सज्जनगड जिल्हा सातारा | Sajjangad Fort Satara
छत्रपती शिवाजी महाराजांचा गड सज्जनगड
छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड सज्जनगड
सज्जनगड जिल्हा सातारा |
रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेला गड सज्जनगड
रामदास स्वामींनी श्री रामाची आणि हनुमान मुर्ती स्थापन केलेला गड सज्जन गड(Sajjangad Fort Satara)
सज्जनगड हा किल्ला सातारा जिल्हा मधील परळी जवळ असल्याने या गडाला परळी चा किल्ला असे म्हटले जात होते .
११ व्या शतकात शिलाहार राजा भोज याने हा किल्ला बांधला. इ स १६७३ पर्यंत हा किल्ला विजापूरकर आदिलशहाच्या ताब्यात होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला .
हा किल्ला स्वराज्यात आल्यावर श्री रामदास स्वामी या सज्जनगड किल्ल्यावर वास्तव्यास राहिले .
इ स १७०० साली औरंगजेब सरदार फतेउल्लाखानाने सज्जनगड जिंकून घेतला व त्याचे नाव नौरससातारा असे ठेवण्यात आले .
इ स १७०९ साली मराठ्यांनी सज्जनगड पुन्हा जिंकून स्वराज्यात सामील केला
. इ स १८१८ मधे सज्जनगड इंग्रजांनी जिंकून घेई पर्यंत हा किल्ला स्वराज्यात राहिला
गडाचे दोन दरवाजे, श्रीराम मंदिर व श्री रामदास स्वामी समाधी, हनुमान मंदिर, कांहीं तटबंदी व पुरातन बारव हे शिव छत्रपती व संभाजी महाराज काळातील कालीन वास्तू गडावर आहेत.
( सद्यस्थितीत सिमेंट बांधकामाच्या विळख्यात गडाचे गडपण हरवले जात आहे असे मला वाटते .)
टिप्पणी पोस्ट करा