बसवकल्याण (कल्याणी)।basavakalyan 

 

basavakalyan
basavakalyan


 पुर्वी कल्याण म्हणून ओळखले जाणार हे नगर बहमनी राज्याच्या काळात ‘कसबा कल्यान’ नावाने ओळखले जात असे. बसवकल्याण हे बीदर शहराच्या पश्चिमेस  ८० किलोमीटरवर  सोलापूर-हैदराबाद महामार्गाच्या  जवळ  सूमारे ४ किमी अंतरावर वसले आहे.

अकराव्या शतकात बादामीच्या चालुक्य राजे पहिल्या सोमेश्वराने आपली मलखेड ही राजधानी  ‘कल्याणपूर’ किंवा कल्याण येथे राजधानी स्थापित केली. त्या काळी कल्याण हे नगर  ऐश्वर्यसंपन्न नगर म्हणून प्रसिद्धीस आले. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात त्या राज्याचा सामंत बिज्जल कलचुरी  याच्या हाती सर्व सत्ता जाऊन चालुक्यांची सत्ता  लयास गेली. मात्र कल्याणचे महत्त्व पुर्वी प्रेमाने कायम राहिले. कलचुरी सत्तेनंतर  कल्याण चे साम्राज्य देवगिरीचे यादव यांच्या कडे गेले. चौदाव्या शतकात बहमनी राज्यव नंतर आदिलशाही राज्य अशी अनेक सत्तांतरे येथे झाली. १६५३ मध्ये हे नगर मोगलांनी लुटले व १६५६ मध्ये औरंगजेबाने बसवकल्याण किल्ला जिंकला आणि बसवकल्याण हे मोगल अंमलाखाली आले.

 शहराच्या उत्तरेस चिरेबंदी दगडी पायावर उभारलेला चालुक्यकालीन भव्य भुईकोट किल्ला पुरातन वैभवाची साक्ष देत उभा आहे .

या किल्ल्याच्या आतील कोट, महाल वाडे हे बहामनी काळात बांधले असावेत.या किल्ल्यात दोन पेक्षा जास्त चालुक्य काळातील मंदिरे होती. बहुतेक बहामनी अमलात ती मंदिरे पाडून मंदिराचे दगड, शिल्प, देवतांच्या मुर्ती व मंदिराचे इतर हजारो अवशेष किल्ल्याचे आतील कोटाच्या बांधकामात वापरलेले दिसतात . किल्याच्या आत जागोजागी मंदिर अवशेषांचा खच पडला आहे.

किल्ल्यात अनेक तोफा असून त्यांपैकी कडक बिजली ही तोफ प्रसिद्ध आहे.

 चालुक्य राजवटी नंतर झालेल्या अनेक लढायांत येथील  बरेच मंदिरे नष्ट झाली तर काहीं मंदिराचे मशिदींत रूपांतर केले गेले आहे.

( सध्या किल्ल्याच्या जिर्णोद्धाराचे काम चालू असल्याने प्रवेश नाकारला जात आहे.)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने