कोयाजी बांदल यांची समाधी नेकलेस पॉइंट आळंदे तालुका भोर जिल्हा पुणे.
कोयाजी बांदल यांची समाधी |
दिनांक १८/११/२०२२ रोजी पुण्याहून नेकलेस पॉइंट जवळील कोयाजी बांदल यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मला इथे आश्चर्य पण वाटले. कांहीं पर्यटक पाण्याणे तुडूंब भरलेल्या नेकलेस पॉईंटच्या विहंगम दृश्याचा आनंद घेत बसले होते पण त्यांना स्वराज्याचे महान सेनापतीच्या समाधीची माहिती नव्हती. जवळच हॉटेल नेकलेस पॉइंट चे मालक व कोयाजी बांदल यांचें वंशज अक्षय बांदल भेटले व त्यांनी समाधी मंदिराकडे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.
पुण्यातील लाल महालात कुंडली मारुन बसलेल्या शाहिस्तेखानावर सर्जीकल स्ट्रायीक करण्याचा बेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आखला व त्याचे तीन बोटे तोडून ससैन्य पुण्यातुन पळवून लावले. कोयाजी बांदल हे हिंदूस्थानातील पहिल्या यशस्वी सर्जीकल स्ट्रायीकच्या टीमचे सदस्य होते. या सर्जीकल स्ट्रायीकचे नेतृत्व स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. या सर्जीकल स्ट्रायीकचे वेळी महाराजांचे सहा मावळे ठार झाली होती व चाळीस जखमी झाली होती. जखमी झालेल्यात कोयाजी बांदल हे खूप जख्मी झाले होते व कांहीं दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्या बद्दल महाराजांनी मौजे आलंदे तर्फ हिरडस मावळ येथे जमीन इनाम देऊन कोयाजींचा गौरव केला.
कोयाजी बांदल यांच्या समाधी मंदिराकडे जाताना रस्त्यातच पुरातन शिवकालीन शंभु महादेवाचे मंदिर आहे. येथुन जवळच थोड्याशा उंच टेकडीवर निसर्गरम्य ठिकाणी कोयाजी बांदल या महान सेनापती ची समाधी आहे. पुर्वी या सामाधीचे बाजूने चौथरा व संरक्षण भिंत असावी. कारण समाधी परिसरात चौथरा सदृश्य अवशेष विखुरलेले दिसतात.
या समाधीचे संवर्धन होने गरजेचे आहे.
आशा या महान सेनापती यांना मानाचा मुजरा.
जय श्री शिवराय जय श्री कोयाजी
कोयाजी बांदल यांची समाधी ठिकाण
टिप्पणी पोस्ट करा