अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. |Ajinkyatara Fort
पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा.
अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. |
साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार दुसऱा भोज राजाने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी कडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स.१५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबीला सरदार किश्वरखान याने या किल्ल्यावर कैद करून ठेवले होते. अजिंक्यतारा किल्ल्याचा उपयोग सतराव्या शतका पर्यंत कारागृह म्हणून केला जात होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. छत्रपती शिवाजी महाराज अजिंक्यतारा किल्ल्यावर दोन महीने वास्तव्यास होते. या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांना ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात आला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी अजिंक्यतारा गडावर किल्लेदार प्रयागजी प्रभू होते.
१३ एप्रिल १७०० रोजी रात्री औरंगजेबाच्या मुघल सैनिकांनी सुरूंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली होती. भुयारातील सुरंगाना बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात उंच उडाला . किल्ल्याच्या तटावरील काही मराठे दगावले होते आणि तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला.तटाचा मोठा भाग पुढे सरकणाऱ्या मोगल सैन्यावर पडला व दीड हजार मोघल सैनिक मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला म्हणून २१ एप्रिल रोजी अजिंक्यतारा किल्ला सुभानजीने जिंकून घेतला.
किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. औरंगजेबाने किल्ल्याचे नामकरण आझमतारा केले .ताराराणीच्या मराठा सैन्याने पुन्हा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नामातंर अजिंक्यतारा केले. नंतर पुन्हा अजिंक्यतारा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला.इ स १७०८ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी किल्लेदारास फितवून किल्ला घेतला. नंतर शाहू महाराजांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर राज्याभिषेक करून घेतला. मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छ.शाहूंनी सातारा शहराची स्थापना यावेळी केली. दुसऱ्या शाहूच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.
अजिंक्यतारा किल्ल्यावर पहाण्या सारखी ठिकाणे.
महाराणी ताराराणी महालाचे अवशेष
राज सदरेचे अवशेष
गडावरील बुरुज
गडावरील तलाव
धान्यांचे कोठार
टांकसाळीची वास्तू
हनुमान मंदिर
मंगळाई देवीचे मंदिर
महा दरवाजा
दक्षिण दरवाजा
इत्यादी
. - पहिली राजगड दुसरी रायगड तिसरी जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा.
टिप्पणी पोस्ट करा