"यो यो हनी सिंगचा प्रवास: यश, संघर्ष आणि नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी | ऋषिकेश तेलंगे"




"यो यो हनी सिंगचा प्रवास: यश, संघर्ष आणि नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी | ऋषिकेश तेलंगे"

Yo yo honey singh 











माझ्या पिढीच्या तरूणांनी 2012 - 2017 हा यो यो हनी सिंगच्या चलतीचा काळ अनुभवलाय.जेव्हा जियोचे सिमकार्डही आले नव्हते ,नुकतंच थ्रीजी सिमकार्ड बाजारात आलतं व एखादं गाणं ब्लूटूथनं शेअर केलं जायचं.काहीशा चांगल्या आर्थिक परिस्थितीतले लोकं डाटा व्हाऊचरनं रिचार्ज करायचे.या काळात 'ब्लू आईज' ,'लवडोज' ,'देसी कलाकार' ,'लुंगी डान्स' ,'ब्लू है पानी पानी' ,'डोप शोप' असे गाणे जिथं तिथं भारतात धुमाकूळ घालू लागले.हनी सिंग हे नाव घराघरात ,गल्लीबोळात पोहोचलं.एखादं शाळेचं स्नेहसंमेलन असो ,गणपती बसलेला असो ,कौटुंबिक कार्यक्रम असो ,सणवार असो किंवा रस्त्याने चालणारा माणूस असो हनी सिंगचे गाणे गाजायला लागले.जणू हा काही मास हिस्टेरियाचा प्रकार असावा.

आम्ही तेव्हा शाळेत शिकत होतो व ही गाणी आवडीने ऐकत गुणगुणायचो.एकाच ठेक्याची गाणी ऐकणाऱ्या आमच्यासाठी ही गाणी म्हणजे एनर्जी ड्रिंक होती. हनी सिंग खऱ्या अर्थाने पॉप सिंगर असला तरी त्यानं रॅपला प्रतिष्ठा मिळवून दिली.बोहेमिया ऐकणारा ऑडियन्स जो बोटावर मोजण्याइतका उरला होता तो आता हनी सिंग ऐकत होता व अनेक जण या प्रकाराकडे वळू लागले.हा आर्ट फॉर्म कमर्शियली बळकट होत होता.पण त्याच वेळी माफिया मुंडीर नावाने हनी सिंगचा जो ग्रूप होता ,ज्यात बादशाह ,रफ्तार ,इक्का ,लिल गोलू यांचा समावेश होता त्यात एक दोन अश्लिल गाणी आली ज्यातलं एक होतं 'मै बलात्कारी हूँ' हे गाणं त्यावेळी मुलं लपून छपून चवीने ऐकत असली तरीही त्यावेळच्या निर्भयाच्या प्रकरणाशी याचा संबंध जोडला गेला आणि सामाजिक जबाबदारी आणि कलाकार असा मुद्दा ऐरणीवर आला ,ज्याचे परिणाम हनी सिंगला भोगावे लागले.नंतरही हनी सिंग यातून वाट काढण्याचा प्रयत्न करू लागला पण वाढत्या कामाचा ताण ,प्रसिद्धीचा माज ,वाईट लोकांच्या सवयीमुळे व न पेलणाऱ्या प्रसिद्धीचा झगमगाट यामुळे हनी सिंगला बायपोलर डिसीजसारखा गंभीर आजार झाला.नंतर चार पाच वर्षे तो गायबच होता. 

त्यानंतर कधीकाळी त्याचा मित्र आणि ग्रूप मेंबर असणारा बादशाह ,रफ्तार यांच्याकडून हनी सिंगविषयी बऱ्याच अफवा पसरवल्या गेल्या.ज्यात किती तथ्य होतं याविषयी हनी सिंगनं कसलंही स्पष्टीकरण देऊन प्रतिक्रिया दिली नाही.याचा बऱ्याच अंशी फायदा बादशाहला झाला पण हनी सिंगचा जो कट्टर प्रेक्षक होता तो तरीही हनी सिंगवर प्रेम करत राहिला व कधीकाळी ' मी रिकामी सीडी विकली तरी माझे चाहते विकत घेतील' असं आत्मविश्वासाने म्हणणाऱ्या हनी सिंगची भविष्यवाणी काही अंशी खरी ठरण्याची शक्यता दिसू लागली.माफिया मुंडीरमध्ये कोण होतं ? ब्राऊन रंग कुणी लिहिलं ? असे अनेक प्रश्न लोकांना पडू लागले.अर्थात मिडिया या विषयाला वरचेवर खतपाणी देऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू लागली.त्याचवेळी आपल्या आजारीपणाचा सामना हनी सिंग करू लागला.त्यातून शर्थीची झुंज देऊन जिवंत सुखरूप वाचला व दोन वर्षांपूर्वी बादशाहने एका गाण्यात म्हटलं होतं ,'कुछ लोगोंका कमबॅक नहीं हो रहा' या टोमण्याला उत्तर देण्यास सज्ज झाला. 

नवा हनी सिंग जो आधीपेक्षा खूप जाड झालता त्याच्या गाण्यात आता दर्जा नव्हता ,प्रेक्षकांना तो आवडत नव्हता पण नंतर परत एकदा वजन कमी करून आणि गाण्यांचा दर्जा बदलत्या काळानुसार आणि लोकांच्या बदललेल्या आवडीनिवडीनुसार वाढवून तो परतला ,अनेक टिव्ही माध्यमे व ऑनलाइन चॅनल्सना त्यानं मुलाखती देणं सुरू केल्या आणि अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळायला लागली.टी सिरीजचा अलीकडे आलेला Glory हा अल्बम प्रचंड गाजला ,ज्यात बरेच नवे जुने कलाकार दिसले.हनी सिंगचे प्रेक्षक खूश झाले. 

हनी सिंग बरेच वर्षे गायब होता तेव्हा काय करत होता ? त्याला काय झालं होतं नेमकं ? त्याची हिरदेश सिंग ते 
हनी सिंग बनण्याची सुरूवात कुठून झाली ? त्याच्या गाण्यात अश्लीलता पसरवण्याचं प्रकरण नेमकं काय होतं ? या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच्यावर नेटफ्लिक्सनं बनवलेली 'Yo yo honey singh Famous'  ही डॉक्युमेंटरी देते.डॉक्युमेंटरी खूप उत्कृष्ट असली ,बऱ्याच प्रश्नांचं आणि हनी सिंगच्या प्रवासाचा आढावा घेत असली तरीही ती अजून वाढवता आली असती आणि अजून काही दुर्लक्षित पैलू दाखवता आले असते ,बादशाह व माफिया मुंडीरविषयी अजून दाखवता आलं असतं पण वादविवाद टाळावा म्हणून मेकर्सने या गोष्टी चलाखीने टाळल्या.पण तरीही ही यावर्षी आलेल्या चांगल्या सिरीजपैकी एक असणारी डॉक्यु सिरीज आहे यात शंका नाही. - ऋषिकेश तेलंगे #yoyohoneysinghfamous #Netflix #yoyohoneysingh



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने