काळ, काम, वेग संबंधित उदाहरणे | kal kam veg
काळ, काम, वेग संबंधित उदाहरणे |
तलाठी भरती साठी लागणारा अंकगणित या विषयातील काळ काम वेग या विषयातील आपण आज माहिती घेणार आहोत तर काळ म्हणजे काम करण्यासाठी लागणारा वेळ काळ आणि काम यांचे समप्रमाणात ते कारण कमी वेळेत काम केले तर कमी काम होईल जास्त वेळ काम केलं तर जास्त काम होईल त्याप्रमाणे. तर दुसरा आहे गती गती हे वेळ याचं व्यस्त प्रमाण आहे त्यामध्ये कामाची गती वाढवली तर दिलेले काम कमी वेळात पूर्ण होते आणि वेग कमी झाला तर कामासाठी लागणारा वेळ पण वाढेल तर आपण या संबंधातील काही महत्त्वाचे म्हणजे इम्पॉर्टंट गोष्टी माहीत करू
काळ व काम एखादी काम करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच काळ ते काम करत असताना ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या संख्येवर अवलंबून असते.
काम करण्यासाठी लागणारा हा वेळ - काम आणि लागणारा वेळ हे समचलनात असतात
तर काम करणाऱ्या लोकांची संख्या व त्यासाठी लागणारा वेळ ही व्यस्त चलनात असते.
काळ अंतर व वेग सूत्र
अंतर = वेग × वेळ
काळ, काम, वेग संबंधित उदाहरणे
एक पाण्याची भरावयास चाळीस मिनिट लागतात. तर पाच टाकी भरण्यासाठी किती मिनिट लागेल
१)२००
२)१६०
३)१५०
४)२४०
उत्तर =२००
स्पष्टीकरण
जसं आपण वरती पाहिले काम करण्यासाठी लागणारा हा वेळ - काम आणि लागणारा वेळ हे समचलनात असतात
म्हणजे १ टाकी भरण्यासाठी ४० मिनिट लागतात
तर ५ टाकी भरण्यासाठी २०० मिनिट लागणार
४० मिनिट ×५ टाकी=२०० मिनिट
२) एका मजुराने सहा खड्डे दोन तासात खोदली तर आणखी तीन खड्डे खोदण्यात त्याला किती वेळ लागेल?
१)६०
२)४५
३)९०
४)५०
यामध्ये पण काम.करण्यासाठी लागणारा वेळ आणि काम हे समप्रमाणात आहेत .
२ तास म्हणजे =१२० मिनिट/६ खड्डे =२० मिनिटे एक खड्यासाठी तर तीन खड्यासाठी =२०×३=६० मिनिटे लागतात.
उत्तर =१) ६० मिनिटे
३) ४ माणसे एक काम करण्यासाठी १२ दिवसात करतात तर तेच काम ८ माणसे किती दिवसात पूर्ण करतील.
१)६ दिवस २)८ दिवस ३)४ दिवस ४)५ दिवस
माणसे वाढली तर काम कमी दिवसात पूर्ण होईल म्हणून त्यामध्ये
तर काम करणाऱ्या लोकांची संख्या व त्यासाठी लागणारा वेळ ही व्यस्त चलनात असते.
यामध्ये माणसाची संख्या वाढली असल्यामुळे काम करण्यासाठी लागणारा वेळ ही कमी लागेल.
४ माणसांना १२ दिवस
८ माणसांना ६ दिवस
उत्तर : ६ दिवस
४) 100 मीटर लांबीची एक आगगाडी एका खांबास दहा सेकंदात ओलांडते ते तर गाडीचा दर ताशी वेग काय.
१)३६
२)४०
३)३०
४)४२
एक तासात ३६०० सेकंद असतात.
३६००सेकंद ×१००मीटर/१०सेकंद= ३६००० मीटर ÷१००० =३६ किलोमीटर
उत्तर= १)३६ किलोमीटर
५) २०० मीटर लांबीची आगगाडी ३०० मीटर लांबीच्या पुलास ओलांडून जाते. गाडीचा वेग ताशी ५० किलोमीटर असेल तर पुल ओलांडण्यास गाडीला किती वेळ लागेल.
१)३६ सेकंद
२)३२ सेकंद
३)४० सेकंद
४)५० सेकंद
स्पष्टीकरण आगगाडी साठी स्वतचं आणि पुलाच अंतर पार करण्यासाठी एकूण २००मीटर+३०० मीटर= ५०० मीटर अंतर पार करावे लागेल.
५० किलोमीटर जाण्यासाठी ३६०० सेकंद लागतात.
१ किलोमीटर जाण्यासाठी ३६००/५०=७२ सेकंद लागतात
५०० मीटर म्हणजेच ०.५ किलोमीटर
७२×०.५ =३६ सेकंद लागतील.
टिप्पणी पोस्ट करा