NEW YEAR RESOLUTION 14 IDEA | नवीन वर्षांसाठी करता येतील असे १४ संकल्प
NEW YEAR RESOLUTION 14 IDEA | नवीन वर्षांसाठी करता येतील असे १४ संकल्प |
1) Build A Better Budget.खर्चाचे नियोजन करा
सगळ्यात महत्वाचा संकल्प ज्यामध्ये आपल्या खर्चाचे नियोजन करू शकता .किंवा वर्षभरासाठी लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टीसाठी पैसे राखून शकता .त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स असेल तो काढता येईल बघा .काही भविष्यासाठी गुंतवणूक करता येईल याची माहिती घ्या ...
2) Cook Something New Each Week.स्वतःसाठी किंवा घरच्या साठी जेवण बनवा
.
आठवड्यात किमान एकदा तरी घरच्यासाठी जेवण बनवा .
नवीन पदार्थ बनवायला शिका जेवण बनवण्यामुळे तुम्हाला एक वेगळी एनर्जी मिळेल ,त्याचबरोबर घरच्याना आपल्या हाताने बनवलेले खाऊ घातल्याचे समाधान मिळेल .
3) Read More Books. (पुस्तके वाचा )
तुमच्या क्षेत्रातील असो किंवा तुम्हाला उपयोगी पडतील अशी पुस्तके वाचा महिन्यातून किमान दोन पुस्तके वाचा तसे टारगेट ठेवा.
ज्या पुस्तकांमुळे आयुष्यात बदल घडेल किंवा तुम्ही नवीन गोष्टी शिकाल अशी पुस्तके वाचा.
4) Create A Cleaning Schedule (स्वच्छेतेसाठी वेळ काढा.)
स्वच्छतेसाठी एक वेळ काढा यामध्ये तुमचे रोजची सफाई असेल किंवा घर असेल .तुमचा स्टडी टेबल असेल किंवा ऑफिस टेबल तुमच्या लॅपटॉप मधील अनवांटेड फाइल्स मोबाईल मधील अनवांटेड गोष्टी या सगळ्या गोष्टी स्वच्छ करा.तसेच आयुष्यात येणारे टॉक्सिक लोक असतील किंवा विचार याची पण स्वच्छता करावी
5) Drink less alcohol.निर्व्यसनी राहा किंवा व्यसन कमी करा .
यावर्षी करण्यात येणाऱ्या संकल्पापैकी महत्वाचा संकल्प म्हणजे निर्व्यसनी रहा किंवा कमी व्यसन करा .व्यसन तुम्हाला गंभीर आजारी पाडू शकेल त्याचबरोबर आयुष्यात नैराश्य अश्या गोष्टी यामुळे येऊ शकता .त्यामुळे अश्या गोष्टी लांबच राहा .
6) Healthy Diet .हेल्थी डायट प्लॅन
हेल्दी डायट प्लॅन यामध्ये संपूर्ण पौष्टिक असे जेवण असेल असे पदार्थ तुम्ही खाऊ करू शकता फास्ट फूड किंवा डीप फ्राय केलेले पदार्थ तुम्ही टाळले पाहिजेत त्यामुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल मुळे ब्लॉकेज होऊ शकते त्यासाठी हेल्दी डायट प्लॅन असणे गरजेचे आहे.फळे भाजीपाला याचे पण तुम्ही सेवन केले पाहिजे .
7) Commit To a Healthier Sleep Routine.वेळेवर झोपा .
तुमचा झोपण्याचा आणि उठण्याचा एक वेळ असला पाहिजे त्यामध्ये कमीत कमी सहा तास ते सात तास झोप असली पाहिजे त्यामुळे तुमचे प्रेस कमी होईल व जर दिवसभराचे काम व्यवस्थित पार पडेल त्याचबरोबर आरोग्य विषयक तक्रारी होणार नाहीत.
8)Prioritize Annual Health Screenings.आरोग्या बद्दल माहिती ठेवा
तुमच्या आरोग्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे यामध्ये एक वेगळे टप्प्यात किंवा सहा महिने वर्षभरात तुमच्या आरोग्य विषय तपासणी केल्या पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरातील कमी जास्त असणाऱ्या गोष्टी याची निदान होईल व त्याप्रमाणे तुम्ही त्यावर लक्ष देऊ शकाल. हार्ट अटॅक चे प्रमाण वाढत असल्यामुळे आपल्या शरीरातील काही ब्लॉकेज असतील तर ते या तपासणी मधून उघड होऊ शकते अशा अनेक आजाराचे निदानासाठी किमान वर्षात एकदा तपासणी केली पाहिजे.
9) Become a Plant Owner.झाडे लावा.
आपल्या गॅलरीमध्ये किंवा उपलब्ध असणाऱ्या जागेमध्ये किमान होतील तेवढी शक्य झाडे लावावीत त्यामुळे तुम्ही एका ऍक्टिव्हिटी मध्ये गुंतवून राहतात यामध्ये तुम्ही झाडांची काळजी घ्यायला शिकाल यामुळे तुमचे आसपासचे वातावरण सुद्धा फ्रेश होऊ शकतो.
10) Start Doing Yoga or Gym जिम योगा करा .
व्यायाम किंवा योगा करण्यासाठी तुम्ही सुरुवात करा आजच्या धावपळीच्या युगात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शरीर आणि आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे तुम्हाला होईल त्या पद्धतीने योगा किंवा जिम लावून तुम्ही आपली शरीर तंदुरुस्त ठेवू शकता.
11)Plan a vacation.सहलीला किंवा फिरायला जा .
ट्रीपचे प्लॅन करा किंवा सहलीला वेळ काढा त्यामध्ये तुम्ही फॅमिली सोबत फिरायला जाऊ शकता तुमच्या विश लिस्ट मध्ये असणारे ठिकाणे त्याला भेट देण्यासाठी जाऊ शकता आपल्या सेविंग मधून काही भाग तुम्ही तुमच्या ट्रीप साठी प्लॅन करून ठेवू शकता अशा पद्धतीने तुमच्या रेगुलर आयुष्यामधून वेळ काढून ट्रीप केली तर एक प्रकारे रिफ्रेशमेंट मिळू शकते.
12) Make time for family friends मित्र आणि कुटुंबासाठी
नवीन स्किल साठी वेळ काढा तुम्हाला ज्या गोष्टी शिकायचे आहेत किंवा आवड आहे अशा गोष्टीसाठी तुम्ही वेळ राखून शिकू शकता ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी शिकून घ्या ज्या तुम्हाला जे छंद पुढे नेण्यासाठी किंवा करिअरमध्ये वाढ करण्यासाठी उपयोगी पडतील.
13) Jumpstart a new career. or skill नवीन स्किलसाठी वेळ कधी काढा
नवीन स्किल साठी वेळ काढा तुम्हाला ज्या गोष्टी शिकायचे आहेत किंवा आवड आहे अशा गोष्टीसाठी तुम्ही वेळ राखून शिकू शकता ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी शिकून घ्या ज्या तुम्हाला जे छंद पुढे नेण्यासाठी किंवा करिअरमध्ये वाढ करण्यासाठी उपयोगी पडतील
14)Invest On Self Buy New Clothes And Accessories Which Required स्वतःसाठी खरेदी करा .
स्वतःसाठी नवीन कपडे खरेदी करा यामध्ये नवीन वस्तू डिव्हाइसेस ज्याची तुम्हाला गरज आहे .अश्या गोष्टी विकत घेऊ शकता .
अशाप्रकारे 2024 साठी तुम्ही संकल्प करून तुमचा नवीन वर्ष व्यवस्थित प्लॅन करून एक चांगल्या प्रकारे सुरुवात करायला धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा