राजे चालुक्य द्वारा निर्मित मानकेश्वर महादेव मंदिर . हे मंदिर बाराव्या शतकामधील महादेव मंदिर |mankeshwar mahadev mandir


mankeshwar mahadev mandir
मानकेश्वर महादेव मंदिर|mankeshwar mahadev mandir



मानकेश्वर महादेव मंदिर |mankeshwar mahadev mandir

ता भूम जिल्हा धाराशिव अप्रतिम शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना राजे चालुक्य द्वारा निर्मित मानकेश्वर महादेव मंदिर . हे मंदिर बाराव्या शतकात बांधले गेले असावे असे तज्ञांचे मत आहे.


धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात बार्शी पासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर बार्शी भूम रोडवर ( माणकेश्वर मार्गे ) हे प्राचीन महादेव मंदिर आहे. मंदिराच्या बाह्य भागावर अप्रतिम असे सुरसुंदरीचे शिल्प आणि देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाह्य भागावरील शिल्पाला प्रमाणाच्या बाहेर हळदी कुंकू फासले आहे. शिल्पाना हळदी कुंकू फासन्याचे कारण समजले नाही.या मुळे शिल्पाचे मुळ सुंदरता झाकली जाऊन शिल्प विद्रुप दिसत आहेत.


मंदिराच्या खोल गर्भगृहात महादेवाची मोठी पिंड आहे. मंदिरासमोर नंदीमंडप असून मंडपात मोठ्या आकाराचा सुंदर नंदी आहे. मंदिराचे गर्भगृहातील पाणी मकरप्रनाल मधुन बाहेर पडते त्या ठिकाणी तर अक्षरशः घानीचा खच पडला आहे.
हे मंदिर विश्वकर्मा नदीच्या किनारी सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी मंदिराची उभारणी केली गेली आहे.


इ स १६५९ मधे अफजल खान शिवाजी महाराजांचा पाडाव करण्याच्या उद्देशाने निघाला. विजापूर, सोलापूर, तुळजापूर, मानकेश्वर,करकंब, भोसे, पंढरपूर. रहिमतपूर मार्गाने वाईस गेला. जाताना वाटेत पडनार्या मंदीराची तोडफोड केली.त्या तोडफोड केलेल्या मंदिरात मानकेश्वर (mankeshwar mahadev mandir)मंदिराचा समावेश आहे.( संदर्भ - मराठी रियासत, भाग १ लेखक गो स सरदेसाई )
या मंदिराच्या बाह्य भागावर असलेल्या देवतांच्या व सुरसुंदरीचे शिल्पांची अफजल खान, मोगल आणि रझाकार यांनी भयंकर तोडफोड केली आहे. 

कुठलेही शिल्प किंवा प्रतिमा पूर्ण अवस्थेत नाही.मंदिर परिसरात खूप सारे तोडलेले मंदिर अवशेष विखुरलेले आहेत. मंदिरा समोरच एक चौथरा आहे. या चौथर्यावर पुर्वी मंदिर असावे. मंदिराच्या परिसरात विखुरलेले अवशेष याच तोडलेल्या मंदिराचे असावेत.
चौथर्यावर गणपती, दोन नंदी, नागदेवता, विरगळ यांचें भग्न अवशेष पडलेले आहेत.
या मंदिराच्या बाजूला एक सटवाई चे मंदिर आहे. या मंदिरात मांस नैवेद्य चालतो. मंदिर परिसरात बकरे व कोंबड्यांचा बळी दिला जातो. हे सर्व करणारे भाविक हि़दूच‌ . येथे दारू पिऊन मटन खाऊन आराम करायला व गोधडी अंथरुण झोपायला मानकेश्वर मंदिरात जातात.


हे थांबायला हवे. भाविकांनी सटवाईची पुजा अर्चा जरूर करावी पण मांस भक्षण करून मानकेश्वर मंदिरात जाऊ नये. अशाने आपणच आपल्या मंदिरांची विटंबना करीत आहेत. मानकेश्वर मंदिर आणि सटवाई मंदिर दरम्यान एक संवरक्षीत भिंत असायला हवी जेणेकरून मंदिराचे पावित्र्य जपले जाईल ‌.


मंदिर परिसरात सर्वत्र घानीचे साम्राज्य आहे. दारुच्या बाटल्या, बियरच्या बाटल्या, नारळाचे कस्पट सर्वत्र पडलेले आहेत. कांहीं महाभाग तर मंदिराचे आजूबाजूला प्रांत:विधी उरकून घेतात.
हे कुठेतरी थांबायला हवे.
मानकेश्वर ग्रामस्थ व महाराष्ट्र पुरातत्व विभागाने या बाबतीत लक्ष घालून येथे मंदिराची होणारी विटंबना थांबवावी ही नम्र विनंती.


संदर्भ :

maratha riyasat
maratha riyasat







Jeevan Kawade

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने