Simple present tense । साधा वर्तमान काळ ।in marathi & english
Simple present tense । साधा वर्तमान काळ ।in marathi & english |
नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी अनेकजणांना इंग्लिश ग्रामर (ENGLISH GRAMMER )मधील टेन्स (TENSE) काळ भाग लवकर लक्षात येत नाही पण आपण खूप सोप्या पद्धतीने काळ tense शिकणार आहेत तर सुरुवातीला आपण काही गोष्टी शिकणार आहोत त्यामुळे आपल्याला काळ म्हणजेच tense समजण्यासाठी मदत करतील . मराठी ग्रामर प्रमाणेच हे असते याच्या वाक्यरचनेत फरक असतो. तर सर्वात पहिल्यांदा इंग्लिश ग्रामर कठीण असत हा विचार डोक्यातून काढून टाका .आणि सोप्या पद्धतीने tense शिकूया त्यामुळे अनेक परीक्षेत तर उपयोग होईलच पण त्याचबरोबर आपल्याला इंग्लिश बोलताना मदत होईल कुठल्या वाक्यात काय वापरावे हे लक्षात येईल.तर चला मग सुरुवात करू.
रचना – SUBJECT + VERB1 + OBJECT (कर्ता + क्रियापदाचे पहिले रूप + कर्म)
लक्षात ठेवा - साधा वर्तमानकाळात तृतीय पुरुषी कर्ता (He,She,It) व एकवचनी नामे (RAM ,SHAM ,RAVI ,OM इ.) यांच्या नंतर क्रियापदाला s किंवा es हा प्रत्यय लावावा.
साधा वर्तमानकाळात क्रियापदाला s किंवा es हा प्रत्यय लावण्याचे नियम –
👉 साधा वर्तमानकाळात जर तृतीय पुरुषी कर्ता (He,She,It) व एकवचनी नाम असेल आणि क्रियापदाच्या शेवटी ch,sh,ss,x,o,z इ. अक्षरे असतील तर क्रियापदाच्या शेवटी es हा प्रत्यय लागतो.
👉 साधा वर्तमानकाळात जर तृतीय पुरुषी कर्ता (He,She,It) व एकवचनी नाम असेल आणि क्रियापदाच्या शेवटी y असेल पण y पूर्वी व्यंजन असेल तर अशा क्रियापदाच्या शेवटी आलेले y काढून त्याजागी ies प्रत्यय लागतो.
Ex –
fly – flies
cry - cries
👉 साधा वर्तमानकाळात जर तृतीय पुरुषी कर्ता (He,She,It) व एकवचनी नाम असेल आणि क्रियापदाच्या शेवटी y असेल पण y पूर्वी a,e,i,o,u यापैकी स्वर असेल तर अशा क्रियापदाच्या शेवटी आलेले y नंतर s हा प्रत्यय लागतो.
Ex –
play – plays
stay –stays
👉 वरील प्रत्यय हे फक्त जर साधा वर्तमानकाळात कर्ता He,She,It किंवा एकवचनी नामे असतील तरच जोडतात.
रचना – S + V1 + O (कर्ता + क्रियापदाचे पहिले रूप + कर्म)
टिप्पणी पोस्ट करा