अंनिसला नडणारा हा बागेश्वर बाबा आहे तरी कोण?।Bageshwar Maharaj Inforamation
नमस्कार मित्रांनो सध्याच्या घडीला आपण सर्वजण बागेश्वर महाराज यांच्याविषयी बातम्यांमध्ये ऐकत आहोत तरी
अंनिसला नडणारा हा बागेश्वर बाबा आहे तरी कोण?
बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्रकृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्रातील संघटनेचे श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला आहे. ते म्हणतात की बाबांना सिद्धी नाही. जनतेच्या भावनांशी ते खेळत आहेत. बाबांवर दांभिकता निर्माण केल्याचा आरोप करत त्यांनी नागपुरात त्यांच्या मंचावर येऊन चमत्कार दाखवावा, असे आव्हान दिले. त्यांनी असे केल्यास त्यांना 30 लाख रुपये दिले जातील.अंनिसला नडणारा हा बागेश्वर बाबा आहे तरी कोण?
कोण आहेत धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज?
बागेश्वर महाराजांचं मूळ नाव धीरेंद्र रामकृपाल गर्ग. असून त्यांचा जन्म 1996 साली त्यांचा झाला. त्यांचं जन्मस्थान हे मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातल्या गढा गावात. त्यांच्या वडिलांचं नाव हे रामकृपाल गर्ग आणि आईचं नाव सरोज गर्ग. असे तीन भावंडांमध्ये धीरेंद्र हे सर्वात मोठे आहेत. त्यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. धीरेंद्र यांचं शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालं आहे.धीरेंद्र कृष्ण शास्त्री तथाकथित महाराज कसे बनले?
धीरेंद्र यांचे आजोबा भगवानदास गर्ग हे निस्सिम हनुमान भक्त होते. बागेश्वरमध्ये असलेल्या हनुमान मंदिराचे ते पुजारी होते. त्यांच्याकडे दिव्यशक्ती होती, ज्याद्वारे ते लोकांचं भविष्य जाणून घ्यायचे, असा गर्ग कुटुंबियांचा दावा आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या या अलौकिक शक्तीमुळेच, आपल्याला लोकांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेण्याची सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा धीरेंद्र महाराज करतात.शिक्षण संपलं तस धीरेंद्र महाराजांनी आपल्या आजोबांप्रमाणेच आपलाही दरबार भरवायला सुरुवात केली.व सोळाव्या ते सतराव्या वर्षी महाराज अनेक जणांच्या अडचणीचे निराकारण करू लागले सोबत रामकथा असल्याने अनेक भक्तजण हजेरी लावू लागले .
बागेश्वर बाबांची पद्धत काय?
दरबारात हजर राहणाऱ्या पैकी एकाला मंचावर ते बोलावतात त्याची समस्या कागदावर लिहायला सांगून ते सर्वासमोर त्याचा उपायही सांगून जातात ते लोकांच्या मनातील भूतही उतरवतात असा दावा केला आहे त्यांनी
बागेश्वर उर्फ धीरेंद्र महाराज जे दावे करतात, तो चमत्कार नसून समाजसेवा असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. जेव्हापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्वर महाराजांना चॅलेन्ज केलं.
टिप्पणी पोस्ट करा