"आयुर्वेदिक पंचकर्म थेरपी - वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण"
वमन, विरेचन , बस्ती,नस्य, रक्तमोशन या पाच शरीरशुद्धाच्या उपक्रमांना आयुर्वेदीय पंचकर्म असे म्हणतात
आयुर्वेदिक पंचकर्म थेरपी - वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण”:या पाच उपचार पद्धतीला ५ म्हणजेच पंचकर्म म्हणतात .
आयुर्वेदिक पंचकर्म थेरपी: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण यांची संपूर्ण माहिती
Introduction:
- शरीर शुद्धीकरणाचे महत्त्व: आयुर्वेदिक उपचारांमध्ये पंचकर्म थेरपीला विशेष महत्त्व आहे. पंचकर्म म्हणजे पाच प्रकारच्या शुद्धीकरण प्रक्रियांचा एकत्रित अभ्यास.
- पंचकर्माचे उद्दिष्ट: शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन राखणे व आरोग्य टिकवून ठेवणे.
- ब्लॉगमध्ये तुम्हाला वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण यांची सविस्तर माहिती मिळेल.
1. वमन (Vamana):
- वमन म्हणजे काय?
वमन म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी उलटीची प्रक्रिया. - फायदे:
- शरीरातील अतिरिक्त कफाचे शुद्धीकरण
- पचन सुधारते आणि त्वचेचा निखार वाढतो.
- उपयोग:
अॅलर्जी, अस्थमा, आणि त्वचारोग यावर उपचार.
2. विरेचन (Virechana):
- विरेचन म्हणजे काय?
विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी जुलाब प्रक्रिया केली जाते. - फायदे:
- शरीरातील अतिरिक्त पित्त कमी होते.
- यकृत व त्वचेसाठी फायदेशीर.
- उपयोग:
अॅसिडिटी, त्वचाविकार, आणि पचनाचे त्रास.
3. बस्ती (Basti):
- बस्ती म्हणजे काय?
औषधी तेल किंवा काढ्याद्वारे एनिमा (Enema) देण्याची प्रक्रिया. - फायदे:
- वात दोषाचे शुद्धीकरण.
- सांधेदुखी व स्नायूंच्या समस्या कमी करणे.
- उपयोग:
संधिवात, पाठीचा त्रास, व कब्ज यासाठी प्रभावी.
4. नस्य (Nasya):
- नस्य म्हणजे काय?
नाकाद्वारे औषध घेण्याची प्रक्रिया. - फायदे:
- डोकं, नाक, आणि गळ्याचे शुद्धीकरण.
- डोकेदुखी, सायनस यावर उपयुक्त.
- उपयोग:
ऍलर्जी, मळमळ, आणि कान-नाक-घसा विकार.
5. रक्तमोक्षण (Raktamokshana):
- रक्तमोक्षण म्हणजे काय?
दूषित रक्त बाहेर काढण्याची प्रक्रिया. - फायदे:
- त्वचाविकारांवर प्रभावी उपाय.
- रक्तदाब व सांधेदुखी कमी करणे.
- उपयोग:
सोरायसिस, पिंपल्स, आणि रक्ताशी संबंधित विकार.
पंचकर्माचे फायदे
आयुर्वेदामध्ये सर्व रोगांवर अवस्थेनुसार पंचकर्म सांगितली आहेत.उदा- दमा सारख्या विकारात वमन.
ऋतूनुसार - ठरावीक ऋतूमध्ये वातावरणाच्या बदलामुळे शरीरातील ठराविक दोष वाढतात. वेळोवेळी ते शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी काही कर्मे केली जातात. उदाहरणार्थ वसंत ऋतूमध्ये वाढलेला कफ काढून टाकण्यासाठी वमन, वर्षा ऋतूमध्ये वातासाठी बस्ती व शरद ऋतूमध्ये पित्तासाठी विरेचन केले जाते. दर वर्षी ऋतूनुसार पंचकर्म करणे म्हणजे एक प्रकारे शरीराचे सर्व्हिसिंग करण्यासारखेच आहे.
गर्भधारणेपूर्व- गर्भधारणेत अडचण येत असल्यास किंवा उत्तम संतती निर्मितीसाठी कुटुंबाचे नियोजन करत असताना पंचकर्म करून घेणे अतिशय फायद्याचे ठरते.
पंचकर्माचे सर्वसाधारण फायदे- पंचकर्म केल्यामुळे भूक चांगली लागते, पचन सुधारते, शरीराला आणि मनाला स्वस्थता मिळते, मन आणि बुद्धी आपापल्या कार्यामध्ये उत्कर्ष करतात, शरीराचा वर्ण, कांती यामध्ये सुधारणा होते, कार्यशक्ती अर्थात स्टॅमिना वाढतो, वृद्धावस्था लवकर येत नाही, निरोगी असे दीर्घायुष्य मिळते व जुनाट व्याधी कायमचे नष्ट होतात.
पंचकर्म कोणी करू नये- पंचकर्म उपचार करत असताना व पंचकर्म झाल्यानंतर जे रुग्ण आहार विहाराचे पथ्य पाळू शकणार नाहीत, अति धाडसी किंवा अति घाबरट रुग्ण, ज्या रुग्णांचे बल कमी झाले आहे, असाध्य रोग पीडित रुग्ण, ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे व ज्यांना खूप थकवा आहे असे रुग्ण यांनी पंचकर्मे करू नयेत अथवा गरज असल्यास तज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली करावीत.
लक्षात ठेवा, पंचकर्म ही जाता येता करण्याची गोष्ट नाही. उत्तम वैद्याबरोबरच उत्तम रुग्णाची साथही पंचकर्म करताना गरजेची असते. पंचकर्म करताना दिलेल्या सूचनांचे नीट पालन झाले नाही तर शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे पंचकर्म हे नेहमी तज्ञ वैद्याच्या सल्ल्याने करावे.
वैद्य प्रभाकर शेंडये.
टिप्पणी पोस्ट करा