतीला हे मान्य नव्हतं.अभिप्राय कळवण्याआधीच ते गेले या गोष्टीचं दुःख कायम मनात सलत राहणार.आणि त्यांचं वाचन,पुस्तक प्रेम मला नेहमी सतत प्रेरणा देत राहणार आहे.
2013 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त हे पुस्तक वाचून प्रचंड आनंद झाला.लेखकांचा पुस्तक आणि वाचन वेड बघून भारावून गेलो.खूप काही नवीन आणि महत्वपूर्ण या पुस्तकातून शिकायला मिळालं.अजून कितीतरी पटीने प्रचंड चांगली दर्जेदार पुस्तके संग्रही करून वाचायची प्रेरणा मिळाली.पुस्तकावरील प्रेम अजून कितीतरी पटीने वाढलं.आतापर्यंत वाचलेलं जे खूप वाटतं होतं ते आता खूप कमी वाटतं आहे.असंख्य चांगल्या हिंदी,इंग्रजी आणि मराठी पुस्तक आणि मासिकाबद्दल तसेच लेखकाबद्दल महत्वपूर्ण आणि गरजेची माहिती मिळाली.वाचन करायला आपलं आयुष्य किती छोटं आहे आणि एकंदरीत सर्व साहित्य किती अफाट आहे याची प्रचिती आली.तर आपल्या आजूबाजूला किती भन्नाट आणि अफलातून वाचक आहेत तर काही होऊन गेले याबद्दल विचार करूनच मन प्रफुल्लित झालं.मोटिव्हटेड झालो ती गोष्ट वेगळीच.
या पुस्तकामधील प्रत्येक लेख हा पूर्वी 'वाड्•मयवृत्त' आणि 'साप्ताहिक साधना' मध्ये पूर्वप्रकाशित झाला असून डिसेंबर 2003 ते जानेवारी 2009 प्रत्येक प्रकाशित झालेल्या सर्व लेखनाचे एकत्रित संग्रह "वाचणाऱ्याची रोजनिशी" या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात.काही वर्षांत ग्रंथ निर्मितीचा वेग प्रचंड वाढला आहे. पण यातली नेमकी कुठली पुस्तके वाचावीत असा प्रश्न आपल्याला पडतो. या पार्श्वभूमीवर कुणाचं तरी मार्गदर्शन मिळालं तर बेस्ट होईल.आणि त्यातच हे असलं मार्गदर्शन सतीश काळसेकरांसारख्या अफाट व्यासंगी अवलियाकडून मिळत असेल तर किती भारी.सतीश काळसेकर या माणसाचं अफाट वाचन आणि त्याला साजेसं लिखाण प्रत्येक वाचकाला आपल्या प्रेमात पाडणारा आहे.त्यांचा वाचन आणि पुस्तक प्रेम व पुस्तक संग्रहाबद्दल वाचून आपल्याला हेवा वाटतो.त्यांचा एकंदरीत वाचन प्रवास,पुस्तक संग्रह,पुस्तक प्रेम आणि वाचनामागची भूमिका माझ्यासारख्या असंख्य पुस्तक प्रेमींना कायमस्वरूपी प्रेरणा देणारी आहे.
सतीश सर म्हणतात :-
वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी गावातील ग्रामपंचायतीच्या मोफत वाचनालयापासून वाचायला सुरुवात झाली आणि तिथून हे बोट कधी सुटलेच नाही. ‘काळाच्या, इतिहासाच्या, भूगोलाच्या, समाजाच्या आणि व्यक्तिगत आयुष्याच्या मर्यादा वाचनाने ओलांडता येतात. आपल्या स्वानुभवाच्या सीमा वाचनाने पार करता येतात. मागला काळ आणि आताचा काळ, त्यातून भविष्याचा विचार, संस्कृतीमधील भेदाभेद, माणसा-माणसामधले माणूसपण आणि हजारो अंतर्वरिोध, मानवेतर विश्व आणि त्याचे व्यापार हे सगळे समजून घेण्यासाठी ग्रंथ मदत करतात. त्यातून ओळखीच्या जगाची जशी नवी ओळख होते, तशी अनोळखी जग काही प्रमाणात का होईना ओळखीचे होण्याचीही शक्यता असते. मी या सगळ्या कारणांसाठी वाचनाकडे वळलो. वेळ घालवण्यासाठी मी वाचत नाही. किंबहुना वेळ घालवण्यासाठी असा वेळच माझ्याकडे नसतो. निखळ मनोरंजन हा माझ्या वाचनाचा उद्देश नाही. प्रत्येक उत्तम गोष्ट ही गंभीरपणेच आणि कमालीच्या कष्टानेच करायची असते, हे माझे कवितेमधले आणि कवितेबाहेरचेही मत आहे. त्यामुळे वाचनालाही मी गंभीर गोष्ट मानतो..
ही त्यांची वाचनामागची सोप्पी आणि प्रामाणिक भुमीका जी कोणालाही आपल्या प्रेमात पाडते.या पुस्तकातील प्रत्येक लेखातून काळसेकर सर आपलं मत वाचकांच्या समोर मांडतात आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर सांगा, पण संवाद चालू ठेवा, असा आग्रह सुद्धा करतात. मनापासून कोणाशी बोलावं तर ते तुम्हीच असा वाचकांचा विश्वासही संपादन करतात. तुमच्या भेटीमुळे सगळं काही संपलं नसल्याची खात्री पटते अशी ग्वाहीही देतात. कारण त्यांनी लिहून मोकळं व्हायचं आणि वाचकांनी वाचून सोडून द्यायचं हे त्यांना या लेखांतून अपेक्षित नव्हतं. त्यांना अपेक्षित होता तो संवाद आणि त्या निमित्तानं होणारं मंथन. या मंथनातून घडणारी वाचनविश्वाची सर, नव्यानं प्रवेश करणाऱ्या साहित्यकृतींचा परिचय, विस्मरणात गेलेल्या साहित्यकृतींना मिळणारा उजाळा, वाचनसंस्कृतीचं संवर्धन आणि जतन करण्यासाठीची मार्गदर्शक सूत्र, वाचनासाठी आवश्यक पोषक आणि पूरक पर्यावरण. फक्त पुस्तकंच नाही तर नियतकालिकं, अनियतकालिक, दिवाळी अंक अशा इतर साहित्यप्रकारांबद्दल त्याचप्रमाणे साहित्य संमेलन, भाषणे, साहित्यनिर्मितीची प्रक्रिया, ग्रंथप्रदर्शने, ग्रंथसंग्रहाच्या अनेक वाटा, मान्यवर ग्रंथविक्रेते, चित्रपट महोत्सव, कला जगतातील घडामोडी यांचाही परामर्ष ते या लेखात घेतात. वाचना पाठोपाठ ग्रंथसंग्रह, त्याचं व्यवस्थापन, नियमन, काळजी हेही आपोआप यामध्ये येतं.
सतीश काळसेकर सरांनी या पुस्तकात सुचवलेल्या सर्व पुस्तकांची यादी..❤️
1. तुकाराम गाथा
2.आयदान - उर्मिला पवार
3.बलुतं - दया पवार
4.आठवणींचे पक्षी - प्र इ सोनकांबळे
5.काट्यावरची पोट - उत्तम बंडू तुपे
6.अक्करमाशी - शरण कुमार लिंबाळे
7.उपरा - लक्ष्मण माने
8.उचल्या - लक्ष्मण गायकवाड
9.बाप्तिस्मा ते धर्मांतर - इसादास भडके (आत्मचरित्र)
10.किमयागार - अच्युत गोडबोले
11. आत्मचित्र - राम गबाले
12.बिराड - आत्मकथन - अशोक पवार
13.मी इझाडोरा - (इझाडोरा डंकन या जगप्रसिद्ध नर्तकीचे आत्मचरित्र )अनुवाद -रोहिणी भाटे
24.काळे गाणे -मारीयम मकेबा या आफ्रिकन गायिकेची आत्मकथा अनुवाद ज्योत्स्ना कदम
25.कातळाखालचं पाणी - संभाजी भगत आत्मकथन
26.सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी अनुवाद - अप्पा पटवर्धन
27.कस्तुरबा - अरुण गांधी - अनुवाद - अशोक जैन
28.कृष्णराव अर्जुन केळुस्कर - चरित्र (संपादक -धनंजय किर)
29.लोकोत्तर गाडगेबाबा - जीवन आणि कार्य - द.ता.भोसले
30.उत्तुंग आणि एकाकी संशोधक (दामोदर कोसंबी)- सुधीर पानसे
31.विठ्ठल रामजी शिंदे - जीवन आणि कार्य - गो मा पवार
32.आभरान - पार्थ पोकळे
33.मरकॅटर - श्रीकांत लागू
34.नाते - अमर हबीब
35.गंगेमध्ये गगन वितळले - अंबरीश मिश्र
36.गांधी - परंपरा आणि परिवर्तन - सु श्री पंढरीपांडे
3७.औदुंबर - पुस्तकाच्या सहवासात - औदुंबर प्रकाशन
38.वार्ड न 5 के इ एम - डॉ रवी बापट
39.स्पर्श मानव्याचा - विजया लवटे
40.आई समजून घेताना - उत्तम कांबळे
41.मेड इन इंडिया - पुरुषोत्तम बोरकर
42.निवेदन - धर्मानंद कोसंबी
43.तमाशा - एक रांगडी गंमत - संदेश भंडारे
44.सर्वोत्तम रवींद्र पिंगे
45.कथा मुंबईच्या गिरणगावाची - गिरणी कामगारांचा मौखिक इतिहास - नीरा आडारकर
46. आनंदघन - बाबा भांड
47.समाज स्पंदने - अरुण टिकेकर
48.बारोमास - सदानंद देशमुख
49.भालचंद्र नेमाडे यांची सर्व पुस्तके
50.वाट तुडवताना - उत्तम कांबळे
51.कुंभमेळ्यात भैरू - उत्तम कांबळे
52.निवडणुकीत भैरू - उत्तम कांबळे
53. तहान - सदानंद देशमुख
54.निशाणी डावा अंगठा - रमेश इंगळे उत्रदकर
55.रामप्रहर - विजय तेंडुलकर
56.श्यामची आई - साने गुरुजी
57.फु बाई फु - विठ्ठल उमप
58.कांताबाई सातारकर - संतोष खेडलेकर
59.माझ्यासारखा मी - पुरुष बावकर
60.श्रीमंत गोपिकाबाईंची बखर - आनंद विनायक जातेगावकर .
61.इजिप्तायन - मीना प्रभू
62.बाबुराव बागुल यांचे सर्व साहित्य
63.भाऊ पाध्ये यांचे सर्व साहित्य
64.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व ग्रंथ
65.साने गुरुजींचे सर्व ग्रंथ
66.अप्पा पटवर्धन यांचे सर्व ग्रंथ
67.महात्मा फुले यांचे सर्व ग्रंथ
68.विठ्ठल रामजी शिंदे यांचे सर्व ग्रंथ
69.कबिराचे दोहे
70.मुक्ताबाईचे ताटीचे अभंग
71.मिरेची भजने
72.रास (विंदा करंदीकर यांसोबतच्या सहजीवनाच्या आठवणींचे पुस्तक ) - सुमा करंदीकर
73.खाली जमीन वर आकाश - डॉ.सुनीलकुमार लवटे
74.ब्र - कविता महाजन
75.मौनराग - महेश एलकुंचवार
76.नादवेध - अच्युत गोडबोले , सुलभा पिशवीकर
77.वानप्रस्थ - गणेश देवी
78.गयपातं - दिनकर दाभाडे
79.कलिकथा व्हाया बायपास - अलका सारगवी
80.झोत - रावसाहेब कसबे
81.एका स्वागताध्यक्षाची डायरी - उत्तम कांबळे
82.अनुवाद , वर्णव्यवस्था आणि मी - डॉ.सूर्य नारायण रणसुभे
83.पुणे शहराचे वर्णन - नारायण विष्णू जोशी (साल 1868)
84.औत्शविच छळ छावणी - नाझी नरसंहार - कुमार नवाथे
85.अक्षर निष्ठांची मांडीयाळी - ग्रंथशोध आणि वाचन बोध.
86.चकवाचांदण -मारुती चितमपल्ली
87.तीर्थ यात्रा प्रबंध - अनंत नारायण भागवत
88.देशी हुन्नर अथवा हिंदुस्थान देशातील कारागिरीचे वर्णन - रावसाहेब बालकृष्ण आत्माराम गुप्ते
89.नपेक्षा (लेख संग्रह )- अशोक शाहने
90.बदलता महाराष्ट्र - संपादक - भा. ल.भोळे आणि किशोर बेडकीहाळ
91.चित्रकार सुधीर पटवर्धन
92.देशीवाद (समीक्षग्रंथ)- अशोक बाबरा
93.स्वातंत्र्य, समता ,न्याय - मे.पु. रेगे
कथासंग्रह
1.एक होता उंदीर (कथा संग्रह ) - मल्लिका अमर शेख
2.कोहम कोहम (कथा संग्रह ) - मल्लिका अमर शेख .
3.याइडा पीडा टळो (कथासंग्रह ) - आसाराम लोमटे
4.फिनिक्सच्या राखेतून उठला मोर - जयंत पवार
5.परिव्राजक (कथासंग्रह)- गौतमीपुत्र कांबळे
6.पेशवाईत मेलेला पांढरा उंदीर (कथा संग्रह)- डॉ.कुमार अनिल
7.राज्य राणीचं होतं (कथा संग्रह ) - सतीश तांबे
हिंदी
1.आखरी कलाम - दुधनाथ सिंह
2.लोट आ ओ धार - दुधनाथ सिंह
3.याद की रहगुजर - शौकत कैफि
4.हम जो देखते है (कविता) - मंगेश डबराल
5.मेरे हिस्से की रोषणाई - नूर जहिर
6.ईश्वर की आख - उदय प्रकाश
7.गालिब छुटी शराब - रवींद्र कालिया (हिंदी)
8.सृजन के सहयात्री - रवींद्र कालिया
कविता संग्रह आणि कविता विषयक
1.व्यवहाराचा काळा घोडा (कवितासंग्रह) - अजीम नवाज राही
2.मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे (कविता) - नामदेव ढसाळ
3.आधुनिक कवितेला सात छेद (लेखमाला) - दि. पु.चित्रे
4.विंदा करंदीकरांची कविता
5.जागतिकीकरणात माझी कविता - उत्तम कांबळे
अनुवाद
1.कला म्हणजे काय ? टॉलस्टॉय - अनुवाद - साने गुरुजी
2.लस्ट फॉर लाईफ ( व्हॅनगोग चे चरित्र)- अनुवाद - माधुरी पुरंदरे
3.रशियन कवीचे आत्मवृत्त (अनुवाद -भगवंत क्षीरसागर )
4.मुकवेदना -काळोखातील भारताची - अनुवाद - वृंदा भार्गवे
5.आई - मॅक्झिम गोर्कि (अनुवाद - प्रभाकर ऊर्ध्वरेषे )
6.हियर आय स्टँड - पॉल रॉबसन (अनुवाद - पुरुषोत्तम देशमुख )
7.What is history ? E.H.Car (इतिहास म्हणजे काय ? अनुवाद - वि गो लेले
8.होलोकास्टच्या कविता - (अनुवाद - सुनंदा महाजन)
9.ट्युसडे विद मोरी - मीच अलबम -अनुवाद - सुनंदा अमरापूरकर
10.रिल्के ची दहा पत्रे - अनुवाद - अनिल कुसुरकर
11.अरेबा परेबा (कथा संग्रह ) - उदय प्रकाश - अनुवाद - जयप्रकाश सावंत .
12.मोरनामा आणि इतर कथा ( अनुवाद - भा.ल.भोळे )
13.कहाणी एका लोक विलक्षणाची - येवगेनी येवगुशेंतो
14. तिरिछ आणि इतर कथा - उदय प्रकाश
इत्यादी..
सर्वांनी नक्की हे पुस्तक वाचावे.
©Moin Humanist✍️
टिप्पणी पोस्ट करा