प्रसिद्ध कन्नड लेखक विवेक शानभाग लिखित "घाचर घोचर" मराठी अनुवाद


Ghachar Ghochar Book by Vivek Shanbhag
Ghachar Ghochar Book by Vivek Shanbhag

मागे गुड रिड्स वर सहजच प्रसिद्ध कन्नड लेखक विवेक शानभाग लिखित "घाचर घोचर" ही कादंबरी दिसली..मुखपृष्ठ बघून,थोडे फार समीक्षण आणि गिरीश कर्नाड व इतर काही जणांचे अभिप्राय वाचून ही कादंबरी वाचायची ठरवली.मुळ कन्नड भाषेत असलेल्या या कादंबरीचा मराठी अनुवाद मेहता पब्लिकेशन कडून आलं आहे.हे समजताच निखिल दादाच्या आपल्या बुककट्टा वरून लगेच मागवून घेतली.

एकदम छोटेखानी पुस्तक असल्याने गेल्या रविवारी इतर काही न वाचता हीच वाचायला घेतली आणि काही तासांतच वाचून पूर्ण केली.
एकंदरीत कादंबरी वाचून मला खूप भारी वाटलं,अनेक दिवसांनी वेगळं आणि काहीतरी युनिक वाचायची इच्छा होती.ती या कादंबरीने पूर्ण केली.एक अफलातून अनुवाद वाचल्याचं आनंद झाला.वाचताना कोठेही जरा सुद्धा वाटलं नाही की मी अनुवाद वाचतोय.अपर्णा नायगांवकर यांनी खूप छान पद्धतीने अनुवाद केलंय जो मनाला भावून गेला.
जेमतेम 118 पृष्ठसंख्या असलेली ही कादंबरी आणि यामध्ये एकदम कुशलतेने मांडलेली हलकी फुलकी कथा वाचकाला कोठेही बोअर न करता एक शानदार प्रवास घडवून आणते.सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत खिळवून ठेवते.कौटुंबिक विषयांवर लिहलेली ही कादंबरी एका घरातील माणुसकी,प्रेम,आनंद,सुख/दुःख,एकता, चुकी,भांडण,धोके इत्यादी खूप सारं पकडून ठेवून वाचकाला गुंतवून ठेवते..हलकी फुलकी आणि सोपी कथा जी अनेक भारतीय कुटूंबाचे पदर उलगडते.ही कादंबरी बंगळूरुमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आतील बदलत्या रचनेचे सुंदर विहंगावलोकन करून देते.
निवेदक जो स्वतः या कादंबरीचा एक पात्र आहे तो आपल्या भाषेत कादंबरीच्या आतील वेगवेगळ्या पात्राचा आणि प्रसंगाचा सुंदर वर्णन वाचकांना करून देतो.कादंबरी मुख्यतः निवेदकाच्या कुटुंबाशी संबंधित आहे,जे कथेमध्ये सामान्यत: मध्यमवर्गीय असल्याचे चित्रित केले आहे. त्यांना पैशाचे मूल्य चांगल्या प्रकारे कळत असते आणि म्हणूनच ते त्यांच्या खरेदीमध्ये खूप ऍडजस्ट करत असतात. आवडती खरेदी हे त्यांचे एक दूरचे स्वप्न आहे.दिवाळी साठी कपडे खरेदी करण्याआधी कुटुंबात चर्चा होते.ते एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यास, ते फक्त ठराविक डिशेस ऑर्डर करू शकतात. तथापि,हे सर्व बदलते, जेव्हा चिक्कप्पा स्वतःचा कौटुंबिक व्यवसाय सुरू करण्याची कल्पना निवेदकाच्या वडिलांकडे मांडतो. व्यवसाय त्यांना आर्थिक समृद्धी आणतो, परंतु त्यांच्या नैतिकतेच्या किंमतीवर. लवकरच, कुटुंब खरोखर आवश्यक नसलेल्या गोष्टींवर पाण्यासारखे पैसे खर्च करताना दिसून येतो.. शिवाय, ते त्यांचे कौटुंबिक संबंध तुटताना पाहतात.
कादंबरीतील कथेत एक मध्यमवर्गीय कुटुंब कशाप्रकारे एक व्यवसाय सुरू करतो.व पुढे आर्थिकदृष्ट्या संपन्न कसे होतो हे आपल्याला पाहायला मिळते.आणि पुढे चालून या आर्थिक सुबत्तेमुळे कुटुंबाच्या दृष्टिकोनात कसा बदल होत जातो,गरज नसताना सुद्धा काही वस्तू कशाप्रकारे खरेदी केल्या जातात,यांच्या राहणीमानात बदल कसा होतो ?
आणि पैशाला पूर्वीसारखे महत्त्व देणे कसे आपोआप कमी होत जाते.इत्यादी काही प्रश्नांची उत्तरे वाचकाला मिळत जातात.आणि ही आपल्या भारतीय समाजाची आणि बहुसंख्य कुटुंबातील सच्चाई आहे हे आपल्याला कळून चुकते.आणि या गोष्टीवरूनच येथे निवेदकाने केलेला खालील हा कथन हा खरा ठरतो.
निवेदक म्हणतो :-
"आपण पैशांवर नियंत्रण ठेवत नाही तर पैसा आपल्यावर नियंत्रण ठेवतो . हा पैसा कमी प्रमाणात असतो तेव्हा तो नम्रपणे वागतो . मात्र तो वाढला की तो उद्धटपणा करू लागतो , मनमानी करू लागतो.'
कादंबरीच्या कुटुंबात आई, वडील, चिक्कप्पा (काका), निवेदक आणि त्याची घटस्फोटित बहीण मालती यांचा समावेश असतो. कथनकर्त्याची पत्नी अनिता ही त्यांच्या कुटुंबातील नवीन जोड असते.कादंबरीच्या शेवटी वाचकाला अस्वस्थ वाटू लागते.शेवट स्पष्ट नसल्याने वाचकांच्या मनात अनेक शक्यता जन्म घेतात.पण बहुतेक या काही अनुत्तरित प्रश्नाचं उत्तर लेखकाने वाचकांच्या साठी एक कोडं म्हणून सोडलेलं आहे.पण असंख्य बारीकसारीक तपशीलामुळे ही कादंबरी खूपच वाचनीय झाली आहे एवढं नक्की.
नक्की वाचा ❤️
कादंबरी हवी असेल
©Moin Humanist✍️

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने