निवडक अश्या मराठी वाचनीय 95 पुस्तकांची यादी। 95 best Marathi Book list
कृपया पूर्ण यादी वाचूनच पुस्तके निवडावी...🖤
______________
1) प्रकाशवाटा ~ डॉ. प्रकाश आमटे
मुळ किंमत - 200
We read Price - 185 घरपोच.(शिपिंग फ्री)
आदिवासींच जगणं सुसह्य करण्यासाठी गेली चाळीसहून अधिक वर्षे झटणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांचं आत्मचरित्र.
2) वाचत सुटलो त्याची गोष्ट ~ निरंजन घाटे
मुळ किंमत - 300
We read Price - 250 घरपोच.(शिपिंग फ्री)
विज्ञानासह अनेक विषयांवर विपुल लेखन केलेले लेखक निरंजन घाटे यांच्या ग्रंथवेडाचा प्रवास सांगणारे पुस्तक
3) गॅस चेंबर~रत्नाकर मतकरी
मुळ किंमत - 200
We read Price - 180 घरपोच.(शिपिंग फ्री)
अस्वस्थ वर्तमानाचा प्रतिबिंब टिपत भविष्यकाळाचं सूचन करणाऱ्या कथा. राजकीय भान जाण असणाऱ्या लेखकाने लिहिलेल्या.
4) मृत्यू पाहिलेली माणसं ~ गौरी कानेटकर
मुळ किंमत - 200
We read Price - 185 घरपोच.(शिपिंग फ्री)
आपल्यातल्या प्रत्येकाला 'हरू नकोस, हा शेवट नाही, असं सांगत राहणाऱ्या, मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या.
5)नोकराचा सदरा मूळ लेखक: विनोदकुमार शुक्ल | भाषांतर: निशिकांत ठकार
मुळ किंमत - 300
We read Price - 250 घरपोच.(शिपिंग फ्री)
भारतातल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाची सुखदुःख उलगडून दाखवणारी अनोख्या शैलीतली कादंबरी
6)गोष्ट खास पुस्तकांची युनिक फीचर्स
संपादक: सुहास कुलकर्णी
मुळ किंमत - 200
We read Price - 185 घरपोच.(शिपिंग फ्री)
नामवंत पंधरा लेखक त्यांची पंधरा पुस्तकं आणि आपापल्या पुस्तकांबद्दल त्यांचं म्हणणं मांडणारा दस्तऐवज.
7)प्लॅटफॉर्म नंबर झिरो ~अमिता नायडू
मुळ किंमत - 200
We read Price - 185 घरपोच.(शिपिंग फ्री)
घरच्या सुरक्षित वातावरणाऐवजी रेल्वे स्टेशनवरच्या चक्रव्युहात अडकलेल्या मुलांच्या अस्वस्थ करून सोडणाऱ्या कहाण्या.
8)वाचणाऱ्याची रोजनिशी ~ सतीश काळसेकर
पृष्ठ संख्या -291
हार्ड कव्हर/New
काळसेकरांच्या रोजनिशीत साहित्य म्हटले की त्यात वृत्तपत्रे येतात, नियतकालिके येतात, अनियतकालिके येतात, विशाल ग्रंथराज येतात, कितीतरी विविध प्रकारचे लेखन येते.
9)बालकवींच्या निवडक कविता~ संपादक : ना. धों. महानोर
We read Price - 125 घरपोच.
नवं चैतन्य देणाऱ्या, निस्सीम आनंद देणाऱ्या आणि निसर्गाच्या पायवाटेकडून मृत्यूच्या डोहाकडे घेऊन जाणाऱ्या बालकवींच्या निवडक कवितांचा संग्रह.
10)शहीद भगत सिंह समग्र वाङमय -दत्ता देसाई
पृष्ठ संख्या :-590
Paperback/New
मुळ किंमत - 650
We read Price - 550 घरपोच (शिपिंग फ्री)
भगत सिंह यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जितकं काही लिखाण केलंय, त्यातील आजघडीला उपलब्ध असणार्या सर्व लेखांचे एकत्रीकरण म्हणजे हे पुस्तक आहे. भगत सिंगांनी वृत्तपत्रांमध्ये स्तंभ लिहिले, साथीदारांना पत्रे लिहिली, जेलमध्ये डायरी लिहिली ज्यात त्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधील टीपा काढल्या आणि स्वत:चे विचारदेखील लिहिले. प्रा. चमनलाल यांनी हे मूळ दस्तऐवज एकत्रित केले आहेत तर दत्ता देसाई हे संपादक आहेत. यांनी हे सगळं लिखाण विषयवार एकत्र केले आहेत..
11)भुरा - शरद बाविस्कर
मुळ किंमत - 500₹
We read किंमत - 425 घरपोच (shipping फ्री)
धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या, रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषाशिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या ओढीने वेगवेगळ्या देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेल्या, भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथे घालणाऱ्या, तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेल्या, 'भुरा' ही आपली जातजाणीव ओलांडून मार्क्स, अल्थुझर, ग्राम्शी , महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणाऱ्या प्रा. शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ आत्मकथन.
12)डोंगराएवढा "~शिवराम कारंत
मुळ किंमत -180
We read किंमत - 150 घरपोच (पाठवण्याचा खर्च नाही)
प्रतिकूल परिस्थीती आणि निसर्गाशी दोन हात करत जगणारे गोपालय्या आणि त्यांना साथ देणारी पत्नी शंकरम्मा यांचे सहजीवन तसेच त्यांचा मुलगा त्या उभयतांना भेटायला येत नसल्याची हृदयातील वेदना व त्यांच्या कणखर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी मनोवेधक कादंबरी. मुळात कट्टद गोविंदय्या या व्यक्तीचं बोलणं, वागणं, सच्चेपणा आणि धीरोदात्त वृत्ती या कादंबरीच्या प्रेरणास्थानी आहे. लेखकाने त्यांच्या जीवनावर आधारित गोपालय्या हे पात्र साकारले आहे.
13)असुरवेद -संजय सोनवणी
मुळ किंमत - 280
We read किंमत - 260 घरपोच (शिपिंग फ्री)
तो 'वेद' लोकांसमोर येऊ नये. अशीच 'प्रस्थापिता' ची उच्च होती. त्यांच्या अस्तित्वानं प्रस्थापितांची आसनं गडगडणार हाती; तर तो मातीत गाडल्यानं आसनं आणखी मजबूत राहणार होती. मात्र आता तसं घडणार नव्हतं ! 'सत्य काही काळ दडपता येतं... सर्वकाळ नाही !'या सार्वकालिक नियमानं, सत्याचं दर्शन होताच भयाकूल झालेल्या 'प्रस्थापिता' च्या हडकंपाची कहाणी.. असुरवेद !
14)सेपियन्स -युवाल नोवा हरारी
Paperback/New
मुळ किंमत - 500
We read Price - 400 घरपोच.(शिपिंग फ्री)
१ लाख वर्षांपूर्वी माणसाच्या कमीत कमी
६ जाती पृथ्वीवर राहत होत्या. आज फक्त एकच शिल्लक आहे.
आपण
होमो सेपिअन्स
आपण पृथ्वीवर अधिसत्ता कशी स्थापन केली?
आपल्या भटक्या पूर्वजांनी एकत्र येऊन शहरं आणि
राज्य कशी स्थापन केली?
देव, राजे आणि मानवी हक्क अशा गोष्टींवर आपण कसा
विश्वास ठेवायला लागलो?
आणि येणाऱ्या सहस्रकांमध्ये आपलं जग कसं असेल?
माणसाची विचारपद्धती, त्याचं वर्तन, त्याची बलस्थानं आणि त्याचा
भविष्यकाळ यांबद्दलच्या आपल्या सगळ्या समजुतींना आव्हान देणारं
विचारप्रवर्तक पुस्तक... सेपिअन्स!
15)आदिवासी बोधकथा -एक पुनकर्थन :-
प्रदीप प्रभू/सिराझ बलसारा 🔘
Paperback/New
मुळ किंमत - 250
We read Price - 225घरपोच.(शिपिंग फ्री)
हे पुस्तक खरंच खूप जबरदस्त आणि अप्रतिम आहे.यातील प्रत्येक कथा उत्कृष्ट असून यामध्ये दिलेली वारली चित्रं तर खूप भन्नाट आहेत..गोष्ट सांगण्यासाठी आदिवासी स्त्रिया वारली चित्र काढत असतं. या कथांमध्ये आदिवासींची सारी जीवनपध्दती चित्रित केलेली आढळते.जीवनाचा सह-आनंद लुटलेला दिसतो.आदिवासी समाजातून बहरलेलं तत्वज्ञान यामध्ये सापडतो,
16)द हिडन लाईफ ऑफ ट्रीज -पीटर वोह्लेबेन
मुळ किंमत :- 320₹
We read किंमत :- 285₹ घरपोच (शिपिंग फ्री)
वनस्पतींचे जीवन हे मानवी. कुटुंबरचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे पीटर वोह्ललेबेन ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या पिलांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, पोषणद्रव्ये पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात, आजारपणात शुश्रूषा करतात आणि धोक्यांची पूर्वसूचनाही देतात.
अशा सहजीवनात वाढणार्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायू लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणार्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते. जंगलात राहणार्या आपल्या स्वजातीयांपेक्षा त्यांचे आयुष्यही कमी असते.
17)चाणक्याचा मंत्र ~अश्विन सांघी
मुळ किंमत :- 545₹
We read किंमत :- 455 ₹ घरपोच (शिपिंग फ्री)
चंद्रगुप्ताला विशाल मौर्य साम्राज्याच्या सिंहासनावर विराजमान करतो. आजच्या काळात म्हणजे अडीच सहस्राद्बीनंतर चाणक्य पुन्हा गंगासागर मिश्राच्या रूपात अवतार घेतो. भारतातील एका छोट्या शहरात, व्यवसायाने शिक्षक असणारा गंगासागर अनेक महत्त्वाकांक्षी व्यक्तींना आपल्या हातातील कठपुतळ्या बनवतो.आधुनिक भारत हा प्राचीन भारतासारखाच वर्णभेद, भ्रष्टाचार आणि समाज विभाजक राजकारण ह्यांनी दुंभगलेला आहे. हा कावेबाज पंडित, भारताला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा चमत्कार करू शकेल का? याचे उत्तर मिळवण्यासाठी अश्विन सांघी या सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणाऱ्या या लेखकाचे `चाणक्याचा मंत्र` हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
19)इजिप्सी - रवि वाळेकर(प्रवासवर्णन)
मुळ किंमत :- 750₹
We read किंमत :- 635₹ घरपोच (शिपिंग फ्री)
एका जिप्सीने केलेली इजिप्त देशाची गूढ, रम्य सफर!
अतिभव्य पिरॅमिडस,
ऐतिहासिक अलेक्झांड्रिया शहर,
सुप्रसिद्ध सुएझ कालवा,
गूढ स्फिंक्स या सगळ्या अनाकलनीय
गोष्टींचा उत्कंठावर्धक प्रवास
वाचकांसाठी घडवून आणणारं हे पुस्तक.
20)मनमोहन सिंह ~ अतुल कहाते
मुळ किंमत :- 225₹
We read किंमत :- 200₹ घरपोच (शिपिंग फ्री)
मनमोहन सिंह यांचं खासगी, तसंच सार्वजनिक आयुष्य अनेक पैलूंमधनं रेखाटणारं हे पुस्तक आहे
21)अज्ञात मुंबई ~ नितीन साळुंखे
मुळ किंमत :- 475₹
We read किंमत :- 405₹ घरपोच (शिपिंग फ्री)
सात बेटं असल्यापासून किंबहुना त्याही आधी कधी तरी अस्तित्वात आलेल्या या मुंबई नगरीचा आजवरचा सारा प्रवास जाणून घेण्याचं या माणसाला अफाट वेड आहे. मग तो अख्खी मुंबई पालथी घालतो. जुनी दफ्तरं शोधतो. मुंबईविषयी कळलेला कुठलाही लहानमोठा तपशील, माहिती तो बारकाईने तपासून घेतो. ही अशी शोध मोहीम चालू असतानाच ज्यांना कुतूहल आहे त्यांना मुंबईची कहाणी सांगत सुटतो.
22)नदिष्ट -मनोज बोरगावकर
Paperback/New
मुळ किंमत - 200
We read Price - 180 घरपोच.(शिपिंग फ्री)
विषय चाकोरीबाहेरचा आहे .शैली पहिल्या धारेची आहे .थेट कोंडूरा किंवा बनगरवाडीची आठवण करून देणारे लिखाण आहे .'नदीष्ट ' ही मनोज बोरगावकर यांची केवळ कादंबरी नाही . तो आहे त्यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिद्ध घटनांचा कसदार ललित गद्य हुंकार. 'नदीष्ट ' ही मराठी कादंबरीविश्वातील अकरावी दिशा आहे.
23)शेतापासून ताटापर्यंत - गुरुदरास नूलकर
मुळ किंमत :- 350
We read किंमत :- 325 घरपोच (शिपिंग फ्री)
हवामान संकटाच्या अस्थिर काळात शेती करणं म्हणजे बॉम्बवर्षाव होत असलेल्या युद्धभूमीवर चालणं! गुरुदास नूलकर यांनी या शोचनीय अवस्थेचं अनेकांगी विश्लेषण करून ‘आपल्या ताटाला भरून काढणार्यांच्या ताटात काय असतं?’ हे समोर ठेवलं आहे. त्यांच्या उपेक्षित व अवमानित अवस्था समजून घेण्यासाठी हे पुस्तक वारंवार वाचले पाहिजे.”
- अतुल देऊळगावकर
24)रावण :-राजा राक्षसांचा - शरद तांदळे
Paperback/new
मुळ किंमत - 380
We read Price - 340 घरपोच.(शिपिंग फ्री)
रावण राजा राक्षसांचा ही रामायणातील पराक्रमी, विद्वान,वेदपंडीत,कट्टर शिवभक्त अश्या लंकेच्या राजाची कथा आहे.
आजवरची पुराण, कथा,साहित्य,कला यामधून रावणाला दुर्गुणी,अवगुणी प्रवृतीचा प्रतिक बनवलं गेल. परंतु रावणसंहिता,कुमारतंत्र,सामवेदातील ऋचा,शिवतांडवस्स्तोत्र,वीणा,बुद्धिबळ यांची निर्मिती रावणाने केली.येवढा विद्वान कित्तेक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला?
सर्व देवांना पराभूत करणारा सर्व दैत्य, दानव,असुर आणि कित्तेक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाची वेध घेणारी कादंबरी रावण राजा राक्षसांचा.
25)प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन -विवेक बिंद्रा
मुळ किंमत -200
We read किंमत - 180 घरपोच (पाठवण्याचा खर्च नाही)
या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल ?
कामातली अनावश्यक दिरंगाई टाळत कामावर संपूर्ण लक्ष
केंद्रीत कसं करावं?
अतिरिक्त ताणतणाव कमी करून वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात
योग्य संतुलन कसं साधावं?
26)उपरा ~लक्ष्मण माने
मुळ किंमत - 220
We read Price - 195 घरपोच.
उपरा’ या आत्मकथनातून लक्ष्मण माने यांच्या जीवनातील संघर्षाची प्रत्येक ठिणगी मानवमुक्तीच्या ध्यासाकडे झेपावताना दिसते.
27)वॉल्डन -हेन्री डेव्हिड थोरो
Paperback/New
मुळ किंमत - 350
We read Price - 320 घरपोच.
इ.सन १८५४ रोजी प्रकाशित झालेल्या वॉल्डन या पुस्तकातील थोरो गुरूचे विचार आजच्या युगात सुद्धा तेवढेच प्रासंगिक आहेत.त्याकाळापेक्षा आजच्या काळात थोरो गुरूच्या विचारांची सर्वात जास्त गरज विश्वाला आणि समस्त मानवजातीला आहे.
२ वर्ष २ महिने २ दिवस कंकाॅर्डजवळच्या
वॉल्डन नामक तळ्याकाठी जंगलात वास्तव्य करून तेथे काय काय केलं याचं वृतांत त्यांनी वॉल्डन या पुस्तकात केलेलं आहे.अनुभव सांगता सांगता जीवनातील अनेक समस्यांविषयीचे आपले विचारही त्यांनी या पुस्तकात व्यक्त केले आहेत. अनेक भाषांत या पुस्तकाचे अनुवाद झालेले आहेत. वॉल्डनकाठी त्यांनी स्वतःच्या हाताने घर बांधले,शेती केली,अन्न शिजवले,निसर्गाचे निरीक्षण केले व एकंदरीत निसर्गाशी पूर्णपणे एकनिष्ठ राहून त्यांनी २ वर्ष तेथे काढले. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी स्वकष्टाच्या जीवनाचा आनंद लुटला.या पुस्तकातून मानवी आयुष्यातील काही अशा गोष्टीवर थोरोंनी प्रकाश टाकला ज्याबद्दल आपण कधीही आणि केव्हाही विचार करत नाही..
28)हेन्री डेव्हीड थोरो चरित्र आणि निबंध
Paperback/New
मुळ किंमत :-300
We read Price :-280 घरपोच (शिपिंग फ्री)
अमेरिकेत कॉन्कॉर्ड येथे जन्मलेला हा थोर विचारवंत एक कट्रर निसर्गवादी होता. तो निबंध लिहित असे, कविता करत असे आणि त्याचे स्वत:चे असे खास तत्वज्ञानही होते. तो ट्रान्ससेंडेटॅलिस्ट चळवळीचा खंदा पुरस्कर्ता होता. थोरोच्या लिखाणाचे एकूण २० खंड आज उपलब्ध आहेत. त्यात त्याने लिहिलेली जर्नलही आहेत ज्यावरुन मग पुस्तके छापण्यात आली. त्यातील काही निबंध आणि वॉल्डन या पुस्तकामुळे तो जगप्रसिध्द झाला.
29)ते १२७ तास ~अॅरन
मुळ किंमत :-360
We read Price :-295 घरपोच (शिपिंग फ्री)
अॅरन हा साहसी गिर्यारोहक एकदा कॅन्यनलँड्स या वाळवंटात गिर्यारोहणासाठी गेलेला असताना एका दगडाखाली अडकतो. त्याचा उजवा हात मनगटापासून कोपरापर्यंत चिरला जातो. त्याचा तो जखमी हात दगडाखाली अडकतो. जवळ मोजकंच खाद्य आणि पाणी...अशा परिस्थितीत सुरू होतो वेदनामय संघर्ष...त्या दगडापासून हात सोडवण्यासाठी त्याचे चालू असेलेले विविध प्रयत्न... पूर्वी केलेल्या साहसी मोहिमांच्या मनात दाटलेल्या आठवणी... एका बाजूला प्रचंड वेदना... जवळ असलेल्या व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे आपल्या प्रियजनांबद्दल व्यक्त केलेल्या भावना... अॅरनच्या वेदनामय संघर्षाची थरारक, हलवून सोडणारी कहाणी ‘ते १२७ तास...’
30)एकलव्य -विजय देवडे
मुळ किंमत :-380
We read Price :-340घरपोच (शिपिंग फ्री)
भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात फक्त आवाजाच्या दिशेनं बाण मारून लक्ष्यवेध करणारा एकलव्य बाणावर इतकं नियंत्रण असणारा महाभारतातला एकमेव धनुर्धर म्हणजे एकलव्य! तो एक बुद्धिमंत हुशार राजा होता, त्यांनीही अनेक युद्ध लढली. युद्धात कृष्णालाही नमायला लावणारा तो एक शक्तिशाली धनुर्धर आणि योद्धा होता.
एकलव्य ही कादंबरी वाचल्यावर आपल्या मनाजवळ असलेला राजा.
एकलव्य आपल्याला निश्चित सापडेल.
31)द आंत्रप्रन्योर - शरद तांदळे
Paperback/new
मुळ किंमत - 250
We read Price - 220 घरपोच.(शिपिंग फ्री)
द आंत्रप्रन्योर हे पुस्तक माणसाला विशेषता तरुणांना स्वताची औकात दाखऊन देणारं पुस्तक आहे. शरद तांदळे सरांनी त्यांचा जीवन प्रवास मंडला आहे. ते वाचतांना असे वाटले की माझा आणि त्यांचा जीवन प्रवास सारखाच आहे.
32)एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
मुळ किंमत -250
We read किंमत - 225घरपोच (पाठवण्याचा खर्च नाही)
अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे,
एका विचित्र वळणावर
सारी मानवजात येऊन ठेपली आहे.
आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच
पर्याय उरलेले आहेत.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्या
आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर
हताशपणे वाटचाल करायची
किंवा परत मागे फिरून कार्व्हरने
दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या
संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण
या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा.
भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया
घालायचा असेल तर
प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच
हवे असे पुस्तक.
33)जग बदलणारे ग्रंथ -दिपा देशमुख
मुळ किंमत - 400
We read किंमत - 370 घरपोच (पाठवण्याचा खर्च नाही)
जगभरात आज धर्म, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र अनुवंशशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चरित्र अशा अनेक शाखांमधलं लिखाण ग्रंथांच्या रुपानं निर्माण झालं. यातल्या अनेक ग्रंथांनी जगावर प्रभाव टाकला. यातले निवडक ५0 ग्रंथ घेऊन त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न 'ग्रंथ' मध्ये करण्यात आला आहे. कुतूहल, ज्ञानाची आस असणाऱ्या प्रत्येकानं आपलं जगणं अर्थपूर्ण आणि समृद्ध करण्यासाठी दीपा देशमुख लिखित 'ग्रंथ' वाचायलाच हवा.
34)नाझी भस्मासुराचा उदयास्त -वि.ग कानिटकर
Paperback/New
मुळ किंमत - 525
We read Price - 480 घरपोच.
नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता
अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख
सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते?
हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच
डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा
अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल.
35)पहिला नंबरकारी -अमिता नायडू
Paperback/new
मुळ किंमत - 350
We read Price - 300 घरपोच.(शिपिंग फ्री)
खून, चोरी, घरफोडी, लूट, खंडणी, किडनॅपिंग, बलात्कार यासारख्या गुन्ह्यांमध्ये जेव्हा अल्पवयीन मुलं सापडतात तेव्हा काय असते सामान्यांची प्रतिक्रिया ? १६-१७ वर्षाच्या मुलाला फाशी द्या, त्यांना कडक शिक्षा द्या ही आणि अशीच ना? या दबावामुळे मुलांच्या कायद्यातही बदल केले जातात.
36)झाडाझडती - विश्वास पाटील
मुळ किंमत - 425
We read Price - 380 घरपोच.
तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्याे हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कादंबरी. '
37)डोंगरी ते दुबई - हुसैन झैदी
मुळ किंमत -350
We read किंमत - 285 घरपोच (शिपिंग फ्री)
मुंबईवर ६० वर्षे आपला प्रभाव पाडणारे गुंडाच्या टोळ्यांचे डॉन होते. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू सालेम हे होते. पण या सर्वांवर कडी केली ती दाऊदने. या सर्वांची तपशीलवार माहिती काढून अभ्यासपूर्वक त्यांच्यावर लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे. एका साध्या शाळकरी पोरापासून टोळीच्या दादापर्यंत दाऊदची उत्क्रांती कशी होत गेली, दाऊदने पोलिसांचा उपयोग करून आपल्या प्रतिस्पध्र्यांना कसे निपटले आणि शेवटी तो मुंबई पोलिसांचा एकमेव सूडकरी कसा बनला, याचे वर्णन यात आहे. हे पुस्तक म्हणजे मुंबईतील गुन्हेगारीचा एक अधिकृत इतिहास आहे.
38)मध्यरात्रीनंतरचे तास -सलमा
अनुवाद -सोनाली नवांगुळ (2021 साहित्य अकादमी पुरस्कार विजेती लेखिका)
Paperback/New
मुळ किंमत - 550
We read Price - 455 घरपोच.
या कादंबरीतील राबिया, रहीमा, जोहरा, अमीना, खदीजा, फिरदौस, फरिदा, नुराम्मा आणि अशा आणखी कितीतरी स्त्रिया त्यांच्या खासगी पुरुषसत्ताक जगात छोटी-छोटी विद्रोहाची निशाणी फडकवतात, नाना तडजोडी करतात... मैत्री जुळते, भंगते, घरं एकत्र येतात, दुभंगतात... पण या सगळ्यांच्या नकळत धिमेपणानं बदल घडत राहतात... बायकांची आयुष्यं बदलून जातात.
39)त्याने गांधींना का मारलं - अशोक कुमार पांडेय
New/paperback
मुळ किंमत - 300
We read Price - 260 घरपोच.
हे पुस्तक स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालेल्या अहिंसा
आणि हिंसा या तत्त्वज्ञानांच्या दरम्यानच्या गुंतागुंतीच्या
सामाजिक-राजकीय कारणांचा शोध घेत गांधींच्या
हत्येमागची कारणं समोर आणतं. त्याबरोबरच
गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी
जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. हे पुस्तक
गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत
नाही, तर अखेरीस गांधीहत्येचं कारण असलेल्या
वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं.
40)फिन्द्री -सुनीता बोर्डे
Paperback/new
मुळ किंमत - 350
We read Price - 320 घरपोच.(शिपिंग फ्री)
लेखिका सुनीता बोर्डे यांची फिन्द्री ही कादंबरी मनोविकास प्रकाशन पुणे यांनी नुकतीच प्रकाशित केली आहे. मी ही कादंबरी अलीकडेच वाचली. मराठवाडी बोलीभाषेत , मराठवाडा भागातील संस्कृतीचा एक ‘खास टच’ या कादंबरीतील एक वेगळंपण दर्शवित, लेखणाला एक वेगळी उंची देणारा आहे.
41)दंशकाल - ह्रषीकेश गुप्ते
मुळ किंमत -550
We read किंमत - 485 घरपोच (पाठवण्याचा खर्च नाही)
विहिरीत अंधार आहे. डोकावून पाहिलं तर भोवळ वगैरे येईल इतपत अंधार. अंधारात काहीही असू शकतं; काहीहीम्हणजे काहीही. पण ते काहीही म्हणजे नेमकं काय? हे आत उतरल्याशिवाय कळणार नाही. आजवर आयुष्यातल्या अप्रिय, असह्य, नको असणाऱ्या गोष्टी मी विहिरीत टाकल्या. अगदी अडगळीत टाकाव्या तश्या टाकल्या. पण विहीर म्हणजे अडगळ नाही. विहिरीत आई आहे, अण्णा आहेत. विहिरीत काकूचं बाळ आहे, नंदाकाका आहे. विहिरीत दमी, तायडी आणि सुपडीही आहे. विहिरीत अनेक उत्तरं आहेत.
42)अर्थसाक्षर व्हा -अभिजित कोळपकर
Binding: पेपरबॅक
मुळ किंमत -350
We Read किंमत -315 घरपोच (शिपिंग फ्री)
आपण कमावलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करुन समाधानी आयुष्य जगायचे असेल तर हे पुस्तक उपयोगी आहे.
तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करुन विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करुन तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे याचे उत्तम मार्गदर्शन ’अर्थसाक्षर व्हा’ मधे वाचायला मिळते.
43)गांधी का मरत नाही -चंद्रकांत वानखेडे
Paperback/New
पृष्ठ संख्या -166
मुळ किंमत - 180
We read Price - 180 घरपोच.(शिपिंग फ्री)
२ ऑक्टोबर २०१९ रोजी गांधीजन्माला १५० वर्ष पूर्ण झाली. गांधींच्या मृत्यूलाही ७० वर्षे होऊन गेली, तरीही गांधी अजूनही जिवंत आहेत असं वाटत राहतं. गांधींच्या मृत्यूनंतर विनोबांना विचारलं गेलं, 'गांधींच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांत प्रथम कोणता विचार तुमच्या मनात आला?' त्यावर उत्तर देताना विनोबा म्हणाले, “माझ्या मनाला असेच वाटले की गांधीजींचा मृत्यू झालाच नाही आणि आजपर्यंत माझ्या मनात हाच विचार आहे की ते जिवंत आहेत. सज्जनांचा कधी मृत्यू होत नाही, ते सदाचे जिवंत असतात आणि दुर्जन कधी जिवंत असतच नाहीत, ते फक्त कल्पनेच्या जगात जगत असतात.' म्हणूनच मग प्रश्न पडतो, 'गांधी का मरत नाही'
44)प्रिय इंदिरा… -जवाहरलाल नेहरू
Paperback/new
मुळ किंमत - 300
We read Price - 255घरपोच.(शिपिंग फ्री)
एका महान नेत्याने दुसऱ्या महान
नेत्याला लिहिलेल्या पत्रांचा मौल्यवान संग्रह
इंदिरा गांधी जेव्हा दहा वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी तो
उन्हाळा मसूरीत घालवला होता. त्याच वेळी त्यांचे
वडील, जवाहरलाल नेहरू मात्र अलाहबादला होते. त्या
उन्हाळ्यात नेहरूंनी इंदिरांना पत्र-मालिका लिहिली.
त्यामधून पृथ्वी कशी निर्माण झाली, मानवी तसंच प्राण्यांचं
जग कसं घडलं, आणि जगभरात सभ्यता-संस्कृती व
समाज यांचा विकास कसा होता गेला यांबद्दलची रंजक
माहिती रसाळ भाषेत विशद करून सांगितली.
45)कंट्या -गणेश बर्गे
मुळ किंमत - 250
We read Price - 225 घरपोच.(शिपिंग फ्री)
आपल्या प्रत्येकाच्या वाटेत कुठे ना कुठे येतोच असा प्रवास कंट्याचा आहे जो कधी स्वभावाने मऊ तर कधी कठोर आहे. त्याच्या आयुष्याचा तोच नायक आहे आणि तोच खलनायक सुद्धा आहे. निलंदर एवढा की सायकलवर ड्रायव्हर ठेवणारा हा पहिलाच माणूस असेल.
लहानपणापासून आयुष्याच्या एक एक टप्प्यावर हा मुलगा अनुभवातून बदलत जातो. त्याच्याच धुंदीत जगणारा पण तरीही अनुभवाच्या जोरावर तो चांगल्या वाईट गोष्टींना सामोरे जातो.या कहाणीला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे. पुस्तक वाचतांना तुम्हालाही तो भेटेन आणि त्याच्या आयुष्याची रूपरेषा तुमच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेली तुम्हाला जाणवेल. असा हा बेधुंद जगणारा कंट्या तुमच्या समोर घेऊन येत आहेत लेखक गणेश बर्गे सर. एका सामान्य मुलाची असामान्य अशी ही कहाणी एका चित्रपटसारखी आहे.
46)माझे प्रेमाचे प्रयोग -अमित मरकड
मुळ किंमत - 250
We read Price - 225 घरपोच.(शिपिंग फ्री)
मैत्री असो वा कुठलेही नाते ते जपण्यासाठी, प्रेमापेक्षा विश्वास किती जास्त मोलाचा असतो हे समजताना नात्याची गाठ घट्ट बांधली जाते. दिलेल्या शब्दाला आणि विश्वासाला किती किंमत असते, याची पारख आपण स्वतःच करू लागतो.
दुनियादारीच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अमित यांच्या पुस्तकात वाचायला मिळतील. त्या संदर्भात अनेक प्रसंग भेटतील. वाचताना तुमचे चांगले-वाईट अनुभव सतत तुमचा पाठलाग करत राहतील, जे तुमच्या आयुष्यातील घटनांवर अवलंबून असतील.
त्यांच्या आयुष्यातील प्रसंगावर लिहिलेले हे पुस्तक म्हणजे त्यांचा व्यक्त होण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
47)भटक्यांचे लग्नं -उत्तम कांबळे
मुळ किंमत - 140
We read Price - 140 घरपोच.(शिपिंग फ्री)
48)महात्मा जोतीराव फुले – धनंजय कीर
Paperback/New
मुळ किंमत - 450
We read Price - 400 घरपोच.(शिपिंग फ्री)
महात्मा जोतीराव फुले : आमच्या समाजक्रांतीचे जनक’ ह्या चरित्र ग्रंथात धनंजय कीरांनी एक माणुसकीने ओथंबलेला महात्मा सजीव, साकार केला आहे. महात्मा फुले यांच्या जीवनाचे विस्तृत आणि यथातथ्य दर्शन कीरांनी घडविले आहे. अवीट गोडीचा हा ग्रंथ सर्वांगसुंदर नि संग्राह्य आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील समाजक्रांतीचे दर्शन घडविणारा हा अमोलिक ग्रंथ अत्यंत वाचनीय, उद्बोधक नि स्फूर्तिदायक आहे. ह्या महापुरुषाचे हे समग्र चरित्र महाराष्ट्रातील विचारवंतांना, समाजसेवकांना नि राष्ट्रीय कार्यकत्यांना मार्गदर्शक ठरेल.
49)कोल्हाट्याच पोरं -"किशोर शांताबाई काळे
Paperback/New
मुळ किंमत - 150
We read Price - 150 घरपोच.(शिपिंग फ्री)
किशोर काळे यांचे गाजलेले आत्मकथन. आपल्यासारख्याच हाडामासांच्या माणसाला दुसरा माणूस दुय्यम ठरवून सर्वांत खालच्या पायरीवर आणून ठेवतो. त्याला हीन वागणूक देतो. याचं व्यवस्थेत राहून समाजाशी संघर्ष करून स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कोल्हाट्याच्या पोराची ही कहाणी.
50)मनकल्लोळ भाग - १ व २ - अच्युत गोडबोले , नीलांबरी जोशी
Binding: पेपरबॅक
पृष्ठ संख्या -700
मुळ किंमत -500
We Read किंमत -455 घरपोच (शिपिंग फ्री)
१२ भागांतल्या सुमारे ७० मनोविकारांची, त्यांच्या टेस्ट केसेस,
त्या विकारांचा इतिहास, लक्षणं, कारणं आणि उपचार अशी समग्र माहिती.
सर्व समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक, शिक्षकांपासून
मनोरुग्णाच्या कुटुंबीयांपर्यंत सर्वांच्याच संग्रही असावे असे पुस्तक!
51)रावण आणि एडी – किरण नगरकर
Paperback/New
मुळ किंमत - 400
We read Price - 355घरपोच.(शिपिंग फ्री)
ब्रिटिश वसाहतीनंतरच्या भारतातल्या दोन कल्पनातीत हिरोंच्या जीवनात घडणाऱ्या वात्रट व साहसी कृत्यांची एक अतिशय विनोदी, ‘रिबल्ड’ कादंबरी.
52)सूर्य गिळणारी मी -अरुणा सबाने
एका कार्यकर्तीचं आत्मकथन
मुळ किंमत - 600
We read Price - 520 घरपोच.(शिपिंग फ्री)
लग्न ही स्त्रीला एवढं आमूलाग्र बदलवणारी घटना असते? जर ती दोन जिवांची एकरूपता असेल, तर तिच्या सगळ्या अस्तित्वासह का नाही नवरा तिला स्वीकारत? का तिलाच तिच्यातून बरंच काही वजा करावं लागतं? मी माझ्या 'स्व' लाच वजा करायचं? नाही. बस झालं आता. मला जगायचं आहे. मला जगायचंच आहे. मला माझं स्वातंत्र्य हवं आहे . अगदी शेवटचे काही महिने माझी सर्व गात्रं बधिर झाली होती. दुःख, आनंद याच्यापलीकडे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, याची मला पूर्णपणे जाणीव झाली होती. स्वप्नहीन, भविष्यहीन, भावनाविरहीत, निर्जीव अशी होऊन गेले होते मी. ही अशी अरुणा तर माझ्या ओळखीचीच नव्हती.
53)बार्किंग अप द रोंग ट्री -एरिक बार्कर
Binding: पेपरबॅक
पृष्ठ संख्या -336
मुळ किंमत - 350
We Read किंमत -305 घरपोच (शिपिंग फ्री)
बार्किंग अप द राँग ट्री’ या पुस्तकात एरिक बार्कर यशप्राप्ती नेमकी कशाने साध्य होते यामागचं असामान्य शास्त्र सांगतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कुणालाही ती कशी साधता येते, हे ते सांगतात.तुम्ही या पुस्तकात शिकाल की, वर्गातली अभ्यासात हुशार असणारी मुलं कमी वेळा करोडपती झालेली पाहायला का मिळतात आणि तुमचा सगळ्यात मोठा कमकुवतपणा तुमची सर्वात मोठी ताकद कशी ठरू शकते.चांगली मुलं नेहमी मागे का राहतात आणि सहकार्याने काम करण्याचे धडे नेहमी गुंडांच्या टोळ्या, डाकू आणि अट्टल खुनी यांच्याकडून का मिळतात.
54)तुम्ही IAS कसे व्हाल -डॉ.विजय अग्रवाल
Paperback/new
मुळ किंमत - 195
We read Price - 195 घरपोच.(शिपिंग फ्री)
आयएएस परीक्षेच्या तयारी संदर्भात तुमची कोणतीही समस्या असू द्या, या पुस्तकात तुम्हाला त्याचे उत्तर मिळेलच. पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा तसेच इंटरव्ह्यूच्या बाबतीतीलच नव्हे तर तुमच्या मानसिक समस्यांचीही उत्तरे तुम्हाला यात मिळतील.
हे पुस्तक तुमच्याशी सरळ सरळ संवाद साधतं, तोही सविस्तर आणि साध्या आणि सोप्या भाषेत. इतकं की, काही समजलं नाही असं राहणारच नाही.
55)वर्दीतल्या माणसांच्या नोंदी ~ सदानंद दाते
मुळ किंमत - 200
We read Price - 185 घरपोच.(शिपिंग फ्री)
ज्येष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांनी पोलिसी सेवेतील अनुभवांबद्दल, व्यवस्थेबद्दल, समाजातल्या भल्या-बुऱ्यां प्रवृत्तींबद्दल केलेलं चिंतन.
56)मोर ओडिशा डायरी~ राजेश पाटील
मुळ किंमत - 250
We read Price - 225 घरपोच.(शिपिंग फ्री)
तरुण आयएएस अधिकाराच्या ओडिशातील कामाचे अनुभव. सनदी अधिकारी होऊ इच्छाणाऱ्या तरुणांसाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी पुस्तक.
57)फुलेल तेव्हा बघू ~ मूळ लेखक: विनोदकुमार शुक्ल भाषांतर: निशिकांत ठकार
मुळ किंमत - 300
We read Price - 255 घरपोच.(शिपिंग फ्री)
साहित्य अकादमी विजेते विनोदकुमार शुक्ल यांची वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषेवर उलगडणारी अफलातून कादंबरी.
58)सकस आणि सखोल ~ निळू दामले
पत्रकारी मानदंडावर खऱ्या उतरणाऱ्या पाश्चात्य नियतकालिकांची एका ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या सहजशैलीत करून दिलेली ओळख.
59)माझ्या लिखाणाची गोष्ट~ अनिल अवचट
मुळ किंमत - 200
We read Price - 185 घरपोच.(शिपिंग फ्री)
अनिल अवचट यांनी स्वतःच्या लेखनप्रक्रियेबद्दल लिहिलेलं आगळं पुस्तक. एका अर्थाने त्यांच्या लिखाणकामाचं आत्मचरित्रच.
60)कास्ट मॅटर्स - सूरज एंगडे
मुळ किंमत :- 425₹
We read किंमत :- 360 ₹ घरपोच (शिपिंग फ्री)
या स्फोटक पुस्तकात, जगातल्या अनेक खंडांमध्ये शिक्षण घेतलेले पहिल्या पिढीचे दलित अभ्यासक, जातीबाबत खोलवर रुजलेल्या धारणा आणि तिचं बहुस्तरीय स्वरूप विशद करतात. दररोज नरकयातना भोगावा लागणारा दलित आणि प्रेम व विनोदबुद्धीनं भारलेली त्याची अपूर्व बंडखोरीही यात आढळते. दलितांमधील अंतर्गत जातीभेदांपासून ते उच्चभ्रू दलितांचं वर्तन आणि त्यांच्यातील आधुनिक काळातल्या अस्पृश्यतेची विखुरलेली रूपं ब्राह्मणी सिद्धांताच्या अटळ प्रभावाखाली कार्यान्वित असतात. जोवर दलित सत्ता मिळवण्यासाठीच्या लढ्यात नेतृत्वस्थानी नसतील आणि ब्राह्मणवादाविरोधात ब्राह्मण उभे राहणार नाहीत, तोवर जातीचं अस्तित्व राहणार असल्याची मांडणी एंगडे करतात.
61)हसरे दुःख - भा.द खेर
मुळ किंमत - 500
We read Price - 450 घरपोच.(शिपिंग फ्री)
माझं आयुष्यच नाटयमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वत:च अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दु:ख दाखवून देतो. आपल्या हस-या मुखवटयातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी.
62)निसर्गायण -दिलीप कुलकर्णी
मुळ किंमत :- 240₹
We read किंमत :- 220₹ घरपोच (शिपिंग फ्री)
'पर्यावरणाची समस्या ही आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापी झाली आहे. निसर्गाशी ‘लढा’ देऊन त्याच्यावर ‘विजय’ मिळवण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केली आहे. निसर्गाचं चक्र त्यामुळे भेदलं जात आहे. पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत — आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही ह्या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. ही मनोवृत्ती जोवर बदलत नाही, तोवर ह्या समस्या सुटणार नाहीत. हा बदल कसा असला पाहिजे? तो कशानं शक्य होईल? आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान ह्यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. '
63)कार्ल मार्क्स - राहुल सांकृत्यायन
मुळ किंमत -300
We read किंमत - 250 घरपोच (पाठवण्याचा खर्च नाही)
कार्ल मार्क्सच्या प्रभावाची तुलना फक्त येशू ख्रिस्त किंवा
महंमद पैगंबर यांच्याशीच होऊ शकेल. अब्जावधी लोकांच्या
मानसिकतेवर, कल्पनाविश्वावर आणि आशा-आकांक्षांवर
या एका माणसाच्या विचारांनी चक्क राज्य केलं! त्याच्या
विचारांची झिंग आणि प्रेरणा घेऊन लढणारे आणि प्राण देणारे
कोट्यवधी जसे उभे राहिले, तसेच तितकेच लोक त्याचा
संपूर्ण तिरस्कार आणि धिक्कार करत त्याच्या विचारांचा
नायनाट करण्यासाठी त्याविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले
...आणि हे चक्क गेली दीडशे वर्षं चाललं! अजूनही संपूर्ण
कम्युनिझमचा पाडाव केल्याचा दावा जरी पाश्चिमात्य राष्ट्र
करीत असली, तरी जगाला मार्क्सवादाचा विचार कुठे ना कुठे
करावाच लागतो.
64)नरभक्षकाच्या मागावर ~केनेथ अँडरसन
मुळ किंमत -270
We read किंमत - 240 घरपोच (पाठवण्याचा खर्च नाही)
केनेथ अँडरसन हा पट्टीचा शिकारी. मात्र त्याची बंदूक वेध घ्यायची ती फक्त नरभक्षक बनलेल्या वाघांचा अन् बिबळ्यांचा. जंगलाशी नाळ जोडली गेलेला हा शिकारी जंगल वाचायला तर शिकलाच; शिवाय जंगलात राहणाऱ्या वन्य जमाती, त्यांची जीवनशैली, रूढी अन् प्रथा, जगण्याची साधनं या साऱ्यांचंही त्यानं बारकाईनं निरीक्षण केलं. दक्षिण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या पंचक्रोशीत दहशत माजवणाऱ्या नरभक्षकांना हिमतीनं अन् हिकमतीनं टिपणाऱ्या या निष्णात शिकाऱ्यानं सांगितलेल्या स्वानुभवाच्या थरारक शिकारकथा.
65)विरप्पन विरुद्ध विजय कुमार ~विजय कुमार
मुळ किंमत -380
We read किंमत - 320 घरपोच (पाठवण्याचा खर्च नाही)
चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी. एकशे चोवीस जणांच्या पाशवी हत्या. अनेक धाडसी अपहरणं. तीन राज्यांच्या पोलीसदलांना सतत वीस वर्षं दिलेली झुकांडी. अशी कैक भीषण कृत्यं खात्यावर असणाऱ्या क्रुरकर्म्याचा चिकाटीनं पाठलाग करून अखेर त्याला यमसदनाला धाडणाऱ्या के. विजय कुमार या आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलेली सत्यकथा. कल्पनेहूनही भयंकर अन् रहस्यपटाहूनही थरारक असं खिळवून ठेवणारं वास्तव !
66)मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती -अ. हा साळुंखे
मुळ किंमत - 200
We Read मध्ये - 180 घरपोच (शिपिंग फ्री)
67)गुजरात फाईल्स -राणा अय्युब
मुळ किंमत - 300
We Read मध्ये - 280 घरपोच (शिपिंग फ्री)
68)आर्टिफिशयल इंटेलिजन्स - अच्युत गोडबोले
मुळ किंमत - 250
We Read मध्ये -230 घरपोच (शिपिंग फ्री)
69)द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक -
मुळ किंमत - 250
We Read मध्ये - 230 घरपोच (शिपिंग फ्री)
70)आंबेडकर अनुयायांच्या नजरेतून - संकलन
मुळ किंमत - 250
We Read मध्ये -230 घरपोच (शिपिंग फ्री)
71)पॅलेस्टाईन-इस्राईल -एका अस्तित्वाचा संघर्ष -अतुल कहाते
मुळ किंमत - 250
We Read मध्ये - 230 घरपोच (शिपिंग फ्री)
72)इन्फोटेक -अच्युत गोडबोले
मुळ किंमत - 350
We Read मध्ये - 330 घरपोच (शिपिंग फ्री)
73)पायपीट - सतीश काळसेकर
मुळ किंमत - 250
We Read मध्ये - 230 घरपोच (शिपिंग फ्री)
74)द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली -रॉल्फ डोबेली
मुळ किंमत - 300
We Read मध्ये - 280 घरपोच (शिपिंग फ्री)
75)डीप वर्क -कॅल न्यूपोर्ट
मुळ किंमत - 250
We Read मध्ये - 230 घरपोच (शिपिंग फ्री)
76)जातीचे उच्चाटन - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
अरुंधती रॉय
मुळ किंमत - 350
We Read मध्ये - 320 घरपोच (शिपिंग फ्री)
77)आमचा बाप आणि आम्ही -नरेंद्र जाधव
मुळ किंमत - 150
We Read मध्ये - 150 घरपोच (शिपिंग फ्री)
78)अणुबॉम्ब -अतुल कहाते
मुळ किंमत - 250
We Read मध्ये - 230 घरपोच (शिपिंग फ्री)
79)ग्रेटाची हाक -अतुल देऊळगावकर
मुळ किंमत - 250
We Read मध्ये -230 घरपोच (शिपिंग फ्री)
80)द प्रोफेट -खलील जिब्रान
मुळ किंमत - 250
We Read मध्ये -220 घरपोच (शिपिंग फ्री)
81)जीन मशीन -वेंकी
मुळ किंमत - 350
We Read मध्ये -330 घरपोच (शिपिंग फ्री)
82)सम्राट अशोक चरित्र - वा.गो. आपटे
मुळ किंमत - 150
We Read मध्ये - 150 घरपोच (शिपिंग फ्री)
83)सच्ची रामायण -पेरियार स्वामी
मुळ किंमत - 250
We Read मध्ये -230 घरपोच (शिपिंग फ्री)
84)गंगेमध्ये गगन वितळले -अंबरीश मिश्र
मुळ किंमत - 200
We Read मध्ये - 180 घरपोच (शिपिंग फ्री)
85)कहाणी फ्लू ची - अतुल कहाते
मुळ किंमत - 250
We Read मध्ये - 230 घरपोच (शिपिंग फ्री)
86)अर्नेस्टो चे गव्हेरा -अरविंद रेडकर
मुळ किंमत - 140
We Read मध्ये - 140 घरपोच (शिपिंग फ्री)
87)बराक ओबामा -संजय आवटे
मुळ किंमत - 150
We Read मध्ये -150 घरपोच (शिपिंग फ्री)
88)पद्मावत -पुरुषोत्तम अग्रवाल
मुळ किंमत - 160
We Read मध्ये -160 घरपोच (शिपिंग फ्री)
89)खंडोबा -नितीन थोरात
मुळ किंमत - 320
We read Price - 300घरपोच.(शिपिंग फ्री)
मणी आणि मल्ल या राक्षसांचा संहार करण्यासाठी महादेवांनी खंडोबाचा अवतार धारण केला, अशी महाराष्ट्राच्या कुलदैवताची अख्यायिका.
पण, खंडोबाची कथा एवढीच होती का ?
प्रभू रामचंद्र, देवकीनंदन श्रीकृष्ण, अंजनीसूत हनुमान यांच्यासारखं खंडोबाचंही बालपण असेल तर ?
काय होती खंडोबाच्या जगण्याची गोष्ट, त्याच्या संघर्षाची कथा ? आपलं सामर्थ्य उमगेपर्यंत काय घडलं असावं खंडोबाच्या आयुष्यात ?
90)पिरॅमिडच्या प्रदेशात - डॉ. अच्युत बन
मुळ किंमत - 250
We read Price - 250घरपोच.(शिपिंग फ्री)
इजिप्त म्हणजे साडेचार हजार वर्षांची प्राचीन संस्कृती. इजिप्त म्हणजे फारोह, नाईल, ममीज् अन् अवाढव्य मंदिरे. पण या सर्वांहून ठळक वैशिष्ट्य म्हणजे इजिप्तचे पिरॅमिड. प्राचीन जगातील आश्चर्यांपैकी आधुनिक जगापर्यंत पोहोचलेले एकमेव आश्चर्य म्हणजे इजिप्तचे हे पिरॅमिड. या प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचे, वास्तूंचे अन् प्रतीकांचे वेधक दर्शन घ्यायचे असेल, तर चला जाऊ सफरीला -
91)वोल्गा ते गंगा - राहुल सांकृत्यायन
Paperback/New
पृष्ठ संख्या - 274
मुळ किंमत - 350
We read Price - 320 घरपोच.(शिपिंग फ्री)
ख्रिस्तपूर्व ६००० ते इ.स. १९२२ पर्यंतच्या मानव समाजाच्या प्रगतीचे ऐतिहासिक, आर्थिक व राजकीय वस्तुस्थितीच्या आधारे केलेले हे ललितकथांच्या स्वरूपातील संपूर्ण चित्रण 'वोल्गा ते गंगा'
92)हसण्यावरी नेऊ नका -उन्नामाटी श्याम सुंदर
Paperback/New
मुळ किंमत :-400
We read Price :-350 घरपोच (शिपिंग फ्री)
1932–1956 गोगलगायीवर बसलेल्या बाबासाहेब आंबेडकरांवर जवाहरलाल नेहरू चाबूक उगारतायंत, असं दाखवणारं शंकर यांचं १९४९ सालचं व्यंगचित्र एका पाठ्यपुस्तकात समाविष्ट होतं, त्यावरून २०१२ साली बराच गदारोळ उडाला, दलितांनी या विरोधात निषेध नोंदवला आणि कलात्मक स्वातंत्र्याच्या निकषावर सवर्णांनी या निषेधाचा प्रतिकार केला.
93)देहनगरीची अद्भुत सफर
Paperback/New/Color
मुळ किंमत :-350
We read Price :-300 घरपोच (शिपिंग फ्री)
आपल्या शरीराची अद्भुत, विस्मयकारी रचना उलगडून दाखवणारं आणि प्रत्येक अवयवाचं आपल्या शरीरातील स्थान व महत्त्व समजून घेत त्याची निगा कशी राखावी हे सांगणारं हे पुस्तक अबालवृद्धांनी मिळून वाचावं असंच आहे.
94)द गॉड डील्यूजन -रिचर्ड डोकिन्स
Paperback/New
मुळ किंमत :-500
We read Price :-400 घरपोच (शिपिंग फ्री)
देवावर श्रद्धा असणारे आस्तिक व देवावर विश्वास नसणारे नास्तिक, असा वाद तर सतत घडत असतो. प्रा. रॉबर्ट रिचर्ड डॉकिन्स यांनी विश्व हे देवाने निर्मिले, या समजुतीचा वैज्ञानिक विरोध करीत निरीश्ववादाचा पुरस्कार केला आहे. 'द गॉड डिल्यूजन'या पुस्तकातून त्यांनी ही संकल्पना विशद केली आहे.
95)शहीद भगतसिंग यांची जेल डायरी
Paperback/New
मुळ किंमत :-300
We read Price :-270 घरपोच (शिपिंग फ्री)
भगत सिंहानी लाहोर जेलमध्ये असताना शेकडो पुस्तकांचा अभ्यास करून ही डायरी लिहली होती . त्यांच्या मूळ इंग्रजी हस्ताक्षरासह ,संदर्भासहित मराठीत अनुवाद केलेली ही डायरी मराठी वाचकांसाठी आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मेजवानीच आहे .
टिप्पणी पोस्ट करा